समाज कल्याण दिव्यांग शिष्यवृत्ती योजना संपूर्ण माहिती

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE ACT 2009) नुसार वयोगट सहा ते चौदा तसेच दिव्यांगासाठी 6 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.  या कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याचा पुर्ण हक्क प्राप्त झाला असून, त्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन स्तरावरून सातत्याने प्रयत्न होत आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार देखील या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्यामध्ये समावेशित शिक्षण या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण होत आहे. 

➡️ समावेशित शिक्षण संकल्पना

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य शासनामार्फत शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना. (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना आहे.)  आजच्या आर्टिकल मध्ये इयत्ता १ ली ते १० वीत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे. 

➡️  ऐतिहासिक निर्णय ! दिव्यांग मंत्रालय स्थापन


{tocify} $title={Table of Contents}


समाज कल्याण दिव्यांग शिष्यवृत्ती योजना संपूर्ण माहिती

समाज कल्याण दिव्यांग शिष्यवृत्ती योजना


उद्देश 

समाज कल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या अपंग शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे.

शिष्यवृत्तीचा तपशील 

शिष्यवृत्ती योजनेचा कालावधी हा एका शैक्षणिक वर्षातील १० महिन्यासाठीचा आहे. म्हणजे दर शैक्षणिक वर्षात एकूण १० महिण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. 

अ. क्र.           इयत्ता                    शिष्यवृत्तीचा दर

1.              1 ली ते 4 थी                    रु. 100/- दरमहा 

2.             5 वी ते 7 वी                    रु. 150/- दरमहा

3.             8 वी ते 10 वी                    रु. 200/- दरमहा

4.               मतिमंद                    रु.  150 दरमहा

 • १ ली ते ४ थी साठी एकूण वार्षिक १० महिन्याचे रु. १००० (मतिमंदासाठी रु. १५००)
 • ५ वी ते ७ वी साठी एकूण वार्षिक १० महिन्याचे रु. १५००
 • ८ वी ते १० वी साठी एकूण वार्षिक १० महिन्याचे रु. २०००

अटी व शर्ती - आवश्यक पात्रता

 • विद्यार्थी इ.1 ली ते 10 वी मध्ये कोणत्याही इयत्तेमध्ये शिकणारा असावा. 
 • दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्यांचे किमान 40 टक्के प्रमाणपत्र असावे.
 • दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार 21 प्रकारातील दिव्यांग लाभार्थी अर्ज करू शकतात.
 • शाळेतील किमान उपस्थिती ७५% आवश्यक आहे.
 • (उत्पन्नाची अट नाही.)

➡️ दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम RPWD ACT 2016 नुसार  दिव्यांग २१ प्रकार PDF 

➡️ दिव्यांग प्रमाणपत्र (UDID कार्ड) कसे काढावे? त्याचे फायदे

दिव्यांग (अपंग) शिष्यवृत्ती कागदपत्रे

मागील इयत्तेचे मार्कशीट
शाळेचे बोनाफाईड उपस्थिती प्रमाणपत्र 

दिव्यांग (अपंग) शिष्यवृत्ती फॉर्म PDF

दिव्यांग विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते दहावी साठी समाज कल्याण विभागामार्फत ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म आहे.

या शिष्यवृत्ती साठी पहिल्यांदाच अर्ज करत असल्यास पुढील फॉर्म भरावा लागतो.

1. नविन अर्ज करण्यासाठीचा अपंग शिष्यवृत्ती फॉर्म PDF 

अपंग शिष्यवृत्ती फॉर्म PDF  येथे डाउनलोड करा.

2. मागील वर्षी फॉर्म भरला असल्यास अपंग शिष्यवृत्ती नूतनीकरण फॉर्म PDF  

अपंग शिष्यवृत्ती नूतनीकरण फॉर्म PDF  येथे डाउनलोड करा.

अर्ज कोठे करावा?

दिव्यांग शिष्यवृत्ती फॉर्म भरून शाळेच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्याद्वारे पंचायत समिती समाज कल्याण विभागाकडे सादर करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क

 • शाळेचे मुख्याध्यापक
 • पंचायत समिती (समाज कल्याण विभाग)
 • जिल्हा परिषद (समाज कल्याण विभाग)
 • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग वेबसाईट - येथे क्लिक करा.


हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Previous Post Next Post