दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय | Online Education for Divyang students

Learning From Home  शाळा बंद, पण शिक्षण सुरू राहण्यासाठी सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षण हा पर्याय पुढे आला आहे. शिक्षणात सातत्य राहण्यासाठी वेगवेगळे पर्याय सध्या पुढे येत आहे. काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण प्रभावी ठरत आहे, तर काही ठिकाणी ऑफलाईन , ऑनलाईन शिक्षणासाठी विशेषतः ग्रामीण भागात पूरक सुविधा अभावी मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र यावर मात करून देखील शिक्षणाचे इतर पर्यायातून मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी मदत होत आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण पर्याय


कोरानाच्या वाढत्यप्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. मुलांचे शिकणे, सुरु राहावे यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वच यंत्रणा शिक्षण सुरु राहण्यासाठी सातत्याने ऑनलाईन/ ऑफलाईन माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. त्यातच प्रत्येक मुल वेगळे आहे. त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. अशा वेळी ऑनलाईन/ ऑफलाईन Learning From Home मध्ये शिक्षण घेत असताना खूप आव्हाने सध्या समोर येत आहे. मात्र जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोवर सध्या तरी याच माध्यमातून शिक्षण सुरु राहण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक झाले आहे. 

सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सची) घोषणा | Bridge Course announcement

ज्या प्रमाणे प्रत्येक मुलांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यातच दिव्यांग मुलांना ऑनलाईन शिक्षण हे मोठे आव्हान आहे. सद्यस्थितीत उपलब्द असणारे दिव्यांग मुलांसाठी ऑनलाईन /ऑफलाईन शिक्षणाचे पर्याय ? याविषयीची माहिती घेणार होत.

{tocify} $title={Table of Contents}

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय | Online Education for Divyang students 

दिव्यांग २१ प्रकार निहाय विचार करता , मुलांच्या गरजा आणि क्षमता लक्षात घेऊन आपण मुलांना सर्व मुलांसमवेत एकाच वर्गात शिक्षण (समावेशित शिक्षण) देत असतो. शैक्षणिक दृष्टीने विचार करता प्रत्येक मुल अध्ययन शैली ने शिकत असते. 

पुढे जाण्याआधी हे अवश्य वाचावे.

अध्ययन शैली म्हणजे काय ? व अध्ययन शैलीचे प्रकार 

SCERT अभ्यासमाला

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र SCERT PUNE आयोजित SCERT अभ्यासमाला क्र.2 सुरु करण्यात आली आहे. गतवर्षी मध्ये अभ्यासमाला व्यतिरिक्त SCERT स्वाध्याय हा उपक्रम मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सराव करून घेण्यासाठी सहाय्य ठरला. 

चालू शैक्षणिक वर्षात अभ्यासमाला मध्ये विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी SCERT अभ्यासमाला मध्ये दररोज लिंक उपलब्द करून देण्यात येत आहे. यामध्ये विशेषतः कर्णबधीर (Hearing Impairment) विद्यार्थ्यांना या अभ्यासमालेचा अधिक लाभ मिळत आहे. व्हिडिओ मध्ये Indian Sign Language चा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच इतर दृश्य अध्ययन शैली , स्पर्श अध्ययन शैली , श्राव्य आणि बहुअध्ययन शैलीच्या मुलांना देखील या अभ्यासमालेची मदत मिळत आहे. 

दिव्यांग मुलांसाठी त्यांच्या गरजा व क्षमता लक्षात घेऊन अध्ययन अनुभव द्यावे लागतात. मात्र यासाठी संपूर्ण राज्यभरात एकसुत्रता एकसमान ई-साहित्य तयार करताना खूप सारे आव्हाने येत असतात. अशा वेळी सद्यस्थितीत दिव्यांग मुलांचा अध्ययन स्तर लक्षात घेऊन त्यांना SCERT अभ्यासमाला पोहचवणे आवश्यक आहे. जेणेकरून दिव्यांग मुलांचे शिकणे सुरु राहील.

दिव्यांग २१ प्रकार  विचारात घेता, विद्यार्थ्यांची अध्ययन शैली (गरज व क्षमता) लक्षात घेऊन  SCERT अभ्यासमाला  मधील लिंक मुलांना उपलब्ध करून दिल्यास मुलाचे शिकणे सोपे होईल. यासाठी पालक, भावंडे यांची मदत घेऊन त्यांना दिक्षा APP बद्दल अधिक मार्गदर्शन करून SCERT अभ्यासमाला द्वारे शिक्षण सुरु ठेवता येईल.

