विमा पॉलिसी म्हणजे काय? महत्व आणि विमा प्रकार | Insurance Policy Meaning In Marathi

जीवन जगत असताना मनुष्याला स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची देखील जबाबदारी पार पाडावी लागते. उधरनिर्वाहासाठी करीत असलेला कामधंदा आणि व्यवसायामध्ये विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीला सामोरे जावे लागते. अशा वेळी विमा पॉलिसी आवश्यक असते. विमा ( Insurance) काढण्याअगोदर आपल्याला विम्या संबंधित माहिती असणे गरजेचे असते. तेव्हाच आपण योग्य विमा काढू शकू. Insurance Policy Meaning In Marathi मध्ये समजून घेण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात विम्याचे आर्थिक महत्व काय आहेत? विम्याचे फायदे आणि विम्याचे विविध प्रकार (Types of Insurance in Marathi) जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. आपल्याला वैयक्तिक विमा (Personal Insurance) किंवा आपल्या मालमत्तेचा विमा (Property Insurance) काढण्यासाठी आजच्या लेखामधून सविस्तर माहिती मिळणार आहे.

Insurance Policy Meaning In Marathi



{tocify} $title={Table of Contents}


Insurance Policy Meaning In Marathi | विमा पॉलिसी म्हणजे काय? महत्व आणि विमा प्रकार

पृथ्वी वरील सर्व प्राण्यांना स्वतःच्या संरक्षणाच्या जाणीवेची देणगी आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. मानव हा समाजशील प्राणी आहे. यामुळेच प्रत्येक जन स्वतः, स्वतःचे नातेवाईक आणि प्रियजनांच्या जीवनात जास्तीत जास्त सुख, समृद्धी आणि समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो, यासाठी तो या सर्व घटकासह भौतिक साधनांना सुरक्षितता लाभावी म्हणून प्रयत्नशील असतो. मनुष्याच्या विकासाबरोबर विविध धोके आणि संकटे सुद्धा निर्माण होत आहे. गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या महामारी मध्ये कित्येकांना आपला प्राण गमवावा लागला, तसेच कित्येकांचे कुटुंब उद्वस्थ झालेले आपण पहिले. आता कुठे जनजीवन पूर्व पदावर येत आहे. मात्र अजूनही कोरोनाचे सावट पूर्णपणे संपलेले नाही. 

जीवन जगत असताना आपण स्वतःला किंवा कुटुंबातील सदस्य , नातेवाईक यांना विविध संकटाना तोंड द्यावे लागते. जसे कि, आजारपण, अपघाती मृत्यू, अपघातामुळे आलेले अपंगत्व यामुळे स्वतःला आणि कुटुंबाला प्रचंड मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. तसेच उधरनिर्वाहासाठी करीत असलेला कामधंदा आणि व्यवसायामध्ये देखील आग, चोरी, युद्ध, भूकंप, पूर, दुष्काळ अशा विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती सामोरे जावे लागते. यासाठी निश्चित स्वरूपाच्या विमा योजनांची आवश्यकता असते. जेणेकरून कुटुंबाची असणारी जबाबदारी, आपत्कालीन निधी याचे नियोजन करण्यासाठी आपलयाला विमा योजना मदत करत असते. आज आपण विमा पॉलिसी म्हणजे काय? (Insurance Policy Meaning In Marathi) याचा अर्थ मराठीमध्ये समजून घेऊया तसेच जीवनामध्ये विम्याची आवश्यकता का भासते? विम्याचे महत्व आणि विम्याचे विविध प्रकार समजून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

विमा पॉलिसी इतिहास

विमा बाबतची कल्पना ही फार जुनी आहे. सर्वप्रथम विमा संदर्भात संकल्पना ही व्यापाऱ्यांनी अमलात आणली. इसवीसन १७५६ मध्ये बॅबिलोनियन नावाच्या व्यापाऱ्यांनीच हमुरबी कोड नावाची पद्धत सुरू केली होती. त्याकाळामध्ये जहाजातून मालाची निर्यात व आयात करण्यासाठी कर्ज काढावे लागत असे. हमरुबी कोड या योजनेमध्ये जहाज जर चोरीला गेले किंवा समुद्रात बुडाले तर त्यासाठी काढलेले कर्ज त्या व्यापाऱ्यांना माफ करण्यात येत होते. मात्र  व्यापाऱ्यांना कर्जापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागत असत. भारतामध्ये विम्याची कल्पना ही मनुस्मृती मधून घेण्यात आलेली आहे.

