तारे जमीन पर : अध्ययन अक्षम (ईशान) ची प्रेरणादायी यशोगाथा | Tare Jameen Par Inspiration Story

तारे जमीन पर' हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट  सर्वांनी  बघितला असेल, त्यामध्ये ईशान या आठ वर्षाच्या मुलाची कथा दाखवलेली आहे. अध्ययन अक्षमता (learning disability) मधील एक प्रकार म्हणजे डिस्लेक्सिया (Dyslexia) मुळे ईशानाने केलेला संघर्ष साकारण्यात आला आहे. 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) हा चित्रपट खऱ्या अर्थाने अशा मुलांच्या पालकांसाठी व शिक्षकांसाठी प्रेरणादायी चित्रपट आहे. 'तारे जमीन पर' या चित्रपटाला भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली, अनेक पुरस्कार मिळाले. व कौतुकही झाले. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी अध्ययन अक्षमता (learning disability) असणाऱ्या समस्यांशी तोंड देणाऱ्या अशा पालक व शिक्षकांनी आवर्जून  'तारे जमीन पर' हा चित्रपट पाहायला हवा. आजच्या आर्टिकल मध्ये आज आपण 'Taare Zameen Par' या चित्रपटातील काल्पनिक कथा काय आहे?  ईशानला नक्की कोणती समस्या होती?  ईशान व त्याचे पालक यांचा संघर्ष आणि त्याच्या शिक्षकांनी केलेले प्रयत्न याचे वर्णन आज आपल्याला या आर्टिकल मध्ये वाचायला मिळणार आहे.


{tocify} $title={Table of Contents}


तारे जमीन पर : अध्ययन अक्षम (ईशान) ची प्रेरणादायी यशोगाथा | Tare Jameen Par Inspiration Story


taare zameen par story


ईशानला असणारी समस्या व अंतरंगात असणारे कलागुण

ईशान हा आठ वर्षाचा मुलगा आहे. आणि तो शाळेबद्दल तिरस्कार करत असतो. त्याची समस्या कोणी समजून घेत नाही. ईशानला शैक्षणिक अभ्यासातील प्रत्येक विषय कठीण जातो. परीक्षेमध्ये देखील नापास होतो. 

त्याच्याकडे कारक कौशल्याचा समनव्यय दिसून येत नाही. वर्तन समस्या असते.  शाळेमध्ये सर्व मित्र त्याला हसतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला इशान अपमानित झाल्याची भावना आपल्याला दिसून येते. 

मात्र ईशान च्या अंतरंगामध्ये पतंग,विविध रंग,मासे , चमकणाऱ्या वस्तू त्याला सतत दिसत असते. पेंटिंग चित्रकला या विषयात त्याला आवड असते. भाषा व गणित विषयात रस असल्याचे आढळून आले.

खरे तर अशा वेळी त्याला वर्गमित्रांकडून मदतीची आवश्यकता असते. त्याचे कौतुक करणारे कोणीही त्याला सापडत नाही. ही कथा काल्पनिक असली तरीही आज समाजामध्ये अशी समस्या असणारे खूप सारे विद्यार्थी आपल्याला आढळून येतात. 

पालकांच्या अपेक्षा

साहजिकच आहे की, प्रत्येक पालकांना वाटते, आपल्या मुलांनी चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्याप्रमाणे ईशानच्या पालकांना देखील ईशानला शिस्त लागावी, चांगले शिक्षण घ्यावे असे वाटत होते. 

ईशान च्या आई-वडिलांचे त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहे कि, त्याने शालेय अभ्यासाच्या गृहपाठ करायला हवा, परीक्षेमध्ये चांगले यश संपादन करावे, दैनंदिन क्रिया मध्ये नियमित स्वत: साफ-सफाई, स्वच्छता कडे लक्ष द्यावे. 

