समावेशित शिक्षण म्हणजे काय? | What is inclusive education?

भारतीय घटनेनुसार प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळाला आहे. 'बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009' Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 (शिक्षण हक्क कायदा 2009) नुसार वय वर्ष 14 व दिव्यांग मुलांसाठी वय वर्ष 18 पर्यंत शिक्षण घेण्याचा अधिकार बालकाला मिळाला आहे. 

What is Inclusive education


{tocify} $title={अनुक्रमणिका}

समावेशित शिक्षण म्हणजे काय? What is inclusive education?

प्रस्तावना

देशातील प्रत्येक बालकाला मूलभूत प्राथमिक शिक्षण मिळावे, यासाठी भारत सरकारने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची मोहीम म्हणजेच पूर्वीची 'सर्व शिक्षा अभियान' आता 'समग्र शिक्षा' ही योजना राबविण्यात आली. सुरुवातीला 'अपंग समावेशित शिक्षण' (Inclusive education for disabled) ही योजना राबविण्यात आली. यातूनच पुढे 'समावेशित शिक्षण संकल्पना' (Inclusive Education) विकसित झाली आहे. आणि प्रत्येक घटकातील कोणतेही मूल भेदभाव विरहित 'सर्व समावेशक' पध्दतीने नजिकच्या शाळेत शिक्षण घेत आहे. 

सुरुवातीला या योजनेमध्ये अपंग बालकांच्या समावेशनावर भर देण्यात आला होता. आज अपंग किंवा विशेष गरजा असणाऱ्या बालकांना 'दिव्यांग' संबोधण्यात येते.

आधुनिक काळातील शिक्षण व्यवस्थेमध्ये होणाऱ्या आमूलाग्र बदल लक्षात घेता, वर्गातील मुलांच्या शिक्षण घेण्याच्या गरजा लक्षात घेऊन सहाय्य करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेता, सर्वसमावेशक वर्ग  तयार करण्यात येत आहे.

यासाठी शिक्षक ,पालक ,पर्यवेक्षकीय यंत्रणा , अंगणवाडी ताई यांना 'सर्वसमावेशक' शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गरजेनुसार आवश्यक तेव्हा प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने सुरू आहे.


समावेशित शिक्षणाची पार्श्वभूमी


'RTE Act 2009' नुसार प्रत्येक बालकांना प्राथमिक शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त आहे. सर्वसामान्य बालकांबरोबर विशेष गरजा असणाऱ्या (अपंग) दिव्यांग बालकांनाही शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. 

यापूर्वी पासूनच जागतिक स्तरावर अपंग बालकांच्या समावेशनासाठी प्रयत्न सुरू आहेत. अगदी सुरुवातीला 'मानवी हक्काचा जाहीरनामा 1948' मध्येच नमूद होते की, सर्व मानव जन्मतः स्वतंत्र असून ते सर्व समान आहेत. 

त्यानंतर 'भारतीय शिक्षण आयोग' (1964-66) , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (1986) ,  समावेशित शिक्षण संकल्पना Concept of inclusive education 1960 मध्ये बऱ्याच देशांतून अस्तित्वात आली. 1981 च्या ‘आंतरराष्ट्रीय अपंग वर्षा’  पासून या संकल्पनेस चालना मिळून प्रसार झाला. 

'सलमानका जाहीरनामा 1994' , 'दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016' (RPWD Act 2016) , राष्ट्रीय अभ्यासक्रम 2000 ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) पर्यंत जेवढे पण शिक्षणाशी संबंधित धोरणे, कायदे झालेत त्यामध्ये 'समावेशित शिक्षणाला' अधोरेखित करून त्यावर भर देण्यात आला आहे.

समावेशित शिक्षणाचा अर्थ inclusive education meaning


सर्वसामान्य मुलांसमवेत समवयस्क वयोगटातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व (अपंगत्व) cwsn असलेल्या त्याचबरोबर प्रतिभावान , मागासवर्गीय , अल्पसंख्यांक गटातील , आदिवासी मुले अशा सर्व प्रकारच्या मुलांना 'सामान्य शाळेत' सामान्य वर्गात 'प्रवेश' देणे व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे 'समावेशीत शिक्षण' देणे.