भारतामध्ये विमा हा सन १८१८ मध्ये सुरु करण्यात आला. कलकत्ता येथे ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी सुरू झाली होती. परंतु १८३४ मध्ये ती कंपनी बुडाली. १८७१ मध्ये म्युच्युअल आणि १८७४ मध्ये ओरिएंटल व १८९७ मध्ये एम्पायर ऑफ इंडिया या कंपन्या सुरू झाल्या. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्यापैकी सर्वात जुनी कंपनी नॅशनल इन्सुरन्स कंपनी १९०६ मध्ये सुरू झाली आहे.

विमा म्हणजे काय ? | Insurance Meaning in Marathi

विम्याचा अर्थ | Meanings of Insurance in Marathi

आज प्रत्येकजण काहीना काही कामानिमित्त नोकरी, कामधंदा , व्यवसाय, उद्योग करीत असतो. कधी काय होईल हे सांगता येत नाही. मग ते कशाच्याही बाबतीत घडू शकते. आरोग्य , अपघात, शेत मालावर आलेले संकटवाहन, व्यवसाय अशा विविध कामात कधीही अनपेक्षित घटना घडल्यास किंवा मोठे संकट आल्यास होणारे नुकसान कमीत कमी व्हावे किंवा आर्थिक मदत योग्य मिळावी या हेतूने आपण  विमा (Insurance) उतरवीने आजच्या काळात गरज बनली आहे. आता आपण सोप्या भाषेत विम्याचा मराठीत अर्थ (Insurance Meaning in Marathi) समजून घेऊया.

विमा म्हणजे एक अशी व्यवस्था जी आपत्कालीन घटना घडल्यास किंवा नुकसान झाल्यास त्याची भरपाई म्हणून मिळणारा मोबदला म्हणजे विमा (Insurance) होय. मनुष्याच्या जीवनातील धोके आपण टाळू शकत नाही मात्र धोक्यामुळे होणारे नुकसान कमीत कमी राखण्याची व हानीची भरपाई करण्याची व्यवस्था म्हणजे विमा होय.

विमा म्हणजे काय?  व्याख्या | Definition Of Insurance

 विम्याची करारावर आधारित व्याख्या 

विमा (Insurance) ही एक अशी योजना आहे की, तिच्याद्वारे विमेदार संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची विशिष्ट प्रमाणात भरपाई करण्याची जबाबदारी योग्य मोबदल्यात विमा कंपनीवर सोपवतात.

Insurance is a device for the transfer of risk of individual entities to an insurer who agrees for a consideration to assure to specified extent losses suffered by the insured.

>> टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? प्रकार व फायदे | Term Insurance Meaning In Marathi 

>> टर्म इन्श्युरन्स प्लान का आवश्यक आहे? | Term Insurance Needs Analysis

 विम्याची कार्यात्मक व्याख्या 

सारख्याच धोक्याची संभाव्यता असणाऱ्या अनेक व्यक्तीकडून विमा हप्त्यांच्या स्वरुपात जमा केल्या जाणाऱ्या रकमेतून ज्या व्यातीचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा (Insurance) होय.

Insurance is a social device providing financial compensation for the effects of misfortune, the payment being made from the accumnlated contributions of all parties participating in the scheme."

विमा पॉलिसी म्हणजे काय? | Insurance Policy Meaning In Marathi

ज्यावेळी आपण संभाव्य धोके किंवा येणारे संकट लक्षात घेऊन विमा काढण्याचे ठरवितो, तेव्हा विमा काढण्यासाठी आपल्याला विमा कंपन्याचे वेगवेगळे फिचर त्याला आपण मिळणारे लाभ लक्षात घेऊन आपण संबंधित विमा कंपनीचा विमा काढतो. आता विमा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. याबद्दलची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे. तर विमा काढण्यासाठी आपल्याला योग्य विमा कंपनीची निवड करावी लागते. प्रत्येक विमा काढणाऱ्या कंपनीच्या वेगवेगळ्या अटी आणि शर्ती असतात. त्यानुसार आपण विमा कंपनीच्या नियमांची माहिती घेऊनच योग्य कंपनीचा विमा काढावा लागतो. विमा म्हणजे काय? हे आपण वाचले आता विमा पॉलिसी म्हणजे काय? (Insurance Policy Meaning In Marathi) हे सोप्या भाषेत मराठीत समजून घेऊया.

