विशेष गरजा असणारी बालके | Children With Special Needs

शिक्षण घेणे प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या उद्दिष्टानुसार प्रत्येक बालकास प्राथमिक शिक्षण हे घराजवळच्या नियमित शाळेत पूर्ण करण्याचा अधिकार 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009' (The Right to Education Act 2009) RTE Act 2009 अन्वये प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये Children With Special Needs विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा देखील समावेश आहे. मूल कोणतेही असो , प्रत्येक बालकास शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्याप्रति प्रत्येक मूल शिकू शकते , हा विश्वास बाळगणे आवश्यक आहे.

विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे समावेशनसाठी अपंग समावेशित शिक्षण हा उपक्रम राबविण्यात आला. आता 'समग्र शिक्षा' अंतर्गत उपक्रमाची यशस्वीता लक्षात घेता, केलेले अनुकुलित वातावरण ,वर्ग सर्वच मुलांसाठी प्रभावी ठरत असून आता समावेशित शिक्षण सर्वच घटकातील मुलांसाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रभावी ठरत आहे. समावेशित शिक्षण म्हणजे काय? क्लीक करा. lertInfo}

आपल्या समाजा मध्ये आपणास भिन्न प्रकारचे व्यक्ती , बालक दिसून येतात. त्यामध्ये भिन्न विचारसरणी  ,संस्कृती , जात ,धर्म ,पंथ, शारीरिक ,मानसिक ,भावनिक अशा सर्वांगीण गोष्टीचा विचार करता प्रत्येक जण वेगळा आहे. आणि प्रत्येकाच्या गरजा देखील भिन्न प्रकारच्या आहेत. मग शिक्षण व्यवस्थेमध्ये जवळच्या शाळेत शिक्षण घेणारे  शाळेतील प्रत्येक बालक हा वेगळा आहे.

कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राचे कौशल्य आहेत. ज्यावेळी आपण मुलांच्या स्व-ची ओळख (Self awareness) करतो तेव्हा हे विविध कलागुण आपणास दिसून येतात.

Children With Special Needs



पूर्वीच्या शिक्षण पद्धती चा विचार करता , सध्याच्या शिक्षण पद्धती मध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. पूर्वी प्रत्येक बालकास शिक्षण घेणे अडचणीचे होते. समाजामध्ये एक घटक म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा गट , मुळात प्रत्येक मूल हे 'मूलच' आहे. परंतु पूर्वीच्या अंधश्रद्धा ,रूढी ,परंपरा नुसार काही घटकांना वेगळ्या प्रकारचे लेबलिंग लावण्यात आले. ते आता हळूहळू बदलत आहे.

आपण हेलन केलर , थॉमस एडिसन यांच्या बद्दल ऐकले असेल हे देखील एक विशेष गरजा असणारे बालकच होते. पूर्वी हेलन केलर यांनी अंध मुलांना शिकण्यासाठी ब्रेल लिपी चा शोध लावला. 

प्रत्येक मुलांची गरज वेगळी त्याप्रमाणे शिक्षण पद्धती मध्ये आवश्यक तो बदल वेळोवेळी होत गेला. हा शिक्षणाचा आलेख उंचावत जाऊन आज एका उंचीवर जाऊन पोहचला आहे. पूर्वीची विशेष शिक्षण (special education) शिक्षण पद्धती मध्ये दिव्यांग (अपंग) मुलांनीच शिकावं , दिव्यांग मुलांसाठी विशेष शाळा असतात. तिथेच त्यांनी शिक्षण घ्यावं. हा विचार आता सर्वसमावेशक होऊन मूल कोणतेही असो , ते नजीकच्या शाळेत शिक्षण घेऊ शकेल हा 'शिक्षण हक्क कायदा 2009' नुसार प्रत्येक मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला आहे.


Children With Special Needs Definition विशेष गरजा असणाऱ्या बालकांची व्याख्या


सर्वसामान्य बालकांपेक्षा भिन्न क्षमतागरजा असणाऱ्या बालकास 'विशेष बालक' (special child) म्हणजेच विशेष गरजा असणारे बालक  (Children With Special Needs) असे संबोधले जाते. उदा. शारिरीक , भावनिक , वर्तन समस्या , शिकण्यातील अडचणी किंवा हलनचलन , दिव्यांग बालकांच्या गरजा अशा विविध गरजा आणि क्षमता भिन्न असणारे बालक म्हणजे विशेष गरजा असणारे बालक होय. CWSN Full Form - Children With Special Needs

विशेष गरजा असणारे बालक CWSN हे सामान्य बालकांपेक्षा शारीरिक ,बौद्धिक ,सामाजिक दृष्टया सामान्य मुलांच्या तुलनेत यांना अधिक मार्गदर्शकाची आवश्यकता भासते. Cwsn मूल यांची वाढ व विकास देखील सामान्य मुलांच्या तुलनेत भिन्न असतो. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना दिव्यांग बालक म्हणून देखील ओळखले जाते. Cwsn मुलांच्या गरजा व क्षमता भिन्न असल्याने त्यामध्ये RPWD Act 2016 'दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016' नुसार दिव्यांग 21 प्रकार types of disability आहेत. त्यामध्ये खालील दिव्यांग प्रकाराचा समावेश होतो. प्रत्येक मुलाची गरज आणि क्षमता वेगळी आहे. त्यानुसार 21 प्रकारातील हे मूल विशेष बालक आहे.