समावेशन  (Inclusion)


'समावेशन'(Inclusion) म्हणजे सर्व मुले एकत्र शिकतील आणि समाजाच्या मूळ प्रवाहाचे घटक होतील. 'समावेशन' (Inclusion) ही अशी संकल्पना आहे की ती सर्व मुलांना एकत्रित समावेशित करते.{alertSuccess}

हे ही वाचा

विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे सामान्य शाळांच्या मूळ प्रवाहामध्ये समावेशन व्हावे म्हणून जागतिक स्तरावर देखील खूप पूर्वीपासून विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे 'समावेशन' व्हावे यासाठी कायदे व नियम केले आहेत. 

भारतीय संविधानाच्या 'कलम 21' अनुसार भारतीय संविधानानुसार, शिक्षणाचा हक्क सर्व भारतीयांचा मूलभूत हक्क आहे.{alertSuccess}

86 वा घटना दुरुस्ती कायदा 2002 'आर्टिकल 21-अ'  नुसार , (अपंगत्व असलेल्या, अपंगत्व नसलेल्या) '6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्वच मुलांना' 'मोफत व सक्तीचे शिक्षण' देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

अपंग व्यक्ती 'समान हक्क व समान संधी आणि संपूर्ण सहभाग कायदा 1995' (PWD ACT 1995) चा सुधारित कायदा म्हणजे 27 डिसेंबर 2016 रोजी पारित झालेला 'दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016' (RPWD ACT 2016) अनुसार आता 'दिव्यांग 21 प्रकारातील' अपंगत्व असलेल्या सर्व व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणेच शिक्षणाची समान संधी मिळण्याचा व शिक्षण प्रक्रियेत सहभागाचा हक्क आहे.

समावेशित शिक्षण म्हणजे काय? what is inclusive education?


'समावेशित शिक्षण' ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये विभिन्न गरजा असलेल्या सर्व प्रकारचा अध्ययनार्थी दृष्टिकोन ठेवून अध्ययन , संस्कृती , समुदाय यामध्ये सहभागी करून घेतले जाते. गरजेनुसार एकत्रपणे समवयस्क मुलांसोबत शिकण्याची संधी उपलब्ध होते. विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) मुलांचे शिक्षण हे सर्वसामान्य शिक्षणाचाच एक भाग शिक्षणाचीच जबाबदारी आहे असे मानले जाते.

समावेशन म्हणजे काय? What is inclusion?

 
'समावेशन' म्हणजे विभिन्न क्षमता असलेल्या मुलांचा (यामध्ये दिव्यांग व कुशाग्र/दैवी बुद्धिमत्ता असलेल्या दोन्ही प्रकारांचा समावेश होतो.) सर्व शालेय उपक्रम व सहशालेय कार्यक्रमांमध्ये सर्वसामान्य मुलांसोबत असा सहभाग, ज्यात सर्व मुलांबरोबरच विभिन्न गरजा असलेली मुले ही सहभागी होतील. सर्वसामान्य शाळा आणि वर्ग विविध गरजा असलेल्या सर्व मुलांच्या गरजांचा प्रामाणिकपणे स्वीकार करतील आणि त्यांच्यातील भिन्नता लक्षात घेऊन त्यांच्या विशेष गरजा पूर्ण करतील. म्हणजेच 'समावेशन'(Inclusion) होय.


आधुनिक शिक्षण पद्धती मध्ये अमुलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो. यासोबतच समावेशित शिक्षणाच्या संकल्पनेत देखील बराचसा बदल झाला आहे. केवळ 'दिव्यांग' मुलांचे 'समावेशन' एवढ्यापुरतेच समावेशन मर्यादित न राहता, सर्व दुर्बल घटकांचे, मागास घटकांचे शिक्षणही यात विचारात घेतले जात आहे. 

पूर्वी समावेशीत शिक्षणाचा अर्थ केवळ 'सामान्य मुलांच्या वर्गात विकलांग दिव्यांग मुलांना शारीरिक दृष्ट्या प्रत्यक्ष प्रवेश' असा होता. सामान्य मुलांच्या प्रवेशा बरोबरच शाळेने विशेष मुलांच्या गरजा प्रमाणे पुरवलेले 'अनुकूलित वातावरण व अनुकूलित उपक्रम' असा समावेश शिक्षणाचा अर्थ आहे. मात्र आता 'समावेशित शिक्षण' हे फक्त दिव्यांग मुलांचे समावेशन एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता , वर्गातील सर्व प्रकारच्या भिन्न गरजा असणाऱ्या मुलांच्या साठी समावेशीत वर्ग (Inclusive Classroom) तयार करण्यासाठी समावेशित शिक्षण ही संकल्पना दृढ होत आहे.

