समावेशित शिक्षणाची तत्वे Principles of Inclusive Education by UNESCO

प्रत्येक बालकांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेण्याचा हक्क आहे. विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) बालकांना देखील सर्वसामान्य मुलांप्रमाणे समाजातील प्रत्येक कृतीत सहभाग घेण्याचा अधिकार तर आहेच , परंतु यासाठी सर्व समाजाची किंवा समूहाची ही जबाबदारी आहे की, सर्वांचा समान सहभाग घेऊन सर्वांना समान वर्तणूक देणे आवश्यक आहे.


जगभरामध्ये जवळपास 93 दशलक्ष मुले दिव्यांग आहेत. सर्वसामान्य मुलांच्या सारखेच दिव्यांग मुलांचे देखील (Ambitions and dreams) महत्वाकांक्षा आणि स्वप्ने असतात. सर्वसामान्य प्रमाणेच त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी दिव्यांग मुलांच्या मधील कलागुण शोधण्यासाठी त्यांना वाव देण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता आहे. 

यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेण्याचा हक्क RTE Act 2009 अन्वये प्रत्येक बालकाला प्राप्त झाला असून समावेशित शिक्षण अंतर्गत सर्व मुलांना एकाच शाळेत सर्व मुलांसमवेत नजीकच्या शाळेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.

{tocify} $title={अनुक्रमणिका}

समावेशित शिक्षणाची तत्वे  Principles of Inclusive Education by UNESCO

जगभरातील प्रत्येक व्यक्तीस स्वतः च्या शैक्षणिक प्रगतीसाठी समान संधी उपलब्ध करणे हे एक जगभरातील आव्हान आहे.  शिक्षण आणि शिक्षणावरील शास्वत विकास ध्येय 4 आणि कृती 2030 च्या फ्रेमवर्क मध्ये 'समावेशन' (inclusion) आणि 'समता'  (equity) यावर भर देण्यात आला आहे. 

समावेशित शिक्षण म्हणजे काय? What is inclusive education?

Definition of Inclusive Education by UNESCO 

" समावेशक शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे असे शिक्षण जेथे सर्व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत समान सहभाग घेतील." {alertSuccess}

युनेस्कोने स्पेन मधील सालमनका (salamanca) येथे 7 जून ते 10 जून 1994 या कालावधीत 'विशेष शैक्षणिक गरजा' (special education needs) या विषयावर जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

सालमांनका (salamanca) येथे भरलेल्या परिषदेत राष्ट्रीय ,आंतराष्ट्रीय शैक्षणिक संस्था , प्रशासनातील अधिकारी (92 देशांचे प्रतिनिधी , 25 आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था असे 300 हुन अधिक) लोक सहभागी झाले होते. 

या परिषदेचा मुख्य हेतू विशेष बालकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी समावेशित शिक्षणाचा पुरस्कार करणे व शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्न करणे हा होता. या परिषदेत समावेशित शिक्षण यशस्वी होण्यासाठी चार मूलभूत घटक मांडले गेले. त्यानुसार युनोस्कोने जाहीर केलेले समावेशित शिक्षणाची मूलतत्त्वे खालील प्रमाणे.

>> समावेशित शिक्षण - दिव्यांग योजना सुविधा व सवलती (Inclusive Education)


युनोस्कोने जाहीर केलेले समावेशित शिक्षणाची तत्त्वे Principles of Inclusive Education by UNESCO


समावेशन प्रक्रिया

समावेशन ही एक प्रक्रिया असून, 'समावेशन' ही एक कधीही न संपणारी निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. यात समाजातील विविधतेला सामावून घेण्यासाठी सतत मार्ग शोधले जातात. बालक आणि तरुणांमधील विविधता हा त्यांना अध्ययनास प्रवृत्त करणारा घटक मानला जातो.

