मुलांमधील अतिचंचलता लक्षणे व गुणकारी उपाययोजना | How To Control Hyperactive Child (ADHD) In Marathi

मुलांना योग्य संस्कार लावणे हे प्रत्येक पालकांसाठी   एक आव्हान आहे. प्रत्येक पालकांना वाटते की, माझ्या मुलांनी चांगले शिकावे, मोठे होऊन घराचे नाव मोठे करावे, चांगल्या क्षेत्रात करियर करून यशस्वी व्हावे. परंतु मुलांना घडविताना लहान पणापासून वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये म्हणजे मुला-मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलांना चांगले वळण लागण्यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतात. लहान वयात मुलांच्या वागणुकीमुळे खुपदा बरेच पालक हैराण होऊन जातात. त्यामध्ये मुलांमध्ये असलेली चंचलता लक्षात घेता मुले एका जागेवर किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष देत नाही किंवा पालकांनी केलेल्या सूचनांचे पालन करत नाही. मग पालकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे माझ्या मुलाला काही आजार तर नाही ना? साधारणपणे मुलांमध्ये (Hyperactive) अतिचंचलता तर नाही ना?  वैद्यकीय भाषेत ADHD हा एक आजार काही मुलामध्ये प्रकर्शाने जाणवतो. त्यातही कोव्हीड १९ च्या काळात मुले हे घरातच होते. त्यामुळे त्यांच्या भावनांचा कोंडमारा होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मुलांमध्ये Hyperactive अतिचंचलता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आपलेही मुले ही चंचल आहे का? अतिचंचलता म्हणजे काय? Hyperactive child symptoms लक्षणे कोणते आहेत? Hyperactive पणा कमी करण्यासाठी गुणकारी उपाययोजना कोणत्या कराव्यात? यासाठी आजचे आर्टिकल आपल्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत लेख वाचवा.


{tocify} $title={Table of Contents}


मुलांमधील अतिचंचलता लक्षणे व गुणकारी उपाययोजना  | How To Control Hyperactive Child (ADHD) In Marathi

मुलांमधील अतिचंचलता लक्षणे व गुणकारी उपाययोजना


अतिचंचलता म्हणजे काय? | What is Hyperactivity (ADHD)?

ADHD चा Full Form Attention Deficit Hyperactivity Disorder असा आहे.

ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) म्हणजेच अतिचंचलता हा एक लहान मुलामध्ये मेंदूची वाढ होत असताना प्रामुख्याने आढळून येणारा विकासात्मक विकार आहे. साधारणपणे काही मुलामध्ये लहानपाणापासून  या आजाराची लक्षणे सुरू होऊन किशोरावस्थेपर्यंत ती दिसून येतात.

एका सर्वेक्षणानुसार साधारणतः ५% मुलामध्ये ADHD आढळून येतो. मेंदू व शरीरातील रासायनिक असमतोलामुळे या आजाराची लक्षणे दिसून येतात. यामध्ये अतिसक्रियता, आवेग व दुर्लक्ष ही मुख्य लक्षणे आहेत.

अतिचंचलता मध्ये विविध लक्षणे दिसून येतात जसे की, अतिसक्रियेशील (Hyperactivity) प्रकारची लक्षणे , एखाद्या गोष्टीवर दुर्लक्ष ( Inattentive ) करण्यासारखी लक्षणे दिसून येतात. ते खालीलप्रमाणे

अतिचंचलतेचे लक्षणे | Symptoms of Hyperactivity (ADHD)