परंतु या असणाऱ्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसत. मात्र ईशान ची समस्या वेगळीच होती. त्याला बाह्य जगात काय सुरु आहे हे काहीच समजत नव्हते. त्याच्या अंतरंगात वेगळेच सुरु होते. त्याला विविध रंग, पतंग,मासे असे विविध चित्र त्याच्या डोळ्यासमोर येत होते.

ईशानच्या आई-वडिलांनी खूप प्रयत्न करून समजावून देखील त्याच्या मध्ये काही बदल दिसून येत नव्हता. त्यावेळी त्यांनी ईशान ला बोर्डिंग स्कूल मध्ये टाकण्याचे ठरवले. कारण त्यांना असे वाटले की, ईशान ला थोडे दूर ठेवले तर त्याच्या मध्ये काही बदल होतील, ईशान काहीतरी शिकेल.

नविन शाळेत गेल्यानंतर त्याच्या मध्ये काही बदल दिसून येत नाही. उलट त्याला सतत घरची आठवण येत राहते. 

ईशानाचे शिक्षक रामशंकर निकुंभ (अमीर खान) 

एके दिवशी शाळेमध्ये एक नविन कला शिक्षक शाळेत येतात. त्यांचे नाव निकुंभ सर (अमीर खान) यांनी केलेला निकुंभ सरांचा रोल म्हणजे निकुंभ सर हे थोडे वेगळे असतात. त्यांची शिकवण्याची शैली देखील वेगळी असते. ते नेहमी आनंदी व उत्साही आणि मुलांच्या आवड गरज व क्षमतेनुसार शिकवतात. त्यामध्ये ते मुलांना विचारतात त्यांच्या कल्पना, स्वप्न, विचार काय आहेत? त्यानुसार ते मुलांना शिकवतात. (थोडक्यात काय तर मुलांच्या गरज व क्षमतेनुसार)

मुलांची आवड, क्षमता त्यांच्या कलेनुसार शिकवण्याच्या शैलीमुळे मुलांना निकुंभ सर खूप आवडतात. त्यांच्या क्लास मध्ये मुले आनंदी , उत्साही राहून कृतीमध्ये सहभागी झाल्याचे आपण पाहिले आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, हावभाव, उत्साह हे मुलांचे आकर्षण यशस्वी ठरते. 

ईशान ला मिळाला आशेचा किरण

ईशान खुश नाही त्याची उदासीनता , नैराश्य , एकलकोंडेपणा  याचे निरीक्षण निकुंभ सर करतात. हळूहळू त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न निकुंभ सर करतात. त्याचे विचार ऐकून घेतात. म्हणजे त्याला काय हवय? काय त्याच्यामध्ये सुरु आहे? हे सर्व ते जाणून घेतात. काही दिवसातच ईशान निकुंभ सरांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतो. (ईशान समजून घेणारे कोणीतरी भेटले याची जाणीव ईशान ला होते.)

ईशान बद्दलची काळजी, येणारे नैराश्य , इशानची असणारी समस्या या सर्वांचा विचार निकुंभ या कला शिक्षकांनी केला, तो रोल (अमीर खान) यांनी केलेला आहे. त्यांनी डिसलेक्सिया या विकारावरील उपचार पद्धतीनुसार विशिष्ट शिकवण्याची शैली वापरली, वर्गामध्ये ईशान कृतीमध्ये सहभागी होत नाही, त्याची वर्तन समस्या या सर्वांवर उपाय निकुंभ सरांनी शोधून काढले.

निकुंभ सरांनी ईशानच्या बाबतीत सर्व माहिती घेऊन मागील आढावा घेऊन ईशानची ही अवस्था कशामुळे आहे. हे शोधून काढले तेव्हा त्यांनी डिसलेक्सिया हे अपयशाचे कारण समजले.