विमा पॉलिसी म्हणजे विमा काढल्यानंतर जी कंपनीची विमा रक्कम आणि अटी व शर्ती असतात. त्या प्रत्येक विमा कंपनीच्या वेगवेगळ्या असतात. या दस्ताऐवजाना 'विमा पॉलिसी' (Insurance Policy) असे म्हणतात.

विम्याची आवश्यकता का आहे? | Why is Need Of Insurance 

आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या कितीही लहान अथवा मोठ्या व्यक्तिंची गणना समाजात राहत असताना सामान्य व्यक्ती म्हणूनच केली जाते. श्रीमंत, गरीब किंवा सर्वसामान्य व्यक्ती हा आपापल्या परीने आपल्या ठिकाणी योग्यच असतो. आणि प्रत्येक जण पुढच्या पायरीवर जाण्यासाठी धडपडत असतो. म्हणजेच काय तर आहे त्या परिस्थितीशी सामना करीत अजून थोडे श्रीमंत होण्यासाठी एका अर्थाने आपल्या कुटुंबाना सुखी समाधानी ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतो. प्रत्येक जण कामानिमित्त , नोकरी, व्यवसाय, व्यापार, बाजारपेठ, धर्मस्थळ, सामाजिक संस्था, कला किंवा क्रीडा क्षेत्र, संगीत क्षेत्र किंवा सार्वजनिक उद्यान इ. ठिकाणी वावरत असतो. निसर्गामध्ये मानवाच्या जीवितास केव्हा आणि कधी धोका निर्माण होईल हे सांगता येत नाही. अपघातामुळे अपंगत्व येणे किंवा मृत्यू येण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम अशा व्यक्तीवर अवलंबून असणारी त्याची पत्नी, मुले किंवा आई वडीलांना आर्थिक झळ सोसावी लागते. व्यक्तीला अपंगत्व आल्यास त्याला असाहाय्य असे जीवन जगावे लागते. अशा परिस्थितीवर विमा हा उपाय ठरतो. मृत्यू किंवा अपंगत्व टाळता येत नसले तरी त्याची तिव्रता कमी करण्याच्या दृष्टीने विमा आवश्यक आहे.

विम्याचे आर्थिक महत्व | Economic Significance of Insurance

विमा हा प्रत्येक व्यक्तीला आजच्या युगामध्ये खूप महत्वाचा बनलेला आहे. मात्र अजूनही काही जणांना विम्याचे महत्व किंवा फायदे सविस्तरपणे माहिती नाही. आता आपण विम्याचे आर्थिक महत्व कसे आहे. (Economic Significance of Insurance) याविषयी जाणून घेऊया.

बचतीस प्रोत्साहन

विमा योजनेमध्ये केलीली बचत ही मुदतीपूर्वी सहजपणे काढता येत नाही. त्याचबरोबर आपण जो विम्याचा हप्ता ठरवलेला असतो. जसे की तिमाही , सहामाही किंवा वार्षिक विमा हप्ता नियमितपणे भरावा लागतो. त्यामुळे एक प्रकारे पैसे बचत करण्यास काटकसरची सवय लागते.

रोजगार निर्मिती

विमा हा एक प्रकारचा व्यवसाय देखील आहे. म्हणजे लाभार्थ्यांना लाभ मिळतोच, त्याचबरोबर विमा खरेदी-विक्री करण्यासाठी तसेच लोकांना विमा बाबत जनजागृती करण्यासाठी विमा कंपन्या विमा प्रातिनिधी, अधिकारी वर्ग, प्रशासकीय कर्मचारी यांची नेमणूक करतात त्यामुळे लोकांना एक प्रकारे रोजगार उपलब्ध झालेला आहे.

व्यापार व उद्योगांचा विकास

विम्याच्या संरक्षणामुळे देशांतर्गत व्यापार व उद्योगांचा विकास झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार व मोठ मोठे उद्योग सुरू करण्याचे धाडस व्यावसायिक व उद्योजक करू लागले आहेत. आधुनिक काळात धोक्याचे व नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. विविध धोक्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई विमा करीत असल्यामुळे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास झाला आहे.

