केंद्र सरकारचा मोठा निर्णय | स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा आता मराठीतही देता येणार - Staff Selection Commission Exam 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल पदांसाठी प्रथमच मराठी भाषा सह इतर 13 प्रादेशिक भाषेतून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

मराठी, उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडिया, पंजाबी या भाषांतून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रादेशिक भाषेतून परीक्षा देता येणार आहे.

स्टाफ सिलेक्शन परीक्षा आता मराठीतही देता येणार - Staff Selection Commission Exam 2023

staff selection commission exam 2023
Staff Selection Commission

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, केवळ एखादी भाषा येत नसल्याने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळण्यामध्ये अडथळे येऊ नयेत असा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आहे. त्यामुळे इंग्रजी हिंदी भाषेसह इतर 13 प्रादेशिक भाषांमध्ये आता स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला आहे.

राज्यघटनेतील आठव्या अनुसूची मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 22 भाषांमधून आता येणाऱ्या काळात होणाऱ्या स्टाफ सिलेक्शन ची परीक्षा (Staff Selection Commission Exam 2023) देता येणार आहे. या 22 भाषांमधून परीक्षा घेण्यासंदर्भात या मुद्द्याच्या आधारावर अभ्यासासाठी नेमलेल्या समितीने शिफारस केली आहे. त्या शिफारशीचा केंद्र सरकारने स्वीकार केला असून आता 22 भाषांमधून उमेदवारांना परीक्षा देता येणार आहे.


स्टाफ सिलेक्शन कमिशन ची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात यावी अशी मागणी दक्षिण भारतातून करण्यात येत होती. त्याचा विचार करून केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. याचा देशातील प्रादेशिक भाषेतून Staff Selection Commission Exam देऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना फायदा होणार आहे.


आणखी वाचा

शिक्षक भरती 2023 ! ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात  - TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 

MPSC लिपिक टंकलेखक (क्लार्क) अभ्यासक्रम पाहण्यासाठी PDF डाउनलोड करा.

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          


Previous Post Next Post