पालकांचे समुपदेशन

निकुंभ सर सुट्टीच्या दिवशी ईशानच्या पालकांची भेट घेतात. आणि त्यांना ईशान च्या प्रगतीबाबत त्याला असणाऱ्या कलेबाबत पालकांना सांगतात. पण पालकांचा विश्वास बसत नाही. मग निकुंभ सर त्यांना ईशान ची पेंटिंग दाखवतात. हे पाहून ईशान च्या आईला धक्काच बसतो. 

निकुंभ सर समजावून सांगतात की, ईशान एक हुशार मुलगा आहे त्याला समजून घेण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. त्याला असणारे अध्ययन अक्षता मधील डिसलेक्सिया (Dyslexia) या दोषबाबत समजावून सांगतात. ही एक न्यूरॉलॉजीकल स्थिती आहे. जे की, मंदबुद्धी नाही. असलेला पालकांचा गैरसमज दूर करतात. 

>> बौद्धिक अक्षमता मतीमंद (मंदबुद्धी) म्हणजे काय?

निकुंभ सरांनी ईशान च्या कलेबाबत त्याच्या कलात्मक क्षमतेवर प्रकाश टाकला. त्याच्या पेंटिंग आणि सर्जनशील कृती पालकांच्या लक्षात आणून दिल्या. हे समजवताना त्यांनी ईशान च्या वडिलांना जपानी भाषेत वाचायला सांगितले तर त्यांना ते जमले नाही. यावर त्यांनी समजावले की, ईशान देखील या अशा अवस्थेतेतून जात आहे. त्याचा हा संघर्ष समजावून घ्या. 

एकदा वर्गामध्ये निकुंभ सरांनी गोष्टी सांगायला सुरुवात केली त्यामध्ये अध्ययन अक्षमता संबंधित असणाऱ्या समस्या प्रसिद्ध लोकांची यादी दिली. त्यामध्ये अल्बर्ट आइंस्टीन, लियोनार्डो दा विंसी, वॉल्ट डिज्नी, अगाथा क्रिस्टी, थॉमस एडीसन (Thomas Edison), पॅबलो पिकासो अभिनेता अभिषेक यांना देखील अशाच प्रकारची समस्या होती तरीदेखील त्यांनी त्यावर मात करून ते यशस्वी झाले.

ईशनाचे स्पर्धेतील यश

निकुंभ सर ईशानला शिकवण्यासाठी डिस्लेक्सिया (dyslexia) क्षेत्रातील तज्ञांनी विकसित केलेल्या उपचारात्मक तंत्रांचा वापर करतात. ईशानला भाषा आणि गणिती कौशल्यांमध्ये आवड असते. ईशानच्या अंतरंगात सुरु असणारे विचार चक्र निकुंभ सर समजून घेतात. त्यानुसार वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी कला मेळावा , स्पर्धा आयोजित करतात. त्यामध्ये ईशानला (पेंट केलेले चित्र) यासाठी उत्कृष्ट सर्जनशील शैली मुळे विजेता घोषित करून द्वितीय पारेतोषिक ईशानला मिळते.

नेहमी तक्रार करणारे शिक्षक जेव्हा  शाळेच्या शेवटच्या दिवशी पालकांना भेटले तेव्हा  त्यांनी कोणतीही तक्रार पालकांकडे केली नाही. कारण ईशान बदलत असल्याचे त्यांच्या इतर शिक्षकांना देखील दिसून आले. सुट्टीला जाण्यापूर्वी ईशान निकुंभ सरांना मिठी मारतो आणि निकुंभ सर ईशानला हवेत वर झेलत दाखवले आहे आणि मग  चित्रपट संपतो.

'तारे जमीन पर' चित्रपटातील साकारलेले महत्वाचे पात्र आणि भूमिका 

1. ईशान नंदकिशोर अवस्थी 

ईशान हा आठ वर्षाचा मुलगा आहे. आणि त्याला विविध रंग, मासे, पतंग , चमकणारे वस्तू , प्राणी हे खूप आवडत असतात. हेच त्याच्या अंतरंगात सुरु असते. ईशान ला चित्र काढायला व रंगवायला खूप आवडते. त्याला  घरापासून लांब असणाऱ्या बोर्डिंग शाळेत आवडत नाही. तो प्रयत्न करतो आणि पालकांना विश्वास देतो की, मी नियमित मन लावून अभ्यास करेन.

