श्रीनिवास रामानुजन मराठी माहिती | Srinivasa Ramanujan Marathi Mahiti

 शाळा , कॉलेज , शैक्षणिक संस्था तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शासन निर्देशा नुसार वर्षभरातील राष्ट्र पुरुष / थोर महापुरुष यांचे जयंती/पुण्यतिथी दिन साजरे करण्यात येतात. आता या धर्तीवर विशेषतः सर्व शाळांमध्ये शास्त्रज्ञांची जयंती साजरी करण्याचा उपक्रम औरंगाबाद विभागाने हाती घेतला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये देखील या उपक्रमाचे स्वागत झाले असून शालेय परिपाठ दरम्यान हा उपक्रम उस्फुर्त पणे राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय गणित दिन देशभरात दिनांक २२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने राज्यभरात गणितोत्सव साजरा होत आहे. गणितीय विश्लेषक, गणिततज्ञ, गणितीय शास्त्रज्ञ म्हणून ज्यांना ओळखले जाते, गणितीय सिद्धांताचा शोध लावणारे श्रीनिवास रामानुजन यांची मराठी माहिती या लेखामध्ये दिली आहे.

>> आदर्श शालेय परिपाठ सूत्रसंचालन येथे वाचा

{tocify} $title={ठळक मुद्दे}

श्रीनिवास रामानुजन मराठी माहिती | Srinivasa Ramanujan Marathi Mahiti

शास्त्रज्ञांची जयंती शाळांमध्ये साजरी करण्याचा मुख्य उद्देश

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सभोवताली घडणा-या घटनांबाबत कुतुहल, जिज्ञासा निर्माण व्हावी, शास्त्रीय (वैज्ञानिक) दृष्टीकोन विकसित व्हावा तसेच महान शास्त्रज्ञांची, त्यांच्या संशोधन कार्याची त्यांना ओळख व्हावी, त्यांच्या जीवित कार्याचा व संशोधनामागील मेहनतीचा परिचय होऊन विद्यार्थ्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

श्रीनिवास रामानुजन शास्त्रज्ञांची जयंती साजरी कशी करावी?

सर्व शाळांनी ज्या दिवशी शास्त्रज्ञांची जयंती आहे. त्यादिवशी शालेय परिपाठ दरम्यान शास्त्रज्ञांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करावे.

  • जयंती च्या दिवशीच्या श्रीनिवास रामानुजन शास्त्रज्ञांचा फोटो शाळामध्ये असावा.
श्रीनिवास रामानुजन मराठी माहिती
Srinivasa Ramanujan

  • सदर जयंती दिनी शास्त्रज्ञांबाबत त्यांचा जन्म दिनांक व ठिकाण, त्यांचे बालपण, शालेय शिक्षण याविषयी माहिती सांगावी. तसेच
  • शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन कार्य याबद्दलची माहिती मुलांना सांगावी. 
  • त्यांनी संशोधन कार्यातून लावलेले शोध व त्याचा मानवजातीस झालेला फायदा इ. बाबत शिक्षकांनी विद्याथ्यांना अचूक माहिती द्यावी.
  • त्यासाठी उपलब्ध संदर्भ ग्रंथाचा, शास्त्रज्ञांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचा आधार घ्यावा. 
  • सदर माहिती मध्ये शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांबाबत सविस्तर शास्त्रीय तपशील विद्यार्थ्यांना अवगत करुन द्यावा. 
  • त्यासाठी उपलब्ध डिजिटल साधनानाद्वारे (मोबाईल,प्रोजेक्टर,संगणक इ.) वर प्रत्यक्ष व्हिडिओ किंवा PPT द्वारे माहिती सांगण्यासाठी याची मदत घ्यावी. 

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म व ठिकाण

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम जवळील इरोड नावाच्या गावात दिनांक २२ डिसेंबर १८८७ या दिवशी झाला. त्यांचे बालपण हे खूप हालाखीचे गेले होते. त्यांचे वडील एका स्थानिक साड्यांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याकडे अर्धवेळ लिपिक म्हणून काम होते. एका मुलाचे पालनपोषण करणेही त्यांना शक्य नव्हते. 

श्रीनिवास रामानुजन यांचे शालेय शिक्षण

श्रीनिवास रामानुजन  या महान गणितज्ञाने १८९४ मध्ये वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच प्राथमिक शाळेच्या परिक्षेत ते प्रथम आले. त्यामुळे त्यांना माध्यमिक शिक्षण मोफत मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की, त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. 
त्यांच्या या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही आचर्य चकित होत असे.
रामानुजन हे अलौकिक गणितीतज्ञ होते. रामानुजन हे सतत गणिताचा विचार करीत असत. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे, म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
रामानुजन यांना गणिताचं इतकं वेड होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास नीट करत नसत. परिणामी अकरावीला एकदा आणि बारावीला दोन वेळा ते नापास झाले. 
मात्र गणित विषयामध्ये ते अत्यंत हुशार होते. त्यांना या विषयाचे शाळा व कॉलेज मध्ये अनेक पारितोषकही त्यांनी मिळविले.

