अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

Apang-Pension-Yojana-Maharashtra
{tocify} $title={Table of Contents}

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

महाराष्ट्र राज्यामध्ये निराधार, अंध, अपंग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती तसेच निराधार विधवा त्यासोबतच परित्यक्ता, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना आर्थिक सहकार्य मिळावे, या हेतूने राज्य पुरस्कृत तसेच केंद्रपुरस्कृत शासकीय योजना राबविल्या जातात.

त्यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्ध व्यक्तींसाठी 'श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना' केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील वृद्ध व्यक्तींसाठी 'इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना' विधवा महिलांकरिता 'इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि दिव्यांग/अपंग व्यक्तींसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबवल्या जातात. या योजनेतंर्गत दिव्यांग व्यक्तींना केंद्र शासनाचे रुपये ३०० व राज्य शासनाचे रुपये ७०० असे एकूण दरमहा रुपये १००० अनुदान लाभार्थ्यास मिळते. 

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत राज्यातील अपंग दिव्यांग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन Apang Pension देण्यात येते. राज्यातील सर्व प्रवर्गातील म्हणजेच 'दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016' (RPWD Act 2016) अन्वये 21 प्रवर्गातील दिव्यांगांना योजना लागू आहे. राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन हा मुख्य उद्देश  'इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनेचा' आहे. आज आपण दिव्यांग व्यक्तींसाठी असणारी 'अपंग पेन्शन योजना' मध्ये  'इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना' संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना पात्रतेचे निकष, अटी व शर्ती

 • वय - १८ ते ७९ वर्ष वयोगटातील अपंग/दिव्यांग व्यक्ती.
 • कुटुंबाचे उत्पन्न - कुटुंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे.
 • आर्थिक सहाय्य / निवृत्तीवेतन- दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांकरीता केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा रु.३००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा रु.७००/- असे एकूण दरमहा रु.१०००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
 • केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा रु.३००/- देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्या असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रु.७००/-, रु.८००/- व रु.९००/- असे एकूण अनुक्रमे दरमहा रु.१०००/- रु.११००/- व रु.१२००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल. 
 • पात्रतेची अर्हता- अपंग लाभार्थ्याचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नांव असणे आवश्यक आहे.
 • अपंगत्वाचे प्रमाणपत्र - अपंग असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अपंग/दिव्यांग व्यक्तीचे 80% हून जास्त अपंगत्व किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंगत्व किंवा बहूअपंगत्व असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात.
 • वयाचा दाखला - ग्रामपंचायतीच्या / नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंदवहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
 • उत्पन्नाचा दाखला - दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती / कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा, रहिवाशी दाखला ग्रामसेवक / तलाठी / मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.
 • शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
 • एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनालासुध्दा राहतील.
हे ही वाचा


इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना अर्ज करण्याची पद्धत

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना फॉर्म Online - सोबतच्या शासन निर्णय GR मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना फॉर्म दिला आहे.
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेसाठी सर्वप्रथम फॉर्म डाउनलोड करा.
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना फॉर्म मध्ये आवश्यक सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
 • उपरोक्त सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
 • फॉर्म भरल्यानंतर आपल्या गावातील तलाठ्याकडे सबमीट करा.
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता, यासाठी आपले सरकार या वेबसाईटला भेट देऊन आपले अकाऊंट तयार करा आणि त्या ठिकाणाहून आपण अर्ज करू शकता. मात्र त्यापूर्वी आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवा.
>> इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन (अपंग पेन्शन योजना) शासन निर्णय डाउनलोड करा.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना संपर्क कोणाकडे करावा?

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजने संदर्भामध्ये कोणतीही अडचण/समस्या असल्यास आपल्या गावातील तलाठी कार्यालय किंवा तालुका स्तरावर तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.

सारांश

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या अपंग पेन्शन योजने मध्ये प्रतिलाभार्थी दरमहा रुपये 1000/- निवृत्तीवेतन अपंग व्यक्तींना मिळते. या अपंग पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता अटी व शर्ती, अर्ज कोणाकडे करायचा? संपर्क कुठे साधायचा? या सर्व प्रश्नांची उत्तर या लेखांमध्ये घेतली आहे. आशा करतो आपल्याला ही माहिती आवडली असेल, गरजू व्यक्तींना अवश्य शेअर करा आणि माहिती भरण्यापूर्वी याच आर्टिकल मध्ये अपंग पेंशन योजनेचा शासन निर्णय अपंग जीआर दिलेला आहे तो अवश्य वाचावा.नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp लोगो का क्लिक करा.

Previous Post Next Post