अस्थिव्यंग म्हणजे काय? सुविधा व सवलती संपूर्ण माहिती | Locomotor Disability Meaning in Marathi

भारतामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार दिव्यांग (अपंग) व्यक्तींची लोकसंख्या 2.68 कोटी (दोन कोटी, अडूसष्ठ लाख) इतकी आहे. दिव्यांग व्यक्तींची संख्या ही भारताच्या एकुण लोकसंखेच्या 2.21 % टक्के आहे. यामध्ये  दृष्टिहीन (Visual), श्रवणदोष (Hearing), वाचादोष (Speech), अस्थिव्यंग (Locomotor Disability), मतिमंद (Mental Retardation) , मानसिकदृष्ट्या दिव्यांग (Mental Illness), बहुविकलांग (Multiple Disability) आणि इतर (any other disabilities.) दिव्यांग व्यक्ती  यांचा समावेश आहे. आजच्या आर्टिकल मध्ये आपण अस्थिव्यंग (Locomotor Disability) म्हणजे काय? याचा अर्थ समजून घेणार आहोत. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ (RPWD ACT 2016) नुसार Locomotor Disability या दिव्यांग प्रकारचे Meaning काय होते. त्याची व्याख्या काय आहे? त्याचबरोबर अस्थिव्यंग या प्रकाराची पडताळा सूची व प्रमाणपत्र (Locomotor Disability Certificate) कसे काढायचे? आणि अस्थिव्यंग येण्यामागे कोणती कारणे व त्यावरील उपाय याबद्दलची सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

अस्थिव्यंग म्हणजे काय? सुविधा व सवलती संपूर्ण माहिती | Locomotor Disability Meaning in Marathi 

अस्थिव्यंग चा अर्थ |  Locomotor Disability Meaning

अस्थिव्यंग (Locomotor Disability) या शब्दाचा (Meaning) अर्थ असा आहे - अस्थि म्हणजे हाडे आणि व्यंग या शब्दाचा अर्थ म्हणजे असमर्थता जाणवणे असा होतो. जेव्हा शारीरिक (दैनंदिन कार्य) करण्यामध्ये व्यंग असणाऱ्या व्यक्तीला समस्या निर्माण होते. तेव्हा त्याला असमर्थता जाणवते.

Locomotor Disability Meaning in Marathi
Locomotor Disability Meaning


Locomotor

जेव्हा आपण दिव्यांग प्रकारानुसार Locomotor Disability म्हणजेच अस्थिव्यंग चा अर्थ समजून घेतो तेव्हा Locomotor म्हणजे हलन-चलन संबंधित निर्माण होणारी समस्या ती साधारणपणे शारीरिक स्नायू,सांधे किंवा हाडे यामध्ये दोष निर्माण होतो तेव्हा अशा प्रकारची समस्या उद्भवते.

Disability -अक्षमता

Disability म्हणजे अक्षमता (असमर्थता जाणवणे.)  अक्षमता म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे दैनंदिन कार्य करण्यामध्ये उद्भवणारी समस्या अक्षमता असणाऱ्या व्यक्तीला ते करण्यात असमर्थता जाणवते. उदा. अस्थिव्यंग व्यक्ती जर पायामध्ये काही व्यंग असेल तर त्याला चालताना , पायऱ्या चढताना किंवा उतरताना समस्या येते. किंवा धावता येत नाही. याउलट जर हाताची काही शारीरिक समस्या असेल तर वस्तू पकडणे, वजन उचलणे, लिहणे यामध्ये असमर्थता येते. ही अक्षमता (Disability) त्या व्यक्तीच्या असणाऱ्या शारीरिक समस्येवर अवलंबून असते. या दैनंदिन कार्य करण्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्येलाच अक्षमता असे म्हणतात.

 दिव्यांग (अपंग) म्हणजे काय? दिव्यांग प्रकार 

‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’ (RPWD Act 2016) नुसार अस्थिव्यंग व्याख्या

शारिरीक - Physical Disability

शारिरीक दिव्यांग्त्व (अपंगत्व) मध्ये शरीराचा कोणताही भाग किंवा अवयव निकामी होणे , शारिरीक अवयवांची वाढ खुंटणे , स्नायू ची विकृती या प्रकारच्या समस्या Physical Disability या व्यक्ती मध्ये आढळून येतात.

अस्थिव्यंग म्हणजे काय? - Locomotor Disability Definition

स्नायू , माज्जासंस्थेचा त्रास किंवा दोन्हीमुळे होणाऱ्या परिणामी हलनचलन तसेच वस्तू हालचाल संबंधित क्रिया करण्यास अक्षम असणारी व्यक्ती म्हणजे अस्थिव्यंग (Locomotor disability) होय.