कृषिक्षेत्राचा विकास 

भारत हा कृषि प्रधान देश असून भारतीय शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. अतिवृष्टी, अवर्षण, रोगराई अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. पीक विमा योजनेद्वारे विमा कंपनी नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांचे झालेले नुकसान भरून देते. पशुपालन, कुकुटपालन, रेशीम उद्योग यासारख्या कृषीपूरक उद्योगांनाही विमा संरक्षण मिळाल्यामुळे कृषीक्षेत्राचा विकास झाला आहे. विमा व्यवसायातील निधी सरकार धरणे बांधणे, कालवे खोदणे, विजनिर्मिती इत्यादीसाठी वापरते. यामुळे देशातील उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासास मदत झाली आहे.
  • व्यवसायात सातत्य
  • परकीय चलन प्राप्तीत वाढ
  • संग्रहण क्षेत्राचा विकास 
  • भांडवल बाजाराचा विकास 
  • कर्जे व ठेवींना सुरक्षितता 
  • वाणिज्य क्षेत्रास आर्थिक प्रेरणा
  • व्यापाऱ्यांना स्थैर्य 
  • औद्योगिक विकासाला प्रोत्साहन
  • विदेशी व्यापारात वाढ
  • महत्वाच्या व्यक्तीचा विमा 
  • नुकसानीची संभाव्यता कमी करणे
  • मालमत्तेच्या तारण मूल्यात वाढ
  • नुकसान प्रतिबंध उपायांना प्रोत्साहन
  • कर्मचाऱ्यांचे हित रक्षण
  • कायदेशीर जबाबदारीची तरतूद

विम्याचे महत्व | Importance Of Insurance 

 Insurance हा एक प्रकारे प्रत्येकासाठी एक सुरक्षा कवच आहे. विमा कोणत्या गोष्टीचा काढला जातो. याबबत आपण पुढे बघणारच आहोत. विमा कोणत्याही गोष्टीचा काढणे म्हणजे एक प्रकारे सुरक्षिततेची हमी मिळवणे. यामुळे विम्याला खूप महत्वाचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले आहे. थोडक्यात कुटुंब आनंदी सुखी ठेवण्यासाठी , आर्थिक नियोजन बिघडू नये किंवा पश्चात जीवन जगण्याची हमी आपल्याला विमा देत असते. एवढे महत्व विम्याला प्राप्त झालेले आहे.

विमा पॉलिसी फायदे  Insurance Policy Benefits In Marathi

  • आपत्कालीन घटना किंवा नैसर्गिक संकट आल्यास सुरक्षितता मिळते.
  • नुकसान भरपाई मिळते.
  • आर्थिक नियोजन बिघडत नाही.
  • पैसे बचत करण्याची सवय लागते.
  • पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक  करता येते. त्यामुळे परताव्याची देखील हमी मिळते.
  • भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन करता येते.
  • नोकरी, व्यवसाय, व्यापार करण्यास प्रोत्साहन मिळते.
  • कठीण/अवघड काम करण्याची हिम्मत विम्यामुळे प्राप्त होते.
  • कुटुंबाची असलेली जबाबदारी पार पाडता येते.
  • सेवानिवृत्ती विमा योजनेतून ठराविक कालावधी नंतर पेन्शन मिळते.
अशा प्रकारे विमा प्रकार निहाय विम्याचे खूप सारे फायदे आहेत. आणि कोणत्याही योजनेचे काही तोटे देखील असतात. जसे की, विमा योजनेमध्ये महत्वाचे कवच हे सरंक्षण आपल्याला विम्यातून मिळते. मात्र पैसे वाढवण्यासाठी केलेली गुंतवणूक  ही इतर माध्यमातून केली जाऊ शकते. जसे की, शेअर मार्केट , म्युच्युअल फंड, क्रेप्टोकरन्सी असे विविध मार्ग आहेत. मात्र विमा योजनेतून आपल्याला सुरक्षितता प्रधान होते.

विम्याचे प्रकार | Types of Insurance in Marathi 

विम्याचे मुख्य तीन प्रकार त्यामध्ये व्यक्तिगत विमा (Personal Insurance)  , मालमत्तेचा विमा (Property Insurance) आणि हमी विमा  (Gurrantee Insurance) असे तीन प्रकार पडतात.
  1. व्यक्तिगत विमा (Personal Insurance) 
  2. मालमत्तेचा विमा (Property Insurance)
  3. हमी विमा  (Gurrantee Insurance)

व्यक्तिगत विमा (Personal Insurance) 

