दिव्यांग ओळख पत्र UDID REGISTRAION
युनिक Disability कार्ड ONLINE REGISTRAION प्रोसेस .
udid card application process
ONLINE अर्ज कोण करू शकेल?
· 1. RPWD
Act 2016 नुसार २१ प्रकारापैकी दिव्यांग्त्व असणारी व्यक्ती
· 2. अपंगत्व
प्रमाणपत्र असणारी दिव्यांग व्यक्ती
· 3. अपंगत्व
प्रमाणपत्र नसलेली परंतु नवीन काढायचे आहे. अशी व्यक्ती अर्ज करू शकेल.
ONLINE REGISTRAION म्हणजे UDID क्रमांक नाही.
UDID कार्ड साठी
RPWD नोंदणी सुरु आहे. म्हणजे रजिस्टर केल्यानंतर जी online पावती मिळेल त्यावर
नोंदणी क्रमांक असेल UDID क्रमांक मेडिकल तपासणी झाल्यानंतर आपणास मिळेल म्हणजेच
UDID कार्ड मिळेल. यासाठी प्रथम UDIDकार्ड साठी ONLINE REGISTRAION
करणे आवश्यक आहे.
दिव्यांग
व्यक्तीस दिव्यांगत्व प्रमाणपत्र UDID कार्ड मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे सादर
करणे
आवश्यक
आहे.
१) ओळखीचा पुरावा (कोणताही एक) :- आधार कार्ड,
मतदान ओळखपत्र, शाळा/
कॉलेजचे ओळखपत्र, पासपोर्ट,
पॅनकार्ड, ड्रायव्हिंग
लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एकाची प्रत
२) निवासाबाबत पुरावा (कोणताही एक) :- लाईट
बिल, मिळकत कर पावती,
७/१२ किंवा ८अ उतारा,
अधिवास प्रमाणपत्र, फोन बिल,
पाणीपट्टी, घरपट्टी,
ग्रामपंचायत, नगरपालिका,
महानगरपालिका, छावणी मंडळाने दिलेले
रहिवासी प्रमाणपत्र, निवासी अपंग विद्यालयातील
विद्यार्थ्यासाठी संस्थेने दिलेली रहिवासी प्रमाणपत्र,
रेशनकार्ड
३) अर्जासोबत पासपोर्ट आकाराची २ छायाचित्रे
(फोटो) सादर करावे लागतील. सदर छायाचित्रे नजीकच्या कालावधीतील काढलेले असावे.
दिव्यांगत्व दर्शविणारे पुर्ण छायाचित्र सादर करु नये.
- अपंगत्व प्रमाणपत्र यापूर्वी काढलेले असेल तर त्यांनी सुद्धा ONLINE REGISTRAION करावे , त्याठिकाणी आपल्याकडे असलेले प्रमाणपत्र UPLOD करावे.
ONLINE REGISTRAION PROCESS
- प्रथम www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळावर गेल्यानंतर Register वर क्लिक करा. नवीन page open त्यामध्ये एकूण ४ भाग दिसतील 1.Personal Details 2. Disability Details 3. Employment Details 4. Identity Details
UDID CARD Register Official Website
1.Personal Details
- माहिती भरत असताना आधार कार्ड वरील नाव बघून English स्पेलीनिंग बरोबर भरावी.
- लाल रंगातील (*) कॉलम मध्ये माहिती भरणे अनिवार्य आहे. अन्यथा माहिती Submit होणार नाही.
- फोटो size 15kb to 30kb jpg,gif,jpeg,png format मध्ये आधीच तयार करून ठेवावा.
- सही एका कागदावर करून स्कॅन करावी व त्याची Size 3kb to 30kb मध्ये असावी.
2. Disability Details
- ज्यांच्याकडे online काढलेले दिव्यांग्त्व (अपंग) प्रमाणपत्र असेल तर Yes करून स्कॅन कॉपी uplod करावी. प्रमाणपत्र नसेल तर No करावे.
- Disability Type (दिव्यांग्त्व प्रकार) मध्ये आपणास संभाव्य जे २१ प्रकारातील असेल ते select करावे.
- Disability Area शरीराच्या कोणता भाग Affected आहे ते select करावे.
- इतर कॉलम मधील माहिती असेल तर भरावी अन्यथा पुढे जावे.लाल रंगातील (*) कॉलम मध्ये माहिती भरणे अनिवार्य आहे.
3. Employment Details
- या भागामध्ये section मध्ये आपले Employment Details भरावे.
- BPL/APL माहिती भरावी.
- Annual Income वार्षिक उत्पन्न नमूद करावे.
- त्यानंतर next बटणावर क्लिक करा.
4. Identity Details
- आधार कार्ड स्कॅन करून त्याची Size 10kb to 100kb मध्ये असावी.
- त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून I Agreed चेक बॉक्स वर क्लिक करावे.
- Captcha code बरोबर टाकावा व्यवस्थित दिसत नसेल तर रिफ्रेश बटनावर क्लिक करून आलेला नवीन Captcha code भरावा.
- I have read and agree to the terms and conditions यावर क्लिक करून Proceed वर क्लिक करा.
- त्यानंतर confirm application वर क्लिक करा जर काही माहिती भरायची राहिली असेल तर Edit application वर क्लिक करून भरू शकता अन्यथा confirm application वर क्लिक करा.
·
त्यानंतर आपल्या स्क्रीन
वर एक नोंदणी Register number येईल त्याची प्रिंट काढून घ्या हि प्रिंट मेडिकल
तपासणी च्या वेळेस आपल्याला दाखवावी लागेल त्यासाठी जपून ठेवा.
·
जिल्हा रुग्णालय या
नोंदणी क्रमांकानुसार प्राधन्यक्रमाने तालुका किंवा जिल्हा स्तरीय मेडिकल कॅम्प
आयोजित केले जाईल त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून आपणस UDID
कार्ड प्राप्त होईल.
·
ज्यांच्याकडे आधीच online
प्रकारातील अपंग प्रमाणपत्र आहे त्यांना पोस्टाद्वारे UDID कार्ड आपण दिलेल्या
पत्यावर येईल.
सद्यस्थितीत वर
सांगितलेली प्रोसेस व कार्यवाही आहे. याबाबत काही बदल केले गेले तर यामध्ये बदल
होऊ शकतात. त्यामुळे आपण तालुका / जिल्हा रुग्णालय यांच्याशी संपर्क करून अधिक
माहिती मिळवून संबंधित विभागाशी संपर्कात रहावे. या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास
वेळोवेळी बदल झालेली माहिती देण्याचा १००% प्रयत्न केला जाईल.
UDID Card असे असेल