सुकन्या समृद्धी योजना (SSY) 2023 पात्रता, व्याजदर, कॅल्क्युलेटर संपूर्ण माहिती | Sukanya Samriddhi Yojana In Marathi

Sukanya Samriddhi Yojana In Marathi : सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही केंद्र शासनाची मुलींच्या कल्याणासाठी सुरु केलेली एक महत्वाकांक्षी सरकारी योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेत मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी  मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरदूत करण्याची व्यवस्था सुकन्या समृद्धी योजनेत मिळते. केंद्र शासनाने सुकन्या समृध्दी योजना (Sukanya Samriddhi Yojana) २२ जानेवारी २०१५ रोजी सुरु केलेली आहे. केंद्र शासनाने मुलींच्या कल्याणासाठी सुरु केलीली योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना या योजनेलाच सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Account) म्हणून देखील ओळखले जाते.  प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांना मुलीच्या भविष्याची चिंता असते. त्याप्रमाणे पालक मुलींच्या जन्मापासूनच मुलींच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक सुरु करतात. त्यामध्ये एल आय सी (LIC) , शासकीय योजना मध्ये गुंतवणूक करून आर्थिक नियोजन करतात. आणि हे प्रत्येक पालकांसाठी योग्य निर्णय असतो. आज केलेली गुंतवणूक उद्याच्या भविष्यात योग्य वेळी याची मदत होते. आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक नियोजन व्यवस्थित असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना समाधान प्राप्त होते. मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठीची गुंतवणूक जर पालकांनी मुलीच्या जन्मापासून केली तर योग्य वेळी त्याचा योग्य परतावा मिळतो. आज अशाच एका महत्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. केंद्र शासनाची सुकन्या समृद्धी योजना (SSY) 2022 माहिती (Sukanya Samriddhi Yojana 2023 In Marathi) सुकन्या समृद्धी योजनेची माहिती पाहणार आहोत, Sukanya Samriddhi Yojana 2023 या योजनेचे फायदे काय आहेत? सुकन्या योजनेतून मुलीच्या शिक्षणाला किंवा लग्नासाठी परतावा किती मिळणार? सुकन्या योजनेत अर्ज कसा करावा? शासनाकडून सुकन्या समृद्धी योजनेसाठी किती टक्के व्याजदर दिला जातो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरासाठी हा लेख अवश्य वाचा.


{tocify} $title={ठळक मुद्दे}


Sukanya Samriddhi Yojana In Marathi


सुकन्या समृद्धी योजना (SSY) 2023 माहिती मराठी Sukanya Samriddhi Yojana In Marathi

सुकन्या समृद्धी योजना (SSY) 2023, (PMSSY) सुकन्या समृद्धी खाते 

सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश

सुकन्या समृद्धी योजना (SSY) किंवा सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Account) PMSSY ही योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नविन जन्मलेल्या मुलींसाठी त्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठी व लग्नासाठी प्रोत्साहन देणारी शासनाची सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आहे. 

बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेंतर्गत सुकन्या समृद्धि योजना केंद्र सरकारने २०१५ पासून सुरू केलेली आहे. या योजनेत पालक आपल्या मुलीसाठी भविष्यातील उच्च शिक्षण आणि विवाह करण्यासाठी पैशांची बचत करून शासनांकडून दिला जाणारा व्याजदर यांचा लाभ घेऊन मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणारी Sukanya Samriddhi Yojana आहे.

यामुळे मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक विचार रुजवण्यास मदत होईल, बालिका भृणहत्या रोखण्यास मदत होईल, मुलींचा जन्मदर वाढेल, मुलींचा जन्म हा पालकांसाठी ओझ नसून पालकांसाठी अभिमान असेल, मुलींच्या पालकांना असणारी मुलींच्या भविष्याची चिंता या योजनेतून दूर होईल आणि मुलींचे भविष्य उज्ज्वल होईल या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजना (SSY) 2023 , (PMSSY) सुकन्या समृद्धी खाते योजना सुरु करण्यात आलेली आहे. 

