लुई ब्रेल मराठी माहिती - Louis Braille Information in Marathi

डोळ्याने दिसत असेल तर आपल्याला संपूर्ण जग पाहता येतं. मात्र जे लोक पाहू शकत नाही, दोन्ही डोळ्याने अंध आहे त्यांचं काय? पूर्वीच्या काळी अंध लोकांना काही दिसत नसल्यामुळे शिक्षण घेता येत नव्हते त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत असे, मात्र अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधकारमय दूर करण्यासाठी ब्रेल लिपीची मदत झाली. प्रांजल पाटील या पूर्ण अंध असून त्यांनी पहिली महिला कलेक्टर होण्याचा बहुमान मिळवला. ब्रेल लिपीचा शोध ब्रेल लुईस यांनी लावला. ब्रेल लुईस यांची 4 जानेवारी रोजी जयंती.  त्यांचा हा जन्मदिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. लुई ब्रेल हे शास्त्रज्ञ, लेखक तसेच शिक्षक होते. अशा या महान शास्त्रज्ञांची माहिती (Louis Braille Information in Marathi) आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

{tocify} $title={Table of Contents}

लुई ब्रेल मराठी माहिती - Louis Braille Information in Marathi

Louis Braille Information in Marathi


लुई ब्रेल यांचे बालपण

लुईस ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये फ्रान्सच्या पॅरिस जवळ कुप्रे या गावी येथे झाला. त्यांचे वय तीन वर्ष असताना त्यांना एका अपघाताला सामोरे जावे लागले.  त्यांच्या वडिलांचे नाव सायमन रेने ब्रेल असे होते. हे एक जिंगर घोड्याचे, खोगीर कातडी माल तयार करणारे कारागीर होते. तर आईचे नाव मोनिक बॅरन ब्रेल असे होते. लुई ब्रेल यांना दोन बहिणी होत्या आणि दोन बहिणीच्या पाठीवर त्यांचा जन्म झालेला होता. त्यामुळे घरामध्ये लुई हे सगळ्यांचे लाडके होते.

वडिलांच्या वर्कशॉप मध्ये लुईस हे खेळत होते वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न ते करीत असे, एकदा त्यांचे वडील कोणाशी तरी बोलत असताना त्यांनी वडिलाप्रमाणे अनुकरण करण्याच्या नादात त्यांनी एक आरी उचलली आणि त्यांच्या चुकीने ती त्यांच्या एका डोळ्यामध्ये घुसली, त्यावेळी लुईस हे बेशुद्ध पडले, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. काही काळ डोळ्याला आराम मिळाला मात्र त्या डोळ्यापासून दुसऱ्या डोळ्याला देखील संसर्ग झाला आणि हा संसर्ग वाढत गेल्यामुळे लुईस ब्रेल यांचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले आणि दोन्ही डोळ्याने ते अंध झाले.

लुई ब्रेल यांचे शिक्षण

लुईस यांना त्यांच्या पालकाकडून नेहमी प्रोत्साहन मिळत होते. लहानपणापासून ते स्वावलंबी होते. श्रवण, स्पर्श आणि वासाच्या साह्याने लुई हे वस्तू सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतः करीत असे. 

इसवी सन 1816 मध्ये लुईस यांच्या गावांमध्ये एबे जाक पॅलुय नावाचे एक शिक्षक आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली लुईस प्रेल यांचे शिक्षण सुरू झाले. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये लुईस यांना वासाच्या आणि स्पर्शाच्या साह्याने वस्तू परिचय करून त्यांनी दिला तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही त्यांचे सुरू झाले. पुढे एक वर्षाने लुईस ब्रेल यांना गावातीलच सर्वसामान्य शाळेमध्ये त्यांचा प्रवेश घेण्यात आला.

अभ्यासामध्ये लुई हे खूप हुशार होते केवळ स्पर्श श्रवण आणि वासाच्या मदतीने ते शिकत होते श्रवणाच्या जोरावर त्यांनी केलेली प्रगती पाहून इतरांना आश्चर्य वाटत असत. या शाळेमध्ये लुईस वरील हे दोन वर्षे शिकले आणि या दरम्यान त्यांना अनेक विषयांमध्ये आवड निर्माण झाली.

त्यानंतर लुईस यांना पॅरिस येथे असणाऱ्या अंध मुलांच्या शाळेमध्ये (इन्स्टिट्यूशन रॉयल्स देस एव्ह्यूग्लेस) प्रवेश मिळाला. जगातील ही अंध मुलांसाठी ची पहिली शाळा होती या शाळेमध्ये लुईस यांना प्रवेश मिळाला होता या शाळेमध्ये लुई हे सगळ्यात लहान वयाचे विद्यार्थी होते भूगोल गणित फ्रेंच इतिहास ग्रीक संगीत असे अनेक विषय लुईस या शाळेमध्ये सहजपणे शिकले त्यांनी अनेक बक्षीसही मिळवली सहा वर्षांमध्ये लुईस प्रेल यांनी शाळेतील संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्याच शाळेत स्वयंसेवक शिक्षक म्हणून देखील ते काम करू लागले.

दोन्ही डोळ्यांनी लुईस ब्रील हे अंध असून देखील त्यांना शिक्षकांनी शिकवलेले केवळ श्रवण करून व त्यावर सतत चिंतन करून त्यांनी आपली प्रगती केली आणि विशेष म्हणजे ते प्रथम क्रमांकाने पास होत गेले.  