टीपआपल्याला आपल्या वर्गशिक्षकांमार्फत पालकांच्या मोबाईलमध्ये व्हाट्स अपवर आलेल्या SCERT अभ्यासमाला सुचनेतील (विषयनिहाय ,पाठनिहाय)  विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग)  विद्यार्थ्यांसाठी लिंकना टच करून तो पाठ DIKSHA APP मध्ये पहायचा किंवा स्वाध्याय सोडवायचा आहे. {alertInfo}

OFFICIAL WEBSITESCERT अभ्यासमाला

हे ही अवश्य वाचा

> DIKSHA APP कसे वापरावे ? 


DIKSHA APP

DIKSHA APP हे android Play Store मध्ये मोफत उपलब्ध असणारे app आहे. दिक्षा app मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेतील ई-लर्निंग साहित्य उपलब्ध आहे. 

प्रत्येक शिक्षक,विद्यार्थी,पालक यांना मोफत आणि मुबलक प्रमाणात ई-लर्निंग साहित्य मिळावे, म्हणून केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने DIKSHA ई-लर्निंग Platform सुरु केला आहे. 

दिक्षा app मध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके, शैक्षणिक विषय-घटक निहाय व्हिडिओ, ऑडीओ,pdf,ppt इ. स्वरुपात ई-कंटेंट उपलब्ध आहे. याचा विद्यार्थी कोरोनाच्या आधीपासूनच ई-लर्निंग मध्ये अध्ययन अनुभव घेत आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षण पर्याय पुढे आल्याने दिक्षा app चा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पूर्वी पेक्षा दिक्षा app वापरण्यास खूप सोपे झाले आहे. 

दिव्यांग मुलांसाठी समावेशित शिक्षण विषयावर देखील शिक्षकांसाठी निष्ठा प्रशिक्षण (कोर्स) यामध्ये उपलब्द असून याचा अध्ययन-अध्यापन सुलभ होण्यासाठी मदत होते. तसेच दिव्यांग मुलांच्या अध्ययन स्तरानुसार ई-कंटेंट दिक्षा app मध्ये उपलब्ध असून विद्यार्थ्यांची गरज व क्षमता लक्षात घेऊन मुलांना संबंधित लिंक उपलब्द करून देणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी स्वतः किंवा पालक , सवंगडी , भावंडे , वर्गशिक्षक यांची मदत याकरिता घेऊन शिक्षण सुरु ठेवण्यास निच्छितच मदत मिळेल. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र SCERT PUNE  आयोजित SCERT अभ्यासमाला क्र. 2 सुरु करण्यात आली आहे. यावर्षीपासून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष ई-कंटेंट व्हिडिओ तयार करण्यात आले असून , SCERT अभ्यासमाला द्वारे नियमितपणे पालकांच्या WHATSAPP वर SCERT अभ्यासमाला पाठवण्यात येते. यासाठी वरील SCERT अभ्यासमाला यामध्ये अधिक माहिती आपणास मिळेल.

हे ही वाचा

>  दिक्षा APP चा वापर कसा करावा?


DD सह्याद्री वाहिनीवरील ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम (Sahyadri Telecast Lecture)


SCERT PUNE  यांच्या मार्फत सुरु करण्यात आलेला डीडी सह्याद्री वाहिनीवरील ‘ज्ञानगंगा’ हा शैक्षणिक कार्यक्रम सध्या सुरु आहे. ज्याप्रमाणे आज प्रत्येक घरात स्मार्टफोन आहे. तसेच प्रत्येकाच्या घरोघरी (टेलिव्हिजन) टीव्ही देखील आहे. याचाच मुलांच्या शिक्षणासाठी देखील आता उपयोग होऊ लागला आहे. 

विशेषतः ग्रामीण भागात नेटवर्क किंवा इतर सुविधा अभावी  ऑनलाईन शिक्षणामध्ये अडथळा येतो. मात्र टेलेव्हिजन च्या माध्यमातून मुलांना ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिकण्यास मदत होऊ लागली आहे. 

जून २०२१ मध्ये इयत्ता १० वी ते १२ वीच्या विषयनिहाय तासिकाचे आयोजन ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमा द्वारे सुरु आहे. आणि लवकरच इयत्ता १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी देखील डीडी सह्याद्री वाहिनीवर तासिकेचे प्रेक्षपण सुरु होणार आहे. 