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याचा विमा उतरविते तेव्हा अशा विम्याला व्यक्तिगत विमा (Personal Insurance) असे म्हणतात. याला आयुर्विमा (Life Insurance) किंवा जीवन विमा असेही म्हटले जाते. 
व्यक्तिगत विमा (Personal Insurance) अंतर्गत विमेदारास अकाली मृत्यू, अपघात अथवा आजारपण यामुळे होणाऱ्या संभाव्य हानीविरुद्ध विमा संरक्षण दिले जाते.
  • या विमा कराराला नुकसान भरपाईचे तत्त्व लागू होत नाही. 
  • विमेदाराच्या मृत्युमुळे कुटुंबाच्या होणाऱ्या हानीची पैशात मोजदाद करता येत नाही.
  • त्यामुळे विमेदार आपल्या जीवनाचा कितीही रकमेचा विमा घेऊ शकतो. 
  • अर्थात असे असले तरी विम्याचा प्रकार आणि विमेदाराची हप्ते भरण्याची कुवत विचारात घेऊन विमा रक्कम निश्चित केली जाते.

व्यक्तिगत विमा (Personal Insurance) प्रकारामध्ये पुढील विमा प्रकारांचा समावेश होतो.

  1. आयुर्विमा  - १) आजीवन विमा  २) हयातीतील विमा 
  2. व्यक्तिगत अपघात विमा
  3. स्वास्थ्य विमा

१) आयुर्विमा | Life insurance

व्यक्तीच्या जीवनाचा किंवा आयुष्याचा घेतलेला विमा म्हणजे आयुर्विमा (Life Insurance) होय. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःच्या आयुष्यात अमर्याद आर्थिक हितसंबंध असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा कितीही रकमेचा विमा उतरू शकते. या विमा करारास नुकसान भरपाईचे तत्त्व लागू होत नाही. आयुर्विम्याचे आजीवन विमा (Life Insurance) आणि हयातीतील विमा (Term Insurance) असे दोन प्रमुख प्रकार पडतात.

१) आजीवन विमा | Life Insurance In Marathi

या प्रकारात विमेदाराच्या संपूर्ण आयुष्याचा विमा (Life Insurance) उतरला जातो. विमेदाराला आयुष्यभर हप्ते भरावे लागतात. विमा रक्कम त्याला स्वतःला मिळत नाही. तर ती त्याच्या मृत्यूनंतर वारसांना दिली जाते.

२) हयातीतील विमा | Term Insurance In Marathi

याला मुदती विमा असेही म्हणतात. व्यक्ती ठराविक मुदतीचा विमा (Term Insurance) घेते. ही मुदत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण विमा रक्कम व इतर सर्व लाभ विमेदारास दिले जातात. परंतु जर दुर्दैवाने मुदतीपूर्वी विमेदाराचे निधन झाल्यास हे सर्व लाभ वारसास दिले जातात.

२) व्यक्तिगत अपघात विमा | Personal Accident Insurance

या मध्ये विमेदारास अपघाताने अपंगत्व आल्यास त्यास व अपघाती मृत्यू झाल्यास वारसाना विमा रक्कम दिली जाते. विमेदारास मिळणाऱ्या भरपाईचे प्रमाण हे अपघाताने होणाऱ्या शारीरिक हानीच्या प्रमाणावर अवलंबून असते.

३) स्वास्थ्य विमा | Health Insurance

Health insurance विम्या अंतर्गत व्यक्ती वैद्यकीय खर्चाची तरतूद करू शकते. भविष्यकाळातील आजारपण, शस्त्रक्रिया, दवाखान्यातील खर्च, औषधोपचार इ. ची तरतूद या विमापत्राद्वारे करता येते.

२) मालमत्ता विमा (Property Insurance)

मालमत्ता विमा (Property Insurance) म्हणजे व्यक्ती किंवा संस्था अनपेक्षित घटनेमुळे आपल्या मालमत्तेस होणाऱ्या संभाव्य नुकसानीविरुद्ध विमा घेते. त्यास मालमत्ता विमा (Property Insurance) असे म्हणतात. 
  • Property Insurance विमाद्वारे विमा कंपनी विमित मालमत्तेचे करारातील समाविष्ट कारणामुळे झालेल्या हानीची भरपाई करण्याचे मान्य करते. 
  • मालमत्ता विमा कराराला विम्याची सर्व तत्त्वे लागू होतात.
  • विमित मालमत्तेचे विमा विषयामुळे विमा रकमेच्या मर्यादेत जितके नुकसान झाले असेल तेवढीच रक्कम भरपाई म्हणून दिली जाते. 
  • या मालमत्तेत व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध असतील म्हणजेच विमेय हित असेल अशा मालमत्तेचाच विमा घेता येतो. 
  • तसेच विमा घेतला नसता तर व्यक्तीने मालमत्तेची जेवढी काळजी घेतली असती तेवढी त्याने विमा घेतल्यनांतरही घ्यावी. तसेच मालमत्तेस कांही कारणाने हानी होत असेल तर ती कमी करण्याचा प्रयत्न विमेदाराने केला पाहिजे. 