लुई ब्रेल यांचे संशोधन कार्य - ब्रेल लिपीचा शोध व त्याचा मानवजातीस झालेला फायदा

लुईस ब्रेल यांना संगीत विषयांमध्ये विशेष आवड होती त्यांनी पियानो ऑर्गन व सेलो या वाद्याचा उत्तम वादक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असत.

अंध व्यक्तींना स्पर्शज्ञान अतिशय तीव्र असते त्यासोबतच श्रवण देखील त्यांचे शिक्षण असते, याची जाणीव त्यांना होती. ते पॅरिसमध्ये असताना फ्रेंच लष्करातील अधिकारी कॅप्टन चारस भरभर हे उठावदार टिंबे व रेगा यांच्या आधारे रणांगणावरील संदेश वाहनासाठी त्यांनी तयार केलेल्या लेखन पद्धतीचे प्रशिक्षण सैनिकांना देण्यासाठी तेथे आले होते.

त्यांच्या या लेखन पद्धतीमध्ये शब्दांचा आवाज स्पेलिंग शिवाय ओळखला जात होता. ब्रेल यांनी स्वतः लेखन पद्धतीचा अभ्यास करून त्याचे परीक्षण केले व स्वतःची लिपी तयार केली, अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत ब्रेल लिपी विकसीत केली. तीच पुढे ब्रेल लिपी म्हणून ओळखली गेली. 

आधुनिक युगामध्ये हे ब्रेल लिपी अंध व्यक्तींसाठी खूपच वरदान ठरली कारण संगीत गणित संगणक इत्यादी कार्यक्रमामुळे वेगवेगळ्या चिन्हांच्या आधारे या लिपीचा वापर केला जातो. ब्रेल लिपी यांच्या या लिपी शोधामुळे अण्णांना पुस्तकाचे मुद्रित विश्व फुले झाले तसेच त्यांचे आयुष्यमान देखील प्रकाशमय झाले. ब्रेल लिपीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.

लुई ब्रेल यांचे ६ जानेवारी १८५२ रोजी पॅरिस येथे क्षयाच्या विकाराने निधन झाले. निधनानंतर त्यांच्या लिपीचा खूप प्रसार झाला. जगातील काही प्रमुख व्यक्तींनी त्यांच्या लेखनपद्धतीचा खूप विकास केला. त्यामुळे जगातील सर्व भाषांमध्ये त्यांच्या या क्रांतिकारक लिपीचा वापर केला जातो.

अंध मुलांसाठी असणारी विशेष साधने

  1. ब्रेललेखन पाटी व कलम - या पाटीवर अंध मुले ब्रेलमध्ये लिहितात. ही ६ टिंबांची लिपी असून ती उठावाची असते. ही लिहिताना चीपच्या (पट्टी) साहाय्याने उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. यासाठी टोकदार कलमाचा उपयोग केला जातो.
  2. टेलरफ्रेम - ही पाटी अंकगणितातील सर्व क्रिया करण्यासाठी वापरली जाते. त्यासाठी या पाटीवर अष्टकोनी छिद्रे असतात व त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या गणिती खिळ्यांचा उपयोग केला जातो.
  3. अबकस - ही एक मण्यांची पाटी असून गणितीय क्रियांची उत्तरे कॅलक्युलेटर प्रमाणे लवकर काढता येतात व त्यामुळे बुद्धिला चालना मिळते.
  4. बोनहॅम भूमिती साधन - ह्यामध्ये रबरमॅट व स्परव्हील, वर्तुळदांडी, स्क्रबर यांच्या साहाय्याने मुले विविध भौमितिक आकृत्या काढतात. आकृत्या काढण्यासाठी आपण प्लॅस्टिक पेपरचा उपयोग करू शकतो.
  5. ब्रेल टाईपरायटर - ब्रेल लेखन वेगाने करता येते व चुका मुद्धा ताबडतोब दुरुस्त करता येतात.
  6. बोलका संगणक - संगणकावर लिहीत असताना ते वाचले जाते. 
  7. बोलकी पुस्तके - अंधांसाठी सर्वसाधारणपणे ब्रेल साहित्य कमी असते. त्यामुळे टेप केलेली - पुस्तके उपलब्ध करावी लागतात. त्यामध्ये कादंबऱ्या, प्रवासवर्णने, चरित्र, क्रमिक पुस्तके याचबरोबर इतरही साहित्य उपलब्ध आहे.
  8. उठावाचे नकाशे - रबरमॅट, कलम यांच्या साहाय्याने उठावाचे नकाशे तयार करता येतात.. यासाठी वेगवेगळ्या स्पर्शातील फरकांच्या वस्तूंचा उपयोग करता येतो. उदा. वेगवेगळ्या  आकाराचे मणी, दोरे वगैरेंचा उपयोग करता येईल.
  9. अंधासाठी पांढरी काठी - गतिशीलता व चलनवलनासाठी या काठीचा उपयोग करता येतो. 
  10. ब्रेल घड्याळ - यामध्ये ब्रेलमध्ये (टिंबांच्या साहाय्यान) वेळ दर्शविली जाते व ते अंध मूल स्पर्शाने बघते. यामध्ये हल्ली बोलकी घड्याळे उपलब्ध आहेत.

समावेशित शाळेतील अंध मुलांसाठी शिकवण्याची पद्धती

अध्ययन शैली नुसार अध्यापन - श्राव्य व स्पर्श अध्ययन शैलीने अध्ययन-अध्यापन 
सविस्तर वाचा 

हे सुद्धा वाचा

>> शास्त्रज्ञांची माहिती 

>> शास्रज्ञ- श्रीनिवास रामानुजन मराठी माहिती

>> सर आयझॅक न्यूटन मराठी माहिती

हे सुद्धा वाचा



नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Previous Post Next Post