अपंग प्रमाणपत्र स्वावलंबन कार्ड चे फायदे | UDID Card benefits in marathi

अपंग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे संपूर्ण देशातील दिव्यांग (अपंग)  व्यक्तींसाठी ऑनलाइन अपंग प्रमाणपत्र देण्यात येते. अपंग प्रमाणपत्र या नवीन प्रणालीचे नाव आहे. 'स्वावलंबन कार्ड' त्यालाच 'UDID Card' , 'अपंग युनिक कार्ड' म्हणून देखील ओळखले जाते. 'UDID Card' म्हणजेच 'वैश्विक दिव्यांग ओळख पत्र' Unique Disability ID Card होय. 

स्वावलंबन कार्ड चे फायदे



दिव्यांग व्यक्तींचे स्वावलंबन व्हावे, सक्षमीकरण व्हावे यासाठी शासन स्तरावरून सातत्याने वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. विविध योजना दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, अपंगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना , सहाय्यभूत सेवा सुविधाचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा, जेणेकरून अपंग (दिव्यांग) व्यक्तींना आत्मनिर्भर होण्यास मदत होईल. आणि योग्य लाभार्थ्यास लाभ मिळेल. आज आपण नविन 'अपंग प्रमाणपत्र' (disability certificate) म्हणजे 'वैश्विक दिव्यांग ओळख पत्र' Unique Disability ID Card , 'UDID Card' स्वावलंबन कार्ड (#swavlambancard) चे फायदे कोणते आहेत? आणि त्याचा अपंग (दिव्यांग) व्यक्तींना कसा लाभ मिळणार याबद्दल ची माहिती पाहूया.

disability certificate


{tocify} $title={Table of Contents}

अपंग प्रमाणपत्र स्वावलंबन कार्ड चे फायदे | UDID Card benefits in marathi


अपंग प्रमाणपत्र पडताळणी (UDID Card) देण्यासाठी मुल्यांकन व तपासणी प्रक्रिया पार्श्वभूमी

विशेष तज्ञ समिती


दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय विभाग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या द्वारे दिव्यांग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र (handicap certificate) देण्यासाठी व मूल्यांकन व तपासणी प्रक्रिया अपंग प्रमाणपत्र पडताळणी  बाबत, सुधारणा सुचविण्यासाठी 8 जुलै 2015 रोजी दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष तज्ञ समिती गठित करण्यात आली होती. 

तदनंतर 10 नोव्हेंबर 2015 रोजी या समितींनी 8 उपसमित्या स्थापित करण्याचा निर्णय घेतला व या उपसमित्या मार्फत आठ दिव्यांग प्रकारातील व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणीकरण व मूल्यांकन प्रक्रिया बाबत अभ्यास करून माहिती सादर करण्यास सांगितले होते. यामध्ये चलनवलन विषयक विकलांगता, अंध, कर्णबधिर, रक्तसंबंधी पीडित व्यक्ती, मतिमंदत्व, मानसिक आजार, बहुविकलांगता व चिरकालिक तांत्रिक दशाए यांचा समावेश होता. 

याबाबत नेमलेल्या आठ उपसमित्या यांनी आपला अहवाल दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग या विशेष तज्ञ समिती कडे सादर केला. या अंतिम समितीने आठ उपसमितीने केलेल्या अभ्यासाची व दिलेल्या माहितीची पडताळणी करून स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडे अहवाल सादर केला.  

यासंबंधी ८ उपसमित्यांनी दिलेल्या शिफारसी नुसार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय अध्यक्षांनी 11 एप्रिल 2017 रोजी एक बैठक आयोजित केली व या बैठकांमध्ये चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आला. व सदर रिपोर्ट केंद्र शासनास सादर केला.
    
तत्पूर्वी दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम  (RPWD Act) 28 डिसेंबर 2016 रोजी केंद्र शासनाने पारित केला होता. पूर्वीचा PWD Act १९९५ मध्ये सुधारणा करून जुने व नवीन असे एकूण २१ दिव्यांग प्रकारचा समावेश नवीन RPWD Act 2016 कायद्यात करण्यात आला. यामुळे या २१ प्रकारातील दिव्यांग व्यक्तींचा विचार केला गेला. (दिव्यांग २१ प्रकार सविस्तर वाचा) त्यांची तपासणी, मुल्यांकन, प्रमाणपत्र वितरण व दिव्यांग व्यक्तीसाठी UDID कार्ड देण्यासाठी केंद्रीय संगणक प्रणाली तयार करून  www.swavlambancard.gov.in हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले. या संकेतस्थळावर संपूर्ण भारतातील दिव्यांग व्यक्ती अपंग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात. 



अपंग प्रमाणपत्र स्वावलंबन कार्ड

वैश्विक दिव्यांग ओळख पत्र  Unique Disability ID card

Unique Disability ID card त्यालाच मराठीमध्ये वैश्विक दिव्यांग ओळख पत्र किंवा स्वावलंबन कार्ड तसेच अपंग युनिट कार्ड  म्हणून देखील  ओळखले जाते. UDID कार्डसाठी www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. समाजकल्याण विभाग व आरोग्य विभाग माहितीची सत्यता पडताळून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्वाक्षरीचे UDID Card पोस्टाद्वारे कार्ड पाठविण्यात येते. 

ज्या दिव्यांग व्यक्तीने ने प्रथमच अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असेल, अशा व्यक्तींची तपासणी करून सदर कार्ड वितरीत केले जाते. UDID कार्ड दिनांक 2 ऑक्टोबर 2018 पासून लाभार्थींना वितरीत करण्यास सुरुवात झालेली आहे. 

शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या सोयी  सवलतीचा लाभ  दिव्यांग व्यक्तींना व्हावा यासाठी दिव्यांग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र disability certificate दिले होते. 3 डिसेंबर 2012 पासून राज्यांमध्ये SADM या  सॉफ्टवेअर असेसमेंट ऑफ डीस्याबिलिटी महाराष्ट्र Software for Assessment of Disability, Maharashtra(SADM)
या संगणक प्रणाली द्वारा दिले जात होते. मात्र आता 2 ऑक्टोबर 2018 पासून भारत सरकारच्या www.swavlambancard.gov.in या संगणक प्रणालीद्वारे UDID कार्ड  दिले जात आहे.


स्वावलंबन कार्ड चे फायदे | UDID Card benefits in marathi

   
 
  • सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे UDID कार्ड साठी घरबसल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी दिव्यांग व्यक्ती अर्ज करू शकतात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही  कार्यालयात जाऊन फॉर्म भरून देण्याची आवश्यकता नाही.
  • विविध राज्यांमध्ये अपंग प्रमाणपत्रासाठी वेगवेगळे फॉरमॅट होते. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात दिव्यांगाबाबत एक समानता दिसत नव्हती. त्यामुळे दिव्यांग बांधवांना खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागायचे.
  • उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे  दिव्यांग्त्व प्रमाणपत्र आहे. ते इतर दुसऱ्या राज्यामध्ये चालत नव्हते व दुसऱ्या राज्यातील  प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये चालत नव्हते यासाठी दिव्यांग बांधवांना शासनाच्या सोयी सवलतीचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. 
  • जसे की., वेगवेगळ्या शासकीय योजनांसाठी रेल्वे पास, बस पास अशा अनेक बाबींसाठी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्राचा गठ्ठाच सोबत घेऊन जावा लागायचा. 
  • मात्र यापुढे या सोयी सवलती साठी एक समानता येण्यासाठी केवळ एक कार्ड संपूर्ण देशभरातील सर्व प्रकारच्या योजना लागू होण्यासाठी UDID कार्ड स्वावलंबन कार्ड वितरित करणे सुरू झालेले आहे
  • या सर्व समस्या दूर करण्यासाठी  UDID कार्ड हे संपूर्ण देशभर वैध असेल केंद्रीय UDID या संगणक प्रणाली मध्ये दिव्यांग व्यक्तीची माहिती ही युनिक व खोटी आढळणार नाही.
  • UDID कार्ड  साठी संपूर्ण भारतात एकच फॉरमॅट असेल व तो प्रत्येक दिव्यांग यांची संपूर्ण माहिती केंद्रीय संगणक प्रणाली मध्ये सुरक्षित राहते. 
  • त्यामुळे भारतातील सर्व दिव्यांग व्यक्ती ची जनगणना अगदी सोप्या पद्धतीने करण्यास मदत होईल तसेच त्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक स्थिती  विषयी माहिती सहज उपलब्ध होऊ शकेल, 
  • जेणेकरून उपलब्ध डेटाबेस माहितीनुसार दिव्यांग व्यक्ती साठी कायदे, धोरणे ठरविताना संबंधित तज्ञांना त्याची मदत होईल. 
  • लाभदायक कायदे योजना बनविताना वेळही कमी लागेल व त्या सुविधांचा लाभ हा दिव्यांग व्यक्तींना होईल तसेच आवश्यकतेनुसार ही माहिती वेळोवेळी अद्ययावत देखील करता येईल.
  • UDID कार्ड  प्रणालीमार्फत याही गोष्टीचा शासनास अंदाज येऊ शकेल की सद्यस्थितीत दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत आहे की नाही त्याची वस्तुस्थिती सुद्धा माहिती पडेल. 
  • UDID कार्ड  द्वारे दिव्यांगत्वाशी संबंधित सर्व गोष्टीसाठी UDID कार्ड  हे एक ओळखपत्र असेल त्यामुळे वेगवेगळ्या प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. 
  • UDID कार्ड  मध्ये दिव्यांग व्यक्तीची संपूर्ण माहिती असेल त्याची रचना ही एटीएम कार्ड सारखी आहे.
  • आकाराने छोटे आहे. त्यामुळे अगदी सहज खिशात ठेवता येईल. व कोठेही घेऊन जाण्यास सोपे आहे. व ते लवकर खराब देखील होणार नाही. या सर्व 

सारांश

अपंग (दिव्यांग) व्यक्तीचे सक्षमीकरण आणि आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकार मार्फत अपंग प्रमाणपत्र देण्यासाठीची ही संगणकीय प्रणाली द्वारे दिले जाणारे स्वावलंबन कार्ड चे फायदे आपण बघितले. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण देशामध्ये एक समानता येण्यासाठी  आणि विशेषतः दिव्यांग व्यक्ती साठी असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे. की नाही? याची माहिती या प्रणाली मार्फत मिळणार आहे. त्यासोबतच भविष्यातील दिव्यांग व्यक्ती साठी चे कायदे ,, धोरणे ठरविण्यासाठी शासनाला मदत मिळणार आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींसाठी 'वैश्विक दिव्यांग ओळख पत्र' Unique Disability ID Card, 'अपंग युनिक कार्ड' , 'UDID Card' किंवा 'स्वावलंबन कार्ड' हे  वरदानच ठरणार आहे.


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp लोगो का क्लिक करा.

Previous Post Next Post