21 types of disability


1. Blindness - अंध
2. Low-vision-अंशतः अंध (दृष्टिदोष)
3. Hearing Impairment (deaf and hard of hearing) - कर्णबधिर
4.Speech and Language disability - वाचादोष
5. Locomotor Disability- अस्थिव्यंग
6.Mental Illness- मानसिक आजार
7. Specific Learning Disabilities - अध्ययन अक्षमता
8.Cerebral Palsy - सेरेब्रल पालसी (मेंदूचा पक्षाघात)
9. Autism Spectrum Disorder - स्वमग्न
10. Multiple Disabilities including deafblindness - बहुविकलांग
11. Leprosy Cured persons - कुष्ठरोग
12. Dwarfism- बुटकेपणा
13. Intellectual Disability- मतिमंद
14. Muscular Dystrophy -अविकसित मांसपेशी
15. Chronic Neurological conditions- मज्जासंस्थेचे तीव्र आजार
16. Multiple Sclerosis - मेंदूतील चेतासंस्था संबंधी आजार
17.Thalassemia- रक्ता संबंधी कॅन्सर
18. Hemophilia- रक्तवाहिन्या संबंधित आजार
19.Sickle Cell disease - रक्ता संबंधी रक्ताचे प्रमाण कमी
20. Acid Attack victim - acid हल्लाग्रस्त पीडित
21. Parkinson's disease - कंपावत रोग

दिव्यांग प्रकार सविस्तर माहिती घेण्यासाठी वाचा - दिव्यांग 21 प्रकार

New education policy special child नविन बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार 


विशेष गरजा असणारे बालक म्हणजे दिव्यांग बालकांचाच यामध्ये समावेश होतो असे नाही. दिव्यांग प्रकार निहाय दिव्यांग बालक हे विशेष बालक म्हणून ओळखले जाते. 

परंतु याव्यतिरिक्त देखील शाळेतील वर्गात भिन्न प्रकारचे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामध्ये कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे बालक, प्रतिभावंत विद्यार्थी ज्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्याची आवश्यकता लागतेच म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या बालकास देखील 'विशेष बालक' म्हणून ओळखले जाते. 

त्याचबरोबर बहुभाषिक , आदिवासी ,विशिष्ट विषयामध्ये प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी हे देखील एक प्रकारचे विशेष बालक आहे. यांच्या देखील गरजा आणि क्षमता भिन्न प्रकारच्या आहेत. थोडक्यात काय तर वर्गातील प्रत्येक मूल वेगळे आहे आणि प्रत्येक मूल शिकू शकते. यासाठी प्रत्येक मुलाची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन  सपोर्ट करणे आवश्यक आहे. 

त्यासोबत अध्ययन-अध्यापन पध्दती , शैक्षणिक साहित्य यामध्ये आवश्यक तो बदल करणे आवश्यक आहे. म्हणजे काही मुलांना ऐकून चांगले समजते. तर काहींना प्रत्यक्ष कृती करून चांगले  लक्षात राहते. प्रत्येक मुलाची शिकण्याची अध्ययन शैली समजून घेणे आवश्यक आहे. 

अध्ययन शैली बाबत अधिक जाणून घ्या. 

प्रत्येक बालकांप्रमाणे विशेष मूल special child हे शालेय शिक्षण व शालेय वातावरणातील आनंदापासून दूर राहता कामा नये, ते सुद्धा जिवंत बालक आहे. त्यांना सुद्धा त्यांच्या भावना आहेत. त्यांनाही सर्वांप्रमाणे भावना व्यक्त करण्यासाठी नियमित वातावरणात संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ही संधी विशेष गरजा असणाऱ्या बालकांना children with special needs बालकांना मिळवून देण्यासाठी मुलांची अडचण नसून ती समाजासाठी अडचण ठरलेली आहे. याचाच अर्थ असा आहे की, विशेष मुलांस (special child) संधी प्राप्त करून देऊ न शकणाऱ्या व्यक्तींना एक आव्हान challenge  ठरले आहे.

म्हणजेच समाज धारणेनुसार त्यांच्या अपंगत्वाकडेच (disabilty) अधिक लक्ष दिले जाते. परिणामी दिव्यांग मूल म्हणजे काही करू शकत नाही , अशी नकारात्मक भावना या अपंग शब्द लेबलिंग लावल्यामुळे तयार होते. मात्र याउलट त्यांच्याकडे असणारे विशेष कौशल्य , प्रतिक्रिया शोधण्यास व कौशल्यानुसार संधी उपलब्ध करून देण्यास आपण कमी पडतो. हे नाकारता येत नाही.

प्रत्येक मुलांच्या आव्हानानुसार त्यावर काम करणे आवश्यक आहे. यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण पद्धती , माहिती तंत्रज्ञान अशी प्रगत साधने उपलब्ध झालेली आहे. दिव्यांग मुलांकडे नकारात्मक भावनेतून न बघता त्यास समाजात संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.



Previous Post Next Post