 1. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित नसणे.
 2. एकाग्रता नसणे. 
 3. घरामध्ये किंवा नातेवाईकांसमोर असभ्य वर्तन समस्या
 4. समवयस्क मुलांच्या तुलनेत वर्तन योग्य नसणे.
 5. आवश्यकता नसेल तेव्हा हसणे, किंचाळणे, ओरडणे इ.
 6. एका जागेवर स्थिर न राहणे. 
 7. सतत हालचाल करत राहणे.
 8. सांगितलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात न राहणे.
 9. शाळेतील अभ्यासातील प्रगती इतर मुलांच्या तुलनेत मागे असणे.
 10. शाळेमध्ये मुलांच्या खोड्या करणे. वर्गातील वस्तू उचलणे, फेकणे
 11. एखाद्या गोष्टीत जास्त वेळ लक्ष राहत नाही.
 12. पालकांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन न करणे. 
 13. खेळताना स्वत: ची वेळ येईपर्यंत संयम न ठेवणे.
 14. दीर्घकाळ एका ठिकाणी न बसने
 15. सतत हालचाल सुरू असणे
 16. शारीरिक अस्वस्थता
 17. वारंवार अपघात, शारीरिक इजा होणे.
 18. रांगेत आपला नंबर येईपर्यंत न थांबणे.
 19. लक्ष केन्द्रित करण्यात अडचण
 20. एक काम पूर्ण होण्या आधी दुसरे सुरु करणे,
 21. एखादी गोष्ट पूर्ण ऐकून न घेणे, विसरणे,
 22. एकायता नसल्यामुळे अभ्यासात मागे पडणे.
 23. विसरभोळेपणा, नवीन गोष्टी शिकण्यात अडचणी.

अतिचंचलता (ADHD) Hyperactive संदर्भातील मानसोपचार तज्ञ यांनी दिलेले अभिप्राय

१. अतिचंचलता (ADHD) या आजारात मनाची पुरेशी एकाग्रता नसणे व एका ठिकाणी ठराविक काळ बसू शकण्याची क्षमता नसणे या लक्षणांसोबतच मनाच्या आवेगपूर्ण इच्छांना मुरड न घालता येणे अशा प्रकारचे वागणे लहान मुलांमध्ये आढळून येते. योग्य वयात निदान व उपचार केल्यास मुलांच्या मेंदूची सर्वांगीण वाढ होऊन पूर्ण क्षमतांचा विकास शक्य आहे. परंतू, तसे न झाल्यास या मुलांची पावले नकळतपणे व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीकडे वळू शकतात.

२. ADHD (अतीचांचालता) हा एकमेव असा बाल मानसिक आजार आहे ज्यामध्ये अतिशय प्रभावीरीत्या उपचार पद्धती उपलब्ध आहे. ADHD चा उपचार करा, ज्याने आपल्या बालकांचे भविष्य बदलू शकते.

३. शाळकरी वयोगटातील मुलांनी साधारणतः सलग २०-३० मिनीटे मनाची एकाग्रता राखणे व स्थिर बसणे आवश्यक आहे. घरी आणि शाळेत या दोन्ही ठिकाणी तसे शक्य होत नसल्यास मुलास ADHD असण्याची शक्यता जाणवते.

>> तारे जमीन पर चित्रपटातील अध्ययन अक्षम ईशानची यशोगाथा

अतिचंचलता मुलांच्या सर्वांगीण विकासावर होणारा परिणाम

लहान मुले नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक /सक्रिय/ चंचल असतात, या गोष्टी वयानुसार कमी होऊन मुलांची एकाग्रता वाढत असते. परंतु अतिसक्रियता किवा अतिचंचलतेमुळे ADHD मुलांना मन एकाग्र करायला. स्वतःच्या चंचलतेवर ताबा ठेवणे शक्य होत नाही. हया लक्षणामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होऊ शकतो. 

त्यांना घरी, शाळेत नवीन गोष्टी शिकण्यास अडचणी येतात. कामे पूर्ण न करू शकणे, स्वतःच्या वस्तु सांभाळता न येणे, नियमांचे पालन न करु शकणे, प्रसंगी वारंवार शाळेत शिक्षकांकडून शिक्षा केली जाते. मूल कितीही सांगून ऐकत नाही, समजत नाही त्यामुळे पालक त्रस्त होतात. योग्य बुद्धिमत्ता असून देखील फक्त अतिचंचलन अतिसक्रिय वागणुकीमुळे अनेक गोष्टीमध्ये ही मुले इतरापेक्षा मागे पडू शकतात. यामुळे कधी कधी त्यांच्यामध्ये हट्टीपणा, राग, चिडचिड तर कधी अपयशामुळे उदासिनता निर्माण होऊ शकते. मुलांच्या वागणुकीचे योग्य परीक्षण व उपाय केले असता या सर्व गोष्टी टाळता येऊ शकतात.