2. नंदकिशोर अवस्थी (ईशानचे वडील)

नंदकिशोर अवस्थी हे आपल्या कामाप्रती प्रामाणिक व मेहनती आणि यशस्वी व्यक्तिमत्व आहे. ईशान कडून त्यांना खूप साऱ्या अपेक्षा असतात. शिक्षक ईशानच्या तक्रारी त्याच्या वडिलांपुढे मांडतात तेव्हा ईशानला खूप ओरडतात आणि राग देखील येतो. त्याच्या वडिलांचा असा समज आहे की, ईशान बोर्डिंग शाळेतच शिकू शकतो मात्र ईशान हे एक दिवस खोडून त्याच्या आत मध्ये असणारे कलागुण जगाला दाखवून देतो.

3. माया अवस्थी (ईशानची आई)

ईशानची आई ही गृहिणी असते. आई म्हणजे मायेचा सागर त्याप्रमाणे ईशानची आई ईशानची काळजी घेते. जेवणाचा डबा, ईशान ला काही दुखापत झाल्यानंतर काळजी घेणे, वडिलाप्रमाणे आईचे देखील ईशान कडून खूप साऱ्या अपेक्षा , नियमित अभ्यास करणे, स्वत:ची स्वच्छता ठेवणे, परीक्षेमध्ये यशस्वी होणे , कोणत्याही आईला आपले मुल जवळ हवे असते तसे ईशान ला बोर्डिंग मध्ये टाकण्याचे विचार पटत नव्हते परंतु ईशान मध्ये बदल व्हावेत यासाठी ईशान बोर्डिंग मध्ये शिकेल या अपेक्षेने योग्य वाटत होते.

3. योहान अवस्थी (ईशानचा भाऊ)

योहान हा इंजिनियर असून मेहनती मुलगा असतो. तो एक चांगला खेळाडू देखील आहे आणि खूप सारे पुरस्कार देखील त्याने मिळविले आहे. तो ईशान ला समजून घेतो त्याची काळजी घेऊन त्याला मदत करतो. (भावंडांची मदत)

4. ईशानचे शाळेतील शिक्षक

ईशानच्या त्रासामुळे त्याचे काही शिक्षक त्याला समजून घेत नाही. उलट त्याला नोट बुक मध्ये लाल अक्षरात शेरा देतात. (शिक्षकांना ईशान बद्दल आवश्यक माहिती नाही प्रशिक्षण आवश्यक)  

5. रामशंकर निकुंभ (अमीर खान) ईशानचे कला शिक्षक 

रामशंकर निकुंभ हे कला शिक्षक आहे. व त्यांची शिकवण्याची शैली वेगळी आहे. ते मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या गरज व क्षमतेनुसार शिकवतात. ते नेहमी आनंदी, उत्साही असतात. ईशान मधील डिस्लेक्सिया (Dyslexia) हा दोष त्यांनी जाणून घेतला त्यानुसार पालकांना समुपदेशन केले. त्यांना विश्वास दिला. ईशान सोबत मैत्री करून ईशानच्या अंतरंगात काय सुरु आहे? हे जाणले व त्यानुसार अध्ययन-अध्यापनात बदल करून ईशान ला असणारे विविध रंग, मासे, चमकणारे वस्तू याचे आकर्षण त्यानुसार चित्रकला स्पर्धेत त्याचा नंबर आला आणि पारितोषिक मिळविले. हे निकुंभ सरांनी करून दाखविले.

6. राजन दामोदरन (ईशानचा मित्र)

राजन हा ईशान चा जिवलग मित्र असून खूप बुद्धिमान हुशार मुलगा आहे. शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे असतात. राजन नेहमी ईशानची मदत करतो.

