"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा | Jai Jai Maharashtra Majha Lyrics

महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला आवर्जून वाजणारे महाराष्ट्र गौरव गीत म्हणजे "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे. गर्जा महाराष्ट्र माझा चे गीतकार (Jai jai maharashtra maza writer) राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केलं. नंतरच्या काळात अनेकांनी ते गायलं पण शाहिर साबळे यांची सर कोणालाच आलेली नाही. 

"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा | Jai Jai Maharashtra Majha Lyrics

Jai Jai Maharashtra Majha Lyrics

"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा"

गरजा महाराष्ट्राला शिवजयंती पासून राज्यगीतीचा मान
स्वतःचे गीत असणारे देशातील 12 वे राज्य ठरणार महाराष्ट्र

आतापर्यंत 11 राज्यांनी राज्यगीत स्वीकारले आहे. त्यात आता महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. या गीतांमध्ये एक उर्जा आहे. 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' ही भावना आहे. हे संपूर्ण गीत साडेतीन मिनिटांचे आहे. मात्र अनुमती घेऊन यातली दोन कडव्यांचे १.४१ मिनिटांचे राज्यगीत असेल.

  1. "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" चे गीतकार (कविवर्य) राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  2. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे गीत १९ फेब्रुवारी २०२३ पासून अमलात येणार आहे.
  3. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत १.४१ मिनिटात वाजविता किंवा गाता येणार आहे.
  4. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
  5. या गीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून लवकरच त्या प्रसिद्ध करण्यात येईल.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा गीत मार्गदर्शक सूचना - राष्ट्रगीताचा मान

  • राज्यगीत अंगीकारले तरी राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. 
  • सर्व शासकीय सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीला राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करावे. 
  • महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले जाईल.
  • शाळांमध्ये प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत व नंतर राज्यगीत गायले/ वाजवले जाईल. 
  • राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहून त्याचा सन्मान करावा. 
  • बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग, वृद्ध व्यक्तींना यातून सूट असेल. 
  • वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. 
  • राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकामध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा गीत (Jai jai Maharashtra maza Lyrics Marathi) खालीलप्रमाणे


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढ़ळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥{alertInfo}


"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा

गीतकार : राजा निळकंठ बढे

संगीतकार : श्रीनिवास खळे

स्वर : शाहीर साबळे{alertInfo}

Jai Jai Maharashtra Maza mp3 song Download

Jai Jai Maharashtra Majha Lyrics

Jay jay mahaaraashtr maajha, garja mahaaraashtr maajha

Rewa warada, krishn koyana, bhadra godaawari

Ekapanaache bharati paani maatichya ghaagari

Bhimathadichya tattaanna ya yamuneche paani paaja

Jay jay mahaaraashtr maajha ...


Bhiti n amha tujhi muli hi gadagadanaar‍aya nabha

Asmaanaachya sulataanila jawaab deti jibha

Sahyaadricha sinh garjato, shiwashnbhu raaja

Daridaritun naad gunjala mahaaraashtr maajha...


Kaalya chhaatiwari korali abhimaanaachi leni

Polaadi managate khelati khel jiwagheni

Daaridryaachya unhaat shijala, nidhalaachya ghaamaane bhijala

Deshagaurawaasaathhi jhijala

Dillichehi takht raakhito, mahaaraashtr maajha...{alertInfo}


आणखी वाचा

शिक्षक भरती 2023 ! ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात  - TAIT परीक्षा संपूर्ण माहिती
'जय जय महाराष्ट्र माझा' Original MP3 , Video गाणे येथे डाउनलोड करा 
 जय जय महाराष्ट्र माझा स्वीकृत संपूर्ण राज्यगीत व नियम  येथे वाचा
MPSC लिपिक टंकलेखक (क्लार्क) अभ्यासक्रम पाहण्यासाठी PDF डाउनलोड करा.
भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास - पहिल्यांदाच जिंकला ICC वर्ड कप 2023
पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24
परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post