संत गाडगेबाबा यांची संपूर्ण माहिती मराठी | Sant Gadge Baba information in marathi

महाराष्ट्र ही संतांची भूमि आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर संत लाभलेले आहेत. त्यापैकीच एक महान संत म्हणजे संत गाडगे महाराज. लोक त्यांना 'गाडगे बाबा' (Gadge Baba) म्हणून ओळखत असत. एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक अशी त्यांची ओळख होती. राहणीमान अत्यंत गरिबी फाटके तुटके अंगावर कपडे परंतु स्वच्छ असायचे, गाडगे महाराजांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त आवड होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक. रंजल्या-गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा ! संत गाडगेबाबांना गाडगेमहाराज असेही म्हणत. अशा या महान संत गाडगेबाबांची ओळख (Sant Gadge Baba information in marathi) करून घेणार आहोत. 

{tocify} $title={ठळक मुद्दे}

संत गाडगेबाबा माहिती मराठी | sant gadge baba information in marathi

संत गाडगेबाबा यांची संपूर्ण माहिती मराठी
Sant Gadge Baba information in marathi

संत गाडगेबाबांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाला होता. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच गरीबीची जाणीव होती. त्यांच्या वडिलांच्या अकाली मृत्यू मुळे गाडगेबाबांचे बालपण मामाकडे गेले.  आपल्या आईसोबत ते मामाकडे राहत असत. तिथे ते शेतात फार कष्ट करायचे. ते स्वतः निरक्षर असले तरी त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणले होते. 'संत गाडगेबाबा यांचा स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता.'

Sant Gadge Baba एक महान बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे एकमेव ध्येय लोकसेवा हे होते. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक प्रबोधनासाठी घालवले. 

संत गाडगेबाबा यांचे बालपण | Sant Gadge Baba's childhood

संत गाडगेबाबा यांचे मूळ घरचे नाव डेबू होते. परंतु सर्वजण त्यांना 'गाडगेबाबा'  (Gadge Baba) म्हणत असत. संत गाडगे बाबा यांचे संपूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते. गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्हातील शेंडगाव येथे झाला होता. ते जातीने परीट होते. 23 फेब्रुवारी ला संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखूबाई होते.

कोणतेही काम मनापासून करण्याची गाडगे बाबांना सवय होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे, अशी त्याची काम करण्याची पद्धत होती.

लहान पणापासूनच त्यांनी काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता. ते ज्या समाजात वावरत होते. त्या समाजातील लोकांचे वागणे त्यांना आवडत नव्हते. त्या लोकांच्या व्यसनाधीनता मुळे ते कर्जबाजारी होत होते. रोगराई झाली, तर औषध न घेता देवाला नवस करत होते. कोंबडे-बकरे यांचे बळी देत होते. गाडगे बाबांना  हे आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून ते त्यांना जीव तोडून सांगत असायचे.

गाडगे महाराजांनी लहान वयातच मनाशी ठरवले, की 'मी इतके कष्ट करीन, की मी न बोलताही लोक माझे ऐकतील. त्यांच्यात सुधारणा होईल.'

संत गाडगे बाबा जयंती | Sant Gadge Baba Jayanti

संत गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगाव येथे झाला. अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा इ. समाजातील असणाऱ्या दोषांवर कोरडे ओढून ते दोष दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. संत गाडगेबाबा खऱ्या अर्थाने महान  समाजसुधारक होते. बहुजन समाजातील भोळ्याभाबड्या जनतेला शहाणे करून त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांच्या अशा महान कार्यानिमित्त शासनाने Sant Gadge Baba Gram Swachata Abhiyan गावागावांत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले, स्वच्छतेचे प्रसारक म्हणून देखील संत गाडगेबाबा प्रसिद्ध आहे. अशा या महान समाजसुधारक संत गाडगे बाबा जयंती २३ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते.

गाडगे महाराजांचा विवाह कधी झाला?

