आजपासून मिळणार 10 वी परीक्षेचे हॉल तिकीट- या गोष्टी अवश्य तपासा | SSC Exam Hall Ticket 2023

माध्यमिक शालांत परीक्षा (SSC Exam 2023) मार्च महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 10 वी परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) आजपासून म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने शाळा लॉगिन (School Login) ला उपलब्ध होणार असून लवकरात लवकर आपले हॉल तिकीट विद्यार्थ्यांनी ताब्यात घ्यावेत.

SSC Exam Hall Ticket 2023
SSC Exam Hall Ticket 2023

SSC Hall Ticket 2023 वरील या गोष्टी अवश्य तपासा

  1. दहावी परीक्षेचे हॉल तिकीट हे ऑनलाईन प्रिंट काढून देण्यात येणार असल्याने त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
  2. हॉल तिकीटावर जर विषय, माध्यम बदल असेल तर ते दुरुस्ती करण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधा.
  3. हॉल तिकीट वरील फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव जन्मतारीख व जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्त असशील तर त्वरित आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांची संपर्क साधावा.
  4. हॉल तिकीट जर विद्यार्थ्याकडून हरवले तर संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा एकदा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत डुबलीकेट असा शेरा देण्याबाबत मंडळाने कळविले आहे. त्यामुळे शक्यतो हॉल तिकीट जपून ठेवावे.
  5. हॉल तिकीट वर फोटो सदोष असेल तर त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का मारून घेणे.


10 वी परीक्षेचे Hall Ticket डाऊनलोड करण्याबाबत परिपत्रक Download - Click Here

हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post