दिव्यांग मुलांना देखील या डीडी सह्याद्री वाहिनीवरील तासिकांचे पालक, सवंगडी, भावंडे , वर्गशिक्षक यांच्या सपोर्ट घेऊन शिक्षण सुरु ठेवण्यास मदत होऊ शकेल.

दिव्यांग मुलांचे शिक्षण म्हणजे वेगळे काही आहे का? असे आपल्याला दिव्यांग हा शब्द कानावर पडताच वाटते. निच्छितच जसे प्रत्येक मुल वेगळे आहे. आणि ते त्याच्या गतीने शिकत असते. यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजा व क्षमता लक्षात घेऊन आपण सपोर्ट करणे आवश्यक आहे. 

मुलांच्या शिकण्याच्या पद्धती आपल्या लक्षात आल्यास मुलांना अध्ययन अनुभव देणे सोपे होते. म्हणजे तसे ई-कंटेंट आपण मुलांना देऊ जेणेकरून मुले आनंदाने शिक्षण घेऊ शकतील, यासाठी अध्ययन शैली व अध्ययन शैलीचे प्रकार समजून घेणे महत्वाचे ठरते. 

(दिव्यांग मुलांचा अभ्यासक्रम वेगळा नसून मुलांच्या गरजेनुरूप अभ्यासक्रमातील विषय व घटक निहाय अनुकूलन आणि शैक्षणिक साहित्य (ई-कंटेंट) निर्मिती १६ ऑक्टोंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार मूल्यमापन करून सर्वसामान्य मुलांच्या सोबत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे. म्हणजेच दिव्यांग मुलांचे समावेशन करण्यास मदत होईल. 

सर्वांसाठी शिक्षण आणि समावेशक शिक्षण हा आपल्या शिक्षणाचा मध्यवर्ती हेतू साध्य होण्यास मदत होईल. 
दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे उद्‌दिष्ट समोर ठेवून त्यांच्यातील सुप्त क्षमतांचा विकास करणे तसेच समाजात वावरताना त्यांना समान संधी, सहभाग आणि समान हक्क उपलब्ध करून देण्याचे धोरण शासनाने अमलात आणले आहे.)

अवश्य वाचा


ई-बालभारती (E-balbharati)

ई-टेक्स्ट बुक (e-Book Library)

बालभारती हे नाव आपणा सर्वांनाच परिचयाचे आहे. दरवर्षी पाठ्यपुस्तक आपणास बालभारती मार्फत पुरवण्यात येते. बालभारतीच्या वेबसाईटवर शैक्षणिक ई-कंटेंट उपलब्द आहे. 

ऑनलाईन शिक्षण घेत असताना बालभारती कडून इयत्ता १ ली ते 12 वी इयत्तेचे Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu, Tamil, Bengali माध्यमाचे पुस्तके ऑनलाईन PDF स्वरुपात डाउनलोड करता येतात. 

आपण ई-बालभारती च्या वेबसाईटवर भेट देवून आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरुपात पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देवू शकतात.

ई- Talking Audio Books

दिव्यांग मुलांसाठी  श्राव्य स्वरुपात Talking Audio Books स्वरुपात देखील उपलब्ध आहे. याचा (अंध) स्पर्श व श्राव्य अध्ययन शैलीने शिकणाऱ्या मुलांना या पुस्तकांचा शिक्षण सुरु राहण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्द असून जास्तीत जास्त मुलांना याची मदत घेता येईल.

शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम पूरक शैक्षणिक साहित्य


माय फर्स्ट इंग्लिश मराठी डिक्शनरी , शिक्षणोत्सव उपक्रम पुस्तिका वाचन व कृतींसाठी, गणित स्वाध्याय पुस्तिका इयत्ता पहिली ते आठवी सरावासाठी, इंग्रजी स्वाध्याय पुस्तिका इयत्ता पहिली ते आठवी सरावासाठी,  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिका शै.वर्ष 2020-21 इ. बालभारती च्या वेबसाईट वर शैक्षणिक ई-साहित्य उपलब्द आहे.

किशोर मासिक 


विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी. अभ्यासक्रम व्यतिरिक्त ज्ञान मिळावे उत्तम संस्कार रुजावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेले किशोर मासिक मुलांना PDF स्वरुपात