मालमत्ता विमा प्रकार (Property Insurance)

मालमत्ता विमा प्रकार (Property Insurance) अंतर्गत खालीलप्रमाणे विमा प्रकारांचा समावेश होतो.
  • अग्निविमा करार
  • सागरी विमा करार
  • पीक विमा 
  • जनावरांचा विमा 
  • मोटार विमा
  • दंगल अथवा दरोडा विमा 
  • प्रवासी साहित्याचा विमा 
मालमत्ता विमा प्रकारामध्ये खालील मालमत्तेचा विमा काढता येतो.
  • घर
  • ऑफिस
  • फर्निचर 
  • घरगुती वस्तू 
  • दागिने 
  • कच्चा माल
  • यंत्रसामुग्री
  • उपकरणे
  • वाहने 
  • संग्रहण गृहे 
त्याचबरोबर अशा अनेक प्रकारच्या मालमत्तेचा विमा घेता येऊ शकतो.

३) हमी विमा (Gurrantee Insurance)

हमी विमा (Gurrantee Insurance) म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अथवा संस्थेच्या विहित जबाबदारीविरुद्ध केलेला विमा करार होय. उद्योग व्यवसायाच्या वाढत्या व्यापातून हा विमा प्रकार उदयास आला. आज बहुतांश व्यापार विश्वास व उधारीवर चालतो. जर अशी उधारी वसूल झाली नाही तर आर्थिक नुकसान होते. तसेच जर एखाद्या व्यक्तीने बँकेचे कर्ज घेतले असेल आणि त्याची परतफेड केली नाही तर बँकेचे आर्थिक नुकसान होते. अशा प्रसंगात बँक कर्जदाराच्या प्रतिष्ठेचा तसेच व्यापारी गि-हाईकाच्या प्रतिष्ठेचा विमा घेऊ शकते. उद्योग व व्यावसायिक अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कर्मचाऱ्यावर सोपवतात. अनेकदा अशा कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार किंवा आर्थिक फसवणूक होऊ शकते, कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळे होणाऱ्या नुकसानी विरुद्ध हमी विमा उतरविता येतो.

या विमा कराराद्वारे विमा कंपनी धनकोची ऋणकोकडून रक्कम वसूल करण्याची अथवा वसूली न झाल्यास हानी भरपाईची रक्कम स्वतः देण्याची जबाबदारी स्वीकारते.

थोडक्यात विमा कंपनी या विमा कराराद्वारे विमेदारास तृतीय पक्षाचा विश्वास आणि प्रामाणिकपणाच्या वर्तणुकीबाबत हमी देते. हा विमा बँका व पतसंस्था आपल्या कर्जदारांचा, उद्योजक व व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्यांचा व ऋणकोंचा विमा घेणे पसंत करतात. प्रामुख्याने यामध्ये प्रामाणिकपणाची हमी, वाणिज्य विषयक हमी, शासकीय हमी, न्यायालय हमी, पतहमी इ. चा समावेश होतो.

सारांश 

जीवनामध्ये संभाव्य धोके आणि संकट लक्षात घेऊन आपल्याला संबंधित विम्याची आवश्यकता भासत असते. विमा काढण्याआधी विमा आणि विमा पॉलिसी म्हणजे काय? त्याचा अर्थ ( Insurance Policy Meaning In Marathi) आणि गरज लक्षात घेतली तर आपल्याला योग्य विमा कंपनीचा विमा काढता येतो. जेणेकरून भविष्यातील संभाव्य घटना नुकसानभरपाई म्हणून एक सरंक्षण आपल्याला विम्यातून मिळत असते. आपल्याला जर विमा म्हणजे काय? त्याचे आपल्या आयुष्यात महत्व काय आहे?  विम्याचे विविध प्रकार कोणते आहे? (Types of Insurance in Marathi) हे जाणून घेण्यासाठी हा लेख अवश्य वाचा याबद्दलची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे. जेणेकरून आपण जर  विमा पॉलिसी Insurance Policy घेणार असाल तर यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे.

(Disclaimer - विमा संदर्भात ही प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्ष विमा काढण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.)

वेबसाईटरील लोकप्रिय आर्टिकल येथे वाचा


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now