संत गाडगे महाराजांचा (Sant Gadge Baba) यांचा विवाह लहानपणीच झाला होता. सन १८९२ मध्ये गाडगे बाबांचा विवाह (लग्न) अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधील कमलापूर तरोडा या गावातील धनाजी खंडाळकर यांची कन्या गुंताबाई यांच्याशी (Sant Gadge Baba) डेबुचा विवाह झाला होता.

त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. परंतु लवकरच ते विरक्तीच्या मार्गाकडे झुकू लागले. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. अखेरीस त्यांनी संसाराचा त्याग केला आणि तीर्थयात्रा करीत सर्वत्र फिरू लागले. 

पारमार्थिक मार्गाचा अवलंब 

संत गाडगेबाबा यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास पारमार्थिक मार्गाचा स्वीकार केल्यावर त्यांनी अतिशय साधेपणाने जीवन जगावयास प्रारंभ केला. त्यांचा वेष म्हणजे अंगावर एक फाटकीतुटकी गोधडी आणि हाती एक फुटके मातीचे गाडगे असा होता. त्यामुळे लोक त्यांना 'गोधडे बुवा' किंवा ‘गाडगे बाबा' Gadge Baba या नावाने ओळखू लागले. पुढे त्याच नावाने ते महाराष्ट्रीय लोकांना परिचित झाले.

संत गाडगे महाराज प्रापंचिक जीवनातून विरक्त होऊन पारमार्थिक मार्गाकडे वळलेले संतपुरुष होते. परंतु, सर्वसामान्य समाजाकडे मात्र त्यांनी पाठ फिरविली नव्हती. स्वतःच्या संसारापेक्षा सर्व समाजाच्या संसाराची काळजी वाहणारे ते खरेखुरे संत होते.

संत गाडगेबाबांचा पोशाख / पेहराव

गाडगेबाबांच्या डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस , पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ शर्ट असायचा. बाबांची शरीरयष्टी जाडजूड , धिप्पाड देह होता. नेसायला एक लुंगी. एका पायात कापडाचा बूट, तर दुसरा पाय अनवाणी असायचा.

हातात एक काठी अन एक गाडगे, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले; त्यांच्याजवळ नेहमी गाडगे असायचे म्हणून त्यांना लोक 'गाडगे महाराज' म्हणत असत.

संत गाडगे महाराजांचे कीर्तन | sant gadge maharaj kirtan

वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा, सग्यासोयऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगेसोयरे, सगळे विश्व हेच आपले घर,' असे मानून ते वावरू लागले. गावोगाव भजन-कीर्तन करत ते फिरू लागले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा बाबत असणारे दोष दूर करण्यासाठी गावोगावी भजन, कीर्तनाच्या माध्यमातून  लोकांचे प्रबोधन केले. भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास. गाडगेबाबांच्या कीर्तनाला दहा-दहा हजार लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. ते कुणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपले रे संपले, की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. 

'लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही, असे त्यांचे म्हणणे असे. कीर्तनात ते सांगायचे काय ? कळवळून ते म्हणायचे, 'बाबांनो, आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे. त्याला जागं करा. हा उपदेश करत गावेच्या गावे, शहरेच्या शहरे गाडगेबाबांनी पायांखाली घातली. 

बाबांचा एक नियम होता. तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी, ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे, फावडी, घमेली मागवत. मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई. या गर्दीत कुणी पाया पडायला आला, की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, 'तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन् दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता. व्हा बाजूला. बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं आता !' गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.

"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. 

आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात."{alertSuccess}

१४ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले. 

संत गाडगेबाबा यांचे कार्य 

स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि भूतदया यांवर गाडगे महाराजांचा विशेष भर असे. ते ज्या गावी कीर्तनासाठी जात तेथील सर्व परिसर स्वतः हातात झाडू घेऊन प्रथम स्वच्छ करीत असत. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा बाबत असणारे दोष दूर करण्यासाठी भजन, कीर्तन करून समाज प्रबोधन केले. गावोगावी फिरून  सर्व गाव झाडून स्वच्छ केले.