अस्थिव्यंग म्हणजे सांधे, स्नायू हाडे यामध्ये निर्माण झालेल्या दोषांमुळे हात, पाय या अवयवांच्या हालचालीवर व कार्यशीलतेवर येणाऱ्या मर्यादांना ‘अस्थिव्यंग’ असे म्हणतात.

locomotor disabilitymeans a person's inability to execute distinctive activities associated with movement of self and objects resulting from affliction of musculoskeletal or nervous system or both), including.{alertSuccess}


➡️  ऐतिहासिक निर्णय ! दिव्यांग मंत्रालय स्थापन

अस्थिव्यंग येण्याची कारणे - Causes of Locomotor Disability 

अस्थिव्यंगता म्हणजे शरीराचा कोणताही भाग किया अवयव निकामी होणे यास अस्थिव्यंगता दिव्यांग्त्व असे म्हणतात. ज्याप्रमाणे आपण ओठांचा उपयोग बोलण्यासाठी करतो, हातांचा उपयोग वस्तू उचलण्यासाठी व जेवण करण्यासाठी करतो, पायांचा उपयोग चालण्यासाठी अशा प्रकारे प्रत्येक अवयवाचे काही ना काही कार्य असते, उपयोग असतात. पण जेव्हा त्या अवययात कार्य करण्याची शक्ती नसते. तो निकामी होतो तेव्हा त्यास अस्थिव्यंगता असे म्हणतात. कोणतेही दिव्यांग्त्व हे पुर्वजन्माच्या पापाची शिक्षा म्हणून येत नाही. अस्थिव्यंग म्हणजे हाडांचे दिव्यांगत्त्व (अपंगत्त्व)  हे अपंगत्व कधीही येऊ शकते. तर अस्थिव्यंग येण्याची काही शास्त्रीय कारणे (Causes of Locomotor Disability) आहेत, ते आपण पाहूया.

  1. पोलिओ - सर्वात मोठया प्रमाणात आढळून येणारे कारण आहे ते म्हणाजे पोलिओ, पोलिओ हा एका पायाला किंवा दोन्ही पायाला होवू शकतो. यामुळे त्या व्यक्तीच्या पायाची योग्य ती वाढ होत नाही, पोलिओमुळे पायाची किंवा हाताच्या हाडांची व स्नायूंची वाढ खुंटते. त्यामुळे मुलाच्या किंवा व्यक्तीच्या चालण्यावर परिणाम होतो. 
  2. जन्मतः योग्य वाढ न होणे - जन्मतः एखादया अवयवाची योग्य वाढ न होणे. आपण बघतो जन्मतः काही मुलांच्या हाताची व पायाची वाढ झालेली नसते, मान आखूड असते, ओठ फाटलेले असते किंवा हात पाय तिरपे असणे. उदा. पायाची, हाताची बोटे नसणे, हात, पाय नसणे किंवा आखुड असणे, पाठीत कुबड असणे.
  3. अपघात - यात व्यक्तीचा बहुतेक करून हात किंवा पाय जाण्याची शक्यता असते. यामुळेही अस्थिव्यंगता येते. उदा. वाहनाचा अपघात, उंचावरून पडणे, भाजणे.
  4. आपत्कालीन समस्या - काही रोगामुळे जखम होते ती वाढत जावून पुर्ण शरीरावर पसरू नये म्हणून तो अवयव किया तो भाग डॉक्टर काढून टाकतात. यामुळे अस्थिव्यंगता येते.
  5. जीवनसत्व 'ड'ची कमतरता - जीवनसत्व 'ड' च्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शिअम शोषले जात नाही त्यामुळे हाडे कमकुवत राहतात किंवा कठीण होत नाहीत त्यामुळे हाडांमध्ये व्यंग निर्माण होते.
  6. वयानुरूप किंवा कमतरतेने उद्भवलेले वाढत्या वयामुळे हाडांची झीज होणे, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे हाडे ठिसुळ होणे, कुष्ठरोगांमुळे अस्थिव्यंग येणे.
  7. हाडांचा कर्करोग, क्षयरोग ,संधिवात इ.

अस्थिव्यंग येण्यामागे वरील कारणांचा समावेश होतो किंवा याव्यतिरिक्त असणाऱ्या कारणामुळे अस्थिव्यंग (Locomotor Disability) दिसून येते. 

अस्थिव्यंग व्यक्तींसाठी साहित्य साधने 

अस्थिव्यंगता वर मात करण्यासाठी लहान वयातच लवकरात लवकर डॉक्टरकडे दाखवायला हवे व त्यावर वैद्यकीय उपचार (शस्त्रक्रिया) करायला हवेत. कारण काही वेळा अस्थिव्यंगता औषधोपचार तसेच थेरेपी (Physiothecopy) , शस्त्रक्रिया ने ठीक होवू शकते. त्यानंतर अस्थिव्यंग असणाऱ्या समस्येनुसार योग्य साहित्य साधन देऊन दैनदिन कार्यात मदत होत असते.