तारे जमीन पर चित्रपटाचा उद्देश 

मुलांच्या शिक्षणातील अडचणी, समस्या सोडवण्यासाठी मुलांना कसे समजून घ्यायचे? प्रत्येक मूल वेगळे असते. आणि प्रत्येकामध्ये काहीतरी खास कलागुण दडलेले असतात. त्याचा शोध घेऊन मुलांना संधी देणे आवश्यक असते. तारे जमीन पर चित्रपटाचा हाच मुख्य उद्देश म्हणजे मुलांना समजून घ्या त्यांना त्यांच्या कलेनुसार घडवा. पालक आणि शिक्षकांची भूमिका कशी असायला हवी यासाठी हा चित्रपट सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.


सारांश

आजच्या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेतले की, 'तारे जमीन पर' या चित्रपटातील ईशान या आठ वर्षाच्या मुलाला असणारी अध्ययन अक्षमता (learning disability) डिस्लेक्सिया मुळे शाळेमध्ये शिकताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर केलेल्या निकुंभ सरांनी उपाययोजना याबद्दलचे वर्णन तारे जमीन पर (Taare Zameen Par) या चित्रपटांमध्ये एक काल्पनिक कथा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ईशान सारखीच समस्या आपल्याला समाजामध्ये कित्येक मुलांमध्ये आढळून येते. अध्ययन अक्षमता (learning disability) या प्रकारामध्ये एकूण तीन प्रकार पडतात. डीसग्राफिया, डिस्लेक्सिया, डिसकॅल्क्युलिया (Dyslexia, Dysgraphia, Dyscalculia) मुलांमध्ये शिकण्याचे अडथळे दूर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मुलांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये असणारी समस्या कोणती आहे? ही तज्ञांकडून जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. आणि त्यानुसार पालकांचे समुपदेशन, पालकांनी खचून न जाता त्याच्या उपचार पद्धतीप्रमाणे मुलांना सहकार्य करणे, शिक्षकांनी पालकांचे समुपदेशन करणे. शिक्षकांनी उपचार पद्धती समजून घेणे आणि त्यानुसार उपाय करणे हे आवश्यक असते. मुलांच्या अंतरंगामध्ये काय सुरू आहे? कोणते कलागुण आहेत? हे शोधून त्यावर उपाय करणे हेच उचित ठरते. हेच आपल्याला या चित्रपटातून शिकायला मिळते. तारे जमीन पर हा चित्रपट कित्येक पालक व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे की ज्यामुळे एक आशावाद निर्माण होऊल, अशा सर्व पालक शिक्षकांनी आवर्जून तारे जमीन पर हा चित्रपट पहावा.

अध्ययन अक्षमता (learning disability) समजून घेण्यासाठी समावेशित शिक्षण या वेबसाईटवर आपण एक आर्टिकल सिरीज घेऊन येत आहोत, तेव्हा समावेशित शिक्षण या वेबसाईटला अवश्य भेट देत रहा. आशा करतो की आपल्याला हे आर्टिकल अवश्य प्रेरणादायी ठरले असेल, तेव्हा आपल्या आजूबाजूला असणारे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना आवर्जून हे आर्टिकल शेअर करा. आणि अशाच विशेष मुलांच्या संदर्भामध्ये असणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना यासाठी समावेशित शिक्षण या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा. धन्यवाद

समावेशित शिक्षण वेबसाईटवरील लोकप्रिय लेख वाचा

>> अध्ययन अक्षम मुलांना समजून घेताना... 

>> मुलांमधील अतिचंचलता लक्षणे व गुणकारी उपाययोजना

>> विशेष गरजा असणारी बालके 

>> दिव्यांग (अपंग) म्हणजे काय? दिव्यांग प्रकार 

>> दिव्यांग प्रमाणपत्र (UDID कार्ड) कसे काढावे? त्याचे फायदे

>> अपंग पेन्शन योजना | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Previous Post Next Post