अतिचंचलता वरील उपाययोजना | Hyperactive Child Treatment In Marathi


अतिचंचलता म्हणजे काय? आणि त्याची लक्षणे कोणती असतात? याबद्दलची माहिती आपण घेतली. आपल्या घरातील मुलामध्ये किंवा आजूबाजूला, नातेवाईकांमधील साधारणपणे वय वर्ष १० च्या आतील मुलांमध्ये अशा प्रकारची लक्षणे किमान सतत ६ महिन्यापर्यंत सातत्याने दिसून येत असल्यास त्यांना लवकरात लवकर  बालमानोसपोचार तज्ञाकडुन निदान व उपचार करून घेणे आवश्यक असते.

अतिचंचलता ADHD संदर्भात दोन प्रकारचे उपाय करता येऊ शकतात. त्यामध्ये एक म्हणजे वैद्यकीय (औषधोपचार) आणि दुसरा उपाय  वर्तनोपचार म्हणजे वर्तन समस्येवरील उपचार 

१. वैद्यकीय (औषधोपचार)

मानसोपचार तज्ञ (बालरोगतज्ञ) मुलांच्या वागणुकीचे ADHD पडताळा सूची द्वारे मूल्यांकन करून ADHD चे निदान करत असतात. मुलाच्या मध्ये दिसणाऱ्या लक्षणावरून त्यांचा कालावधी लक्षणे कुठे आढळतात ( घरी/ शाळेत/ सर्वत्र/समाजात), त्याचा मुलाच्या दैनंदिन व सामाजिक आयुष्यावर होणारा परिणाम यावरून ADHD चे निदान केले जाते. आणि योग्य ते औषधोपचार करून वर्तन समस्या कमी करता येतात. औषधे मेंदुमधील रासायनिक असमतोल दूर करून मुलांना एकाग्र होण्यास, वर्तणूकीवर ताबा मिळवण्यास मदत करतात. 

२. वर्तनोपचार

ADHD चे निदान झाल्यानंतर औषधोपचार बरोबर वर्तनोपचार देखील करण्यात येतो. वर्तनोपचारद्वारे पालकांचे समुपदेशन, मुलांशी शिक्षकानी, पालकांनी कसे वागायचे होणाऱ्या चुकांसाठी शिक्षा न करता त्या कश्या टाळता येतील तसेच एकाग्रता वाढण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून मुलाचा वर्तनोपचार केला जातो. योग्य वेळेत निदान व उपचार केल्यास ADHD मुले प्रत्येक क्षेत्रात इतर मुलाप्रमाणे प्रगती करु शकतात.

सारांश 

मुलांमधील अतिचंचलता Hyperactive Child (ADHD) लक्षणावरून आणि त्याची तीव्रता व कालावधी लक्षात घेऊन आपण लवकरात लवकर निदान व उपचार करू शकतो. यासाठी या आर्टिकल मध्ये आपण अतिचंचलतेची लक्षणे कोणती आढळून येतात? ही लक्षणे किमान ६ महिन्याच्या कालावधीत सातत्याने दिसून येत असल्यास निदान व उपचार करण्यासाठी बालरोगतज्ञ आणि मानसोपचार तज्ञ यांची मदत घेऊन गुणकारी उपाययोजना करता येते. याची माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ADHD क्षेत्रातील वैद्यकीय डॉक्टर यांचे अभिप्राय आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर होणारा परिणाम याचा मागोवा मुलांमधील अतिचंचलता लक्षणे व गुणकारी उपाययोजना  (How To Control Hyperactive Child (ADHD)  या आर्टिकल मध्ये घेतला. तेव्हा आशा करतो की, आपणास ही माहिती प्राथमिक निदान करण्यासाठी आणि योग्य उपचार पद्धती साठी महत्वाची ठरली असेल, अशाच नवनवीन अपडेट साठी समावेशित शिक्षण या वेबसाईट ला अवश्य भेट देत रहा.


हे सुद्धा वाचा

Previous Post Next Post