समावेशनात शिक्षणातील आव्हाने

समावेशन प्रक्रिया राबवत असताना येणारे विविध प्रकारचे अडथळे व समस्यांचा शोध घेतला जातो. ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षणातील हे अडथळे आव्हाने दूर करण्यासाठी समावेशनात विविधतापूर्ण सर्जनशीलता व समस्या निराकरण यांचा उपयोग केला जातो.

समावेशनात संपूर्ण सहभाग

समावेशनात सर्व मुलांची उपस्थिती, सहभाग आणि संपादन अपेक्षित आहे. (Inclusion) म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची शाळेत  उपस्थिती व सर्व प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमात सहभाग असणे आणि परीक्षेत चांगले यश मिळवणे असा व्यापक करत आहे.

समावेशनात शैक्षणिक प्रगती कमी असणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष

समावेशन प्रक्रियेत , धोक्याचा पातळीवर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाचे काळजीपूर्वक निरीक्षण व मूल्यमापन करणे व त्यांची उपस्थिती आणि सहभाग जास्तीत जास्त वाढवून त्यांचे यश निश्चित करणे ही आपल्या शैक्षणिक प्रशासन यंत्रणेची नैतिक जबाबदारी आहे. समावेशनात जी मुले सर्व मुलांपासून वेगळी पडण्याची शक्यता आहे व जी मुले शाळेत इतर मुलांमध्ये वेगळी पडली आहेत, ज्यांची शैक्षणिक प्रगती कमी आहे अशा मुलांकडे 'विशेष लक्ष' दिले जाते.

दिव्यांग म्हणजे काय? दिव्यांग 21 प्रकार

सालमानका (salamanca) निवेदनातील महत्वाच्या तरतुदी salamanca statement (inclusive education)

> समावेशित शाळा प्रणाली ही प्रभावी असून त्याचे सर्वांनी स्वागत करावे.

> विशेष बालकांना सामान्य शाळेत प्रवेश दिला गेला पाहिजे.

> प्रत्येक बालकांमध्ये व्यक्ती भिन्नता आहे.

> प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे.

> शिक्षण व्यवस्थेने बालकांच्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा विचार केला पाहिजे.

> कायदे व धोरणामध्ये समावेशी शिक्षणाच्या तत्त्वांचा स्वीकार करावा.

> शासन संस्थांनी शैक्षणिक व्यवस्था समावेशित करण्यावर भर द्यावा.

> बालकांची ओळख व समस्यांचा शोध लहानपणीच घेण्याची व्यवस्था करावी.

> विशेष बालकांचे पालक व स्वयंसेवी संस्थांचा शालेय व्यवहारात सहभाग वाढवावा.

> समावेशित शिक्षणात व्यवसायिक शिक्षणाचा समावेश करावा.

> विशेष बालकांच्या अध्यापनासाठी आवश्यक विशेष शिक्षक प्रशिक्षणाची व्यवस्था करावी.


सारांश

युनेस्को UNESCO द्वारा जाहीर समावेशित शिक्षण तत्वे संबंधित तरतुदी नुसार राष्ट्रीय स्तरावर समावेशित शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009' राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा , किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी 'दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016' (RPWD Act 2016) असेल किंवा नुकतेच जाहीर केलेले 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' (NEP 2020) शैक्षणिक संबंधित सर्व कायदे व धोरणे यांचा अभ्यास करता समावेशित शिक्षण (समावेशन) व समतेवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार समावेशित वर्ग ,शाळा तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरापासून  Capacity building तयार होत आहे. यासाठी प्रत्येक पालक ,शिक्षक , मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासोबतच समावेशन करण्यासाठी समाजाची किंवा समुहाची ही तेवढीच जबाबदारी आहे की, सर्वांचा समान सहभाग घेऊन सर्वांना समान वर्तणूक दिली पाहिजे.


>> समावेशित शिक्षण - दिव्यांग योजना सुविधा व सवलती (Inclusive Education)

Previous Post Next Post