अस्थिव्यंग व्यक्तींसाठी असणारे साहित्य साधने 

  • मॉडीफाय चेअर
  • कॉर्नर सिटींग
  • कॅलिपर (कृत्रिम अवयव)
  • व्हील चेअर
  • तीन चाकी सायकल 
  • कुबडया
  • रोलेटर
  • स्प्रींट
  • कमोड चेअर
  • मॉडीफाय चेअर  
  • कॉर्नर सिटींग

अस्थिव्यंग दिव्यांग प्रमाणपत्र | Locomotor Disability Certificate

अस्थिव्यंग दिव्यांग (अपंग प्रमाणपत्र) काढण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.  Unique Disability ID card त्यालाच मराठीमध्ये वैश्विक दिव्यांग ओळख पत्र किंवा स्वावलंबन कार्ड (#swavlambancard) म्हणून देखील  ओळखले जाते. UDID कार्डसाठी www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. समाजकल्याण विभाग व आरोग्य विभाग माहितीची सत्यता पडताळून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्वाक्षरी करून पोस्टाद्वारे कार्ड पाठविण्यात येते. UDID CARD भारत सरकारच्या स्वावलंबन कार्ड या संगणक प्रणालीद्वारे दिले जात आहे. अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

अस्थिव्यंग व्यक्ती (विद्यार्थी) सरकारी सुविधा व सवलती

अस्थिव्यंग या दिव्यांग प्रकारचे वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ दिला जातो.
  1. प्रवास भत्ता 
  2. लेखनिक भत्ता
  3. मदतनीस भत्ता
  4. गणवेश व शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती.
  5. दिव्यांग व्यक्तींना नोकरीत ४% आरक्षण
  6. दिव्यांग वसतिगृह व कॉलेज प्रवेशात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ५% आरक्षण
  7. दिव्यांग व्यक्तींना Tax  कर सवलत
  8. गरजेनुसार साहित्य साधने (कुबड्या,व्हीलचेअर,तीन चाकी सायकल, कृत्रिम अवयव इ.)
  9. दिव्यांग शिष्यवृत्ती
  10. दिव्याग व्यक्तींसाठी अपंग कर्ज योजना
  11. व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य
  12. दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार
  13. रेल्वे, एसटी प्रवास भाड्यामध्ये विशेष सवलत
  14. दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण व प्रशिक्षण 
  15. शालान्त परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना
  16. विशेष क्रीडा स्पर्धा 
  17. गुणवत्ता विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके
  18. दिव्यांग मार्गदर्शन व सल्ला केंद्र

अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पद्धती व मूल्यमापन सुविधा व सवलती

अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचा १६ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या परीक्षा व मूल्यमापन प्रक्रियेमध्ये खालील सवलती देण्यात येतात. या सवलती राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, अनुदानित, खाजगी अनुदानित , समावेशित शिक्षण तसेच विशेष शाळा , सर्व माध्यमाच्या शाळांना देखील हा निर्णय लागू आहे.
  • विद्यार्थ्याच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र अस्थिव्यंग विद्यार्थ्यांस मिळेल. (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत. ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • अस्थिव्यंग या दिव्यांग विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात येते.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात येते.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन / संगणक खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात येते. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता / पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते.
  • आकृत्या, नकाशे, तक्ते इ. काढण्यासाठी सवलत देय आहे.
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा/ बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न दिवारले जावेत.
  • अनुकूलनशील साहित्य आणि उपकरणांचा वापर करू देण्यात यावा. उदा. पेन्सिल व ग्रीप्स.

अस्थिव्यंग दिव्यांग प्रकार ओळखण्यासाठी पडताळणी सूची

अस्थिव्यंग प्रकारातील दिव्यांग व्यक्तींची ओळख प्राथमिक स्तरावर कशा पद्धतीने करू शकतो? याबद्दलची पडताळा सूची पुढे दिली आहे

  • अस्थिव्यंग हे पटकन लक्षात येण्यासारखे (दिसणारे) दिव्यांगत्व आहे.
  • शारीरिक हातात, पायात किंवा मनगटात, बोटामध्ये किंवा मानेच्या पाठीच्या कण्यामध्ये स्नायू, हाडे किंवा सांधे यामध्ये समस्या असल्यास तपासणी करून घ्यावी.
  • अस्थिव्यंग असणाऱ्या व्यक्तींना बसताना, उभे राहताना किंवा चालताना त्रास होतो.
  • वस्तू उचलताना धरताना किंवा जमिनीवर ठेवताना अवघड जाते.
  • सांध्यामध्ये वारंवार दुखण्याची तक्रार ही व्यक्ती करत असते.
  • चालताना नीट चालता येत नाही हेलकावे देत चालणे.
  • उभे असताना किंवा बसलेले असताना अनियंत्रित शारीरिक हालचाल करणे.
  • एक हात व एक पाय म्हणजेच शरीराची एक बाजुच काम करणे.
  • पाठीत जन्मापासून कुबड बाहेर निघालेले असणे.
  • दोन्ही पायाची लांबी असमान असणे.
  • हाताची किंवा पायाची बोटे नसणे किंवा आकार वेडावाकडा असणे.

हे सुद्धा वाचा

➡️ समाज कल्याण दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना

 ➡️ दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना

➡️ संजय गांधी निराधार पेन्शन योजना 

➡️ अपंग पेन्शन योजना | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.


Previous Post Next Post