समावेशित शिक्षण व्याख्या ? inclusive education definition


"समावेशित शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे असे शिक्षण जेथे सर्व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत समान सहभाग घेतील हा हक्क भारतीय राज्यघटनेने नमूद केला आहे."{alertSuccess}

"समावेशित शिक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या बालकांचा स्वीकार करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ची व्यवस्था होय."

"समावेशित शिक्षण म्हणजे समाजातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची रचना व आवश्यक सोयींची उपलब्धता असणे होय."{alertSuccess}

"सर्वसामान्य मुलांसमवेत समान वयोगटातील विविध प्रकारचे दिव्यांग (अपंगत्व) असलेले तसेच प्रतिभावंत (कुशाग्र बुद्धीमत्ता असणारे) आदिवासी , अल्पसंख्याक गटातील , मागासवर्गीय , शाळाबाह्य तसेच समाजातील सर्व घटकातील मुले एकाच शाळेत समवयस्क मुलांसोबत शिक्षण घेण्याची संधी देणे. आणि त्यानुसार शाळा , वर्गरचना आणि गरजेनुसार आवश्यक सोयींची उपलब्धता करणे."

Q&A


Q- सर्व मुलांसाठी 'समावेशित शिक्षण' आहे तर मग समावेशित शिक्षणात 'विशेष गरजा असणाऱ्या' दिव्यांग मुलांचा जास्त उल्लेख किंवा त्यावर लक्ष केंद्रित का केले जाते?

A- समाजामध्ये खूप पूर्वी पासून दिव्यांग (अपंग) व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बहुतांश नकारात्मक आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलत आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींचे समाजात 'समावेशन' होताना आपल्याला दिसत आहे.

दिव्यांग व्यक्ती कडे अपंगांचे लेबलिंग जास्त प्रमाणात केले गेले. त्यामुळे अपंग व्यक्ती काहीच करू शकत नाही. ही नकारात्मक धारणा आता सकारात्मकाकडे वळत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी शासन स्तरावर केलेल्या उपाययोजना , RPWD Act 2016 हा तर दिव्यांग व्यक्तींना समाजात समावेशन करण्यास हक्क मिळाला आहे. त्यासोबतच शिक्षणाशी संबंधित धोरणे व कायद्यात देखील दिव्यांग बांधवांचे समावेशन करण्यास भर आहे.

'दिव्यांग' व्यक्तींना त्यांच्या दिव्यांग प्रकार निहाय इतर गटातील मुलांच्या तुलनेत आव्हाने अधिक आहेत. म्हणून आव्हानांवर अधिक काम (उपाययोजना) करण्यासाठी  समावेशित शिक्षणामध्ये दिव्यांग मुलांच्या शिक्षणासंबंधी अधिक भर आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच इतर मुलांचे देखील आव्हाने वेगवेगळे आहेत. त्यानुसार समावेशनात सर्वच मुलांचा विचार केला गेला आहे.


सारांश


आधुनिक शिक्षण पद्धती मध्ये अनेक बदल झालेला आहे. जो की, समाजातील सर्व घटकातील मुलांच्या शिक्षणावर भर देणारा 'सर्वसमावेशक' बदल आहे. 
दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी 'सर्व शिक्षा अभियान'  मध्ये 'अपंग समावेशित शिक्षण' ही योजना दिव्यांग मुलांच्या समावेशनासाठी महत्वपूर्ण योजना ठरली. 'अपंग समावेशित शिक्षण'  हा उपक्रम आता 'समग्र शिक्षा' अंतर्गत 'समावेशित शिक्षण' या संकल्पनेत रूपांतरित होऊन सर्व घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी 'सर्वसमावेशक' शिक्षण देण्यासाठी 'समावेशित शिक्षणावर' भर देण्यात आला आहे. 

आजच्या या लेखामध्ये आपण समावेशित शिक्षणाचा अर्थ समजून घेतला तसेच समावेशन (inclusion), समावेशित शिक्षण म्हणजे काय? त्यासंबंधीच्या व्याख्या आणि Q&A याबाबत सविस्तर पणे माहिती घेतली. समावेशित शिक्षण काय आहे? हे जाणून घेण्यासाठी अवश्य हा लेख वाचावा.



नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp लोगो का क्लिक करा. 

Previous Post Next Post