हे ही वाचा

📌 माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संपूर्ण माहिती

📌 अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

📌 संजय गांधी निराधार पेन्शन योजना | Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana

📌 सरकारी योजना

सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये Features of Sukanya Samriddhi Account

 • सुकन्या समृद्धी योजनेत मुलीचे वय  १० वर्ष होईपर्यंत कधीही SSY सुकन्या समृद्धी खाते काढता येते.
 • एका मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यामध्ये एका वर्षात कमीत कमी रु. २५० जमा करावे लागतात. (वर्षभरात किमान २५० रु न भरल्यास ५० रु दंड भरून खाते पुन्हा सक्रीय करता येते.)
 • एका मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यामध्ये एका वर्षात जास्तीत जास्त रु.१.५ लाख जमा करता येतात.
 • एका मुलीसाठी फक्त एकच सुकन्या समृद्धी खाते (SSY) काढता येते.
 • सुकन्या समृद्धी खाते हे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँक किंवा काही खाजगी बँकांमध्ये आणि पोस्ट ऑफिस मध्ये देखील SSY खाते काढता येते.
 • सुकन्या समृद्धी खाते हे केंव्हाही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये ट्रान्सफर करता येते.
 • सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेली रक्कम ही करपात्र असते. Income Tax कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत रु. १.५ लाखांपर्यंत सवलत मिळते. (मिळालेले व्याज + मॅच्युरिटी वरील रक्कम देखील करमुक्त असते.)
 • मुलीचे वय १८ वर्ष झाल्यानंतर SSY खात्यावर मुलीचा पूर्णपणे अधिकार येतो.
 • मुलीचे वय १८ वर्ष झाल्यानंतर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी SSY खात्यातून ५०% रक्कम काढता येते. (लग्न करवयाचे असल्यास उर्वरित रक्कम  पुढे केव्हाही (२१ वर्षे मुदत संपेपर्यंत )काढ़ता येते.)
 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत SSY खात्यावरील मिळणारे व्याज हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारावर अवलंबून असतो. भारत सरकार वेळोवेळी व्याजदर जाहीर करते.
 • Sukanya Samriddhi Yojana सुरु झाल्याच्या वर्षी व्याजदर हा ९.१% होता. चालू वर्षातील SSY व्याजदर हा ८ % मिळत आहे.
 • सुकन्या समृद्धी खात्यामध्ये ठेवीचा कालावधी हा २१ वर्षाचा आहे.
 • SSY Maturity Period हा मुलीचे SSY खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो.
 • सुकन्या समृद्धी खाते मॅच्युरिटीनंतर बंद न केल्यास, शिल्लक रकमेवर व्याज मिळत राहते. मात्र 21 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मुलीचे लग्न झाल्यास खाते आपोआप बंद होते.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे (PM Kanya Yojana योजनेचे लाभ कोणते?) Sukanya Samriddhi Yojana Benefits In Marathi, 

मुलीच्या कल्याणकारी भविष्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते. त्यामध्ये कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शासकीय योजना किंवा खाजगी कंपनीच्या योजना प्रत्येक योजनेत काही फायदे व तोटे असतात. पालक मुलीच्या भविष्याचा विचार करून कशा प्रकारे आपल्याला मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी लाभ मिळणार आहे. याची माहिती आपण घेत असतो. सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे कोणते आहेत. ते पाहूया.
 • सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या शिक्षण व लग्नासाठी साठीची योजना आहे. त्यामुळे या योजनेत मुलींच्या शिक्षण व लग्नासाठीचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करते.
 • SSY या योजनेत शासनाकडून जाहीर केल्या प्रमाणे व्याजदर मिळत राहतो. ही योजना शासनाची असल्याने सुरक्षित व्याजदर मिळेल याचा विश्वास मिळतो.
 • या योजनेमध्ये सरकारकडून पैशाची हमी दिली जाते. म्हणजेच आपण केलेली गुंतवणूक ही सरकारकडून सुरक्षित झालेली आहे. 
 • SSY सुकन्या समृद्धी खात्यातील एकुण जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळतो.
 • SSY योजनेत शासनाकडून मिळणारे व्याज व योग्य वेळी मिळणारा मोबदला अर्थात पैशाची हमी मिळते.
 • मुलीच्या कल्याणासाठी कमीत कमी रक्कम आपण भरून मुलीच्या भविष्यासाठी बचत करू शकतो. (कमीत कमी रू. २५० भरून आपण मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकतो.)
 • कुटुंबातील किमान दोन मुलीना (जुळ्या असल्यास ३) सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
 • कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये SSY सुकन्या समृद्धी खाते उघडता येते.
 • SSY ही योजना २१ वर्षाची जरी असेल मात्र मुलीच्या वयाच्या १५ वर्षापर्यंतच पैसे भरावे लागतात.
 • मुलीच्या उच्च शिक्षणासाठी वयाच्या १८ व्या वर्षी जमा रकमेच्या ५०% रक्कम काढता येते.