श्रीनिवास रामानुजन यांचे लेखन

श्रीनिवास रामानुजन यांना मद्रासच्या पोर्ट ट्रस्टच्या लेखा विभागात लिपिक म्हणून नोकरी मिळाली. कार्यालयातून वेळ मिळाला की ते संशोधनपर लेख लिहित. त्यांचे ते लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रकाशित झाले.
त्या काळी इंग्लंड हे गणिताचे केंद्र मानले जाई. रामानुजन यांनी आपली १२० प्रमेये व सूत्रे (धी अरम्स व फॉम्यूले) केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रीनटी महाविद्यालयातील फेलो. 
प्रसिद्ध गणितज्ञ प्रा. गॉडफे एव हार्डी यांना पाठवली. पोस्टाने मिळालेल्या या वह्या पाहिल्यावर त्यांनी आपले सहकारी प्राध्यापक लिटलवूड यांच्याशी याविषयी चर्चा केली. या वह्या लिहिणाऱ्या लेखकाची प्रतिभा त्यांना जाणवली.
१७ एप्रिल १९१४ रोजी ते इंग्लंडला पोहोचले. नंतर हार्डी व लिटलवुड यांच्या मार्गदर्शखाली रामानुजन यांनी पद्धतशीर अभ्यास व संशोधनास सुरुवात केली. इंग्लंडच्या पाच वर्षाच्या वास्तव्यात त्यांचे २५ शोधनिबंध प्रकाशित केले गेले. यामुळे गणिताच्या विश्वात ते लोकप्रिय झाले. 

श्रीनिवास रामानुजन यांचे संशोधन कार्य

रामानुजन यांचे गणितातील ज्ञान आश्चर्यकारक होते व त्यातील बहुतेक त्यांनी स्वतःच प्राप्त केलेले होते. परंपरित अपूर्णांकासंबंधी यापूर्वी काय विकसित केले गेलेले आहे यासंबंधी त्यांना आजिबात माहिती नव्हती, तरीही या विषयातील त्यांचे प्राविण्य त्या काळच्या इतर गणितज्ञांच्या तुलनेने अनन्यसाधारण होते. 
विवृत्तीय समाकल [⟶ अवकलन व समाकलन ], 
अतिगुणोत्तरीय श्रेढी [⟶ श्रेढी ], 
रीमान श्रेढी, 
झीटा फलनाची समीकरणे व त्यांचा स्वतःचा अपसारी श्रेढींसंबंधीचा सिद्धांत हे त्यांनी स्वतः संशोधन करून शोधून काढले. 
रामानुजन त्या काळातील महान गणितज्ञामध्ये एक मानण्यात येई. जाडजूड अशा तीन वह्यामध्ये असणारे गणितातील त्यांचे संशोधन कार्य आज रामानुजन्स नोटबुक्स या नावाने ओळखले जाते. 
त्यांचे हे साधन नंतर तर प्रगाढ आभासाचा विषय ठरले. इ.स. १९२७ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने या संशोधन कार्याचे हार्डी यांच्याकडून संपादन करवून घेऊन ते प्रकाशित केले त्यांचे काही संशोधन अजूनही अप्रकाशित आहे. रामानुजन यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी टाटा इनिटट्युट ऑफ फंडामेंटल  रिसर्च, मुंबई यांच्या गणित विभागाने त्यांच्या अनेक कृती संपादित व प्रकाशित केल्या.

श्रीनिवास रामानुजन यांचे संशोधन व त्याचा मानवजातीसाठीचा झालेला फायदा

इंग्लंडमधील वास्तव्यातील पहिल्या निबंधात त्यांनी π चे आसन्न मूल्य (खऱ्या मूल्याच्या जवळपास असणारे मूल्य) काढण्याच्या निरनिराळ्या पद्धती दिलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विशेषत्वाने संख्या विभाजन फलनाच्या गुणधर्माविषयी काम केले व ते अतिशय मोलाचे मानले जाते. त्यांनी संख्या सिद्धांतात केलेले कार्य भौतिक व संगणक विज्ञानातील काही समस्या सोडविण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. 
त्यांच्या कार्याचा विविध देशांतील गणितज्ञ अद्यापही अभ्यास करीत आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९८७ मध्ये अनेक देशांत त्यांच्या कार्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी चर्चासत्रे व परिषदा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

श्रीनिवास रामानुजन यांना मिळालेले पुरस्कार

मद्रास विद्यापिठाकडुन श्रीनिवास रामानुजन यांना १ मे १९१३ पासून गणितात संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. 
लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना ऑक्टोबर, १९१८ मध्ये फेलो करून घेतले. हा सम्मान मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. 
फेब्रुवारी १९१८ साली नौदल अभियंता आरदेशजी खोरदेशजी यांना ट्रीनीटी महाविद्यालयाकडून असा सन्मान मिळाला होता. ते पहिले सन्मानित भारतीय होते.

श्रीनिवास रामानुजन यांचा मृत्यू कधी झाला ?

१९१७ मध्ये रामानुजन क्षयरोगाने आजारी पडले व त्यामुळे इंग्लंडमधील त्यांचे उर्वरित वास्तव्य निरनिराळ्या आरोग्यधामांत गेले. १९१८ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य व ट्रिनिटी कॉलेजाचे अधिछात्र म्हणून त्यांची सन्मानपूर्वक निवड झाली. प्रकृती सुधारल्यावर १९१९ मध्ये ते भारतात परत आले. मद्रास विद्यापीठाने दरसाल २५० पौंडांची शिष्यवृत्ती त्यांना पाच वर्षांकरिता मंजूर केली परंतु मद्रासजवळील चेटपूट येथे श्रीनिवास रामानुजन यांचा दिनांक २६ एप्रिल १९२० या दिवशी वयाच्या ३३ व्या वर्षी मृत्यू  झाला. अखेरपर्यंत ते गणितातील संशोधनात मग्न होते. निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले. या महान गणित तज्ञ शास्रज्ञ यांना विनम्र अभिवादन!

हे ही वाचा

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post