महाराष्ट्रामध्ये  पंढरपूर , नाशिक, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्र  ठिकाणी बाबांनी स्वतः राबून, कष्ट करून, मदत मागून धर्मशाळा बांधल्या. काही नदयांवर घाट बांधले, पाणपोया उघडल्या. गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. 

मुलांसाठी शाळा, महाविदयालये, वसतिगृहे उभी केली. दुःख दिसले की बाबा तिथे धावत. दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले, की बाबा तिथे हजर! स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा दयायचे. त्यांतून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावे उभी व्हायची. त्यांनी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक. रंजल्या-गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा !  

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश 

  1. भुकेलेल्यांना अन्न द्या.
  2. तहानलेल्यांना पाणी द्या.
  3. उघड्यानागड्यांना वस्त्र द्या.
  4. बेघरांना आसरा द्या.
  5. अंध, पंगू रोगी यांना औषधोपचार करण्यासाठी मदत करा.
  6. बेकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करा.
  7. पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय द्या.
  8. गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून द्या.
  9. दुःखी व निराशांना हिंमत द्या.
  10. गोरगरिबांना शिक्षण द्या. शिक्षण घेण्यासाठी मदत करा.

हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे ! असा दशसूत्री संदेश महान संत गाडगे महाराजांनी जनतेला दिला आहे. 

संत गाडगेबाबा यांचे विचार | Sant Gadge Baba Yanche Vichar

  • दगडात देव नाही तर,देव माणसात आहे.
  • विद्या शिका आणि गरिबाले, विद्ये साठी मदत करा.
  • शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
  • माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे, हाच बोध मी ग्रहण केला आहे.
  • शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते ,आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.
  • धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके  प्राणी बळी देवू नका.
  • दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.
  • दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय, सुखाचे किरण दिसत नाही.
  • दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका.
  • माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.
  • अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक. रंजल्या-गांजलेल्यांची सेवा हीच देवपूजा !
  • अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा.
  • जो वेळेवर जय मिळवतो, तो जगावरही जय मिळवतो.
गाडगे महाराजांचा उपदेशही अतिशय साधा व सोपा असे. चोरी करू नका, कर्ज काढून सावकाराच्या पाशात आपली मान अडकवू नका, व्यसनांच्या अधीन होऊ नका, देव व धर्म यांच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका या गोष्टी आपल्या कीर्तनातून ते श्रोत्यांना सांगत असत. त्याचबरोबर माणसांनी एकमेकांशी प्रेमाने व बंधुभावाने व्यवहार करावा, अडल्या नडलेल्यांची, रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करावी, भूतदया म्हणजेच परमेश्वराची पूजा होय असा उपदेशही ते लोकांना करीत असत. माणसाला संसारात राहूनही देवभक्ती करता येते, असे त्यांचे सांगणे असे. नैतिक मूल्यांची जपणूक, मानवता आणि परोपकार यांचे धडे त्यांनी आपल्या कीर्तनातून दिले. 
'महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ' असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. {alertSuccess}

नीलेश जलमकर दिग्दर्शित डेबू तसेच राजदत्त-दिग्दर्शक देवकीनंदन गोपाळा हे चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आधरित आहे.  

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत  स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे. 

विठल वाघ यांनी डेबु ही कादंबरी  लिहिली. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रबोधनकार ठाकरे यांनी मानवतावादी युगपुरुष संत गाडगेबाबा ही कादंबरी लिहिली.

गाडगे महाराज यांचे लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. दिनांक २० डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी (sant gadge baba punyatithi) असते.  संत गाडगेबाबा यांची समाधी अमरावती येथे आहे. तसेच गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (sant gadge baba amravati university) असे नाव दिले आहे. 

हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                           

Previous Post Next Post