सुकन्या समृद्धी योजनेचे तोटे Sukanya Samriddhi Yojana Disadvantages

ज्या प्रमाणे कोणत्याही योजनेचे जसे फायदे असतात. तसे तोटे देखील आपल्याला पाहायला मिळते. SSY योजनेचे Sukanya Samriddhi Yojana Disadvantages खालीलप्रमाणे.
 • सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी हा २१ वर्षाचा आहे. म्हणजेच मुलीचे किमान वय १८ वर्ष होईपर्यंत पैसे काढता येत नाही. (फक्त ५०% रक्कम किंवा लग्नासाठी १००%)
 • SSY योजनेचा व्याजदर हा इतर योजनेपेक्षा कमी मिळतो मात्र सुरक्षित असतो. आपण जर म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधे  गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभाची तुलना केल्यास व्याजदर कमी आहे.
 • या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणूक फक्त 1.5 लाख आहे. परंतु या पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास जास्त रकमेवर व्याज जास्त मिळत राहते.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) संदर्भात अधिक माहिती आपण जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावून सविस्तर माहिती घेऊनच आपला योग्य निर्णय घ्यावा. जेणेकरून आपला योग्य निर्णय हा मुलीच्या कल्याणाची हमी देईल.

सुकन्या समृद्धी योजना तपशील Sukanya Samriddhi Yojana Details

 • लाभार्थी कोण - मुलगी
 • वयोगट - मुलीच्या जन्मापासून ते वय वर्ष १० पूर्ण होईपर्यंत कधीही SSY खाते उघडता येते.
 • किमान ठेव  - रु. २५० प्रति वर्ष
 • SSY मध्ये कमाल ठेव - रु. १.५ लाख प्रति वर्ष 
 • सुकन्या समृद्धी योजना व्याजदर Sukanya Samriddhi Yojana Interest Rate - सुकन्या समृद्धी योजना व्याजदर 2023 24 हा 8 % मिळत आहे. (भारत सरकार वेळोवेळी व्याजदर जाहीर करते.) 
 • ठेव मॅच्युरिटी कालावधी - SSY खाते उघडल्यापासून २१ वर्ष
 • मुद्पूर्व पैसे काढणे - मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुदतपूर्व पैसे काढता येतात. (शिल्लक रकमेतून ५०%)
 • सुकन्या समृद्धी खाते पुन्हा सक्रिय करणे - रु. ५० दंड भरून SSY खाते पूर्ववत करता येते.
 • कर्ज सुविधा - कर्ज सुविधा उपलब्ध नाही.

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी Sukanya Samriddhi Yojana Eligibility

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Sukanya Samriddhi Yojana Documents Required खालीलप्रमाणे

 • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १० वर्षापेक्षा जास्त नसावे. 
 • कुटुंबामधील दोन मुली (जुळ्या असल्यास ३) मुली SSY योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • लाभार्थी हे भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
 • मुलीचे जन्म प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
 • पालकांचा ओळख व पत्ता पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र , वीज बिल, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)

सुकन्या समृद्धी खाते उघडायची पद्धत Sukanya Samriddhi Yojana application process

सुकन्या समृद्धी योजने साठी सुकन्या समृद्धी खाते SSY आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा आर बी आय ने जाहीर केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत जावून खाते उघडता येईल. 

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत Post Office Sukanya Samriddhi Yojana Details In Marathi

 • Sukanya Samriddhi Yojana Post Office मध्ये जर आपणास खाते उघडायचे असल्यास पोस्ट ऑफिस ला भेट द्या.  
 • सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म भरून सर्व कागदपत्रे घेऊन आपण मुलीच्या नावे SSY खाते उघडून घ्यावे. 
 • Post Office Sukanya Samriddhi Yojana Form Download करा.
 • खाते उघडताना किमान रु २५० भरावे. 
 • खाते उघडल्यानंतर आपणास एक पासबुक दिले जाईल त्याद्वारे आपण SSY खात्याची संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवू शकाल.
 • पोस्ट ऑफिस च्या मोबईल बँकिंग द्वारे देखील आपण SSY खात्यामध्ये पैसे भरू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँकेत अर्ज करण्याची पद्धत Sukanya Samriddhi Yojana Details In Marathi

 • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा.
 • सदर SSY फॉर्म व्यवस्थित भरून कागदपत्रे घेऊन पुन्हा बँकेत जावून SSY खाते उघडून घ्यावे.
 • सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान २५०/- रुपये जमा करावे लागतील.
 • खाते उघडल्यावर लाभार्थ्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाते. ज्यामध्ये खातेदाराला १५ वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतात.
 • सदर बँकेत आपण मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे ऑनलाईन पैसे भरू शकता.

सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर Sukanya Samriddhi Yojana Calculator

कोणत्याही प्रकारची बचत योजनेतून आपल्याला काय मिळणार? किती फायदा होणार? याची माहिती आपण प्रथम घेणे आवश्यक असते. सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर च्या द्वारे एका उदाहरणातून आपण SSY योजनेतून मिळणारा लाभ किती मिळणार हे समजून घेऊया. Sukanya Samriddhi Yojana Calculator मध्ये गणना करण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे. 
 • मुलीचे वय 
 • एकुण वार्षिक गुंतवणूक रक्कम
 • चालू वर्षातील व्याजदर 
 • याद्वारे आपण सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर मॅच्युरिटी रकमेचा अंदाज घेऊ शकतो. (व्याजदर बदलत असतो. त्यानुसार रक्कम कमी किंवा जास्त होऊ शकेल)
उदा. 
 • समजा आज आपल्या मुलीचे वय ४ वर्ष आहे. आणि आजपासून आपण सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या भविष्यासाठी बचत करू इच्छिता.  
 • वार्षिक मुलीच्या नावे आपण SSY खात्यामध्ये १२००० रुपये बचत करणार आहे. (महिन्याला १००० रुपये)  
 • Start Period सन २०२२ या वर्षी बचत सुरु करणार आहात.
 • सध्याचा Sukanya Samriddhi Yojana Interest Rate हा ८ % सुरु आहे. (SSY योजनेमध्ये व्याज हे चक्रवाढ पद्धतीने दिले जाते.)
यानुसार आपल्याला मिळणारा लाभ खालीलप्रमाणे
 • एकुण गुंतवणूक - १,८०,०००
 • एकुण व्याज - ३,२९,२१२
 • Maturity Year - २०४२
 • एकुण मिळणारी रक्कम - ५,०९,२१२
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत आपण जितकी जास्त रक्कम गुंतवणूक करू तितका जास्त परतावा आपल्याला २१ वर्षानंतर मिळतो.

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संपूर्ण माहिती

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत वारंवार विचारले जाणारे प्रश्न Frequently Asked Questions Sukanya Samrudhi Yojana


प्रश्न १. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कमीत कमी किती रक्कम भरावी लागते?
उत्तर- सुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्यामध्ये वार्षिक कमीत कमी रु. २५० भरावे लागतात.

प्रश्न २.  सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती रक्कम भरावी लागते?
उत्तर- सुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्यामध्ये वार्षिक जास्तीत जास्त रु. १.५ लाख (दीड लाख) पर्यंत रक्कम भरता येते.

प्रश्न ३. सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे.
उत्तर- सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी आहे. मुलींच्या शिक्षण व लग्नासाठी पालक आपल्या मुलीच्या वयाच्या १० वर्षाच्या आत मध्ये SSY खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडू शकतात.

प्रश्न ४. सुकन्या समृद्धी योजनेत व्याजदर किती आहे ?
उत्तर- सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर  (Sukanya Samriddhi Yojana Interest Rate 2023) हा ८ % आहे. भारत सरकार वेळोवेळी हा व्याजदर जाहीर करीत असते.

प्रश्न ५. सुकन्या समृध्दी योजना खात्यात पैसे कसे जमा करावे?
उत्तर- सुकन्या समृद्धी योजना SSY खात्यामध्ये पैसे चेक ने किंवा प्रत्यक्ष बँकेत जावून डिपोझीट स्लीप द्वारे किंवा मोबाईल बँकिंग , इंटरनेट बँकिग द्वारे पैसे जमा करता येते.

प्रश्न ६. कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्या परिस्थितीत सुकन्या समृद्धि खाते बंद केले जाऊ शकते?
उत्तर- मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर मुलीचे लग्न करावयाचे झाल्यास सुकन्या समृद्धी खाते बंद करता येते. 

सारांश

मुलीच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजना या सरकारी योजनेची माहिती आज आपण घेतली. यामध्ये मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बचत योजना म्हणून पालक मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात. याद्वारे मुलीच्या उज्वल भविष्यासाठी या योजनेत गुंतवणूक करता येते. SSY या सरकारी योजना मध्ये चक्रवाढ पद्धतीने व्याजदर दिला जातो. मुलीच्या वयाच्या १८ व्या वर्षी ५०% रक्कम काढता येते. याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. सुकन्या योजना माहिती, फायदे व तोटे यावर देखील प्रकाश टाकलेला आहे. Sukanya Samriddhi Yojana Calculator द्वारे रक्कम किती मिळेल? हे देखील आपण समजावून घेतले आहे. Sukanya Samriddhi Yojana Interest Rate 2022 किती टक्के मिळतो. त्यासाठी लागणारे कागदपत्रे , अर्ज कोठे करावा? कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे.अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत जावून सुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्याविषयी माहिती घेऊ शकता.

सरकारी योजना

नवनविन अपडेट साठी  Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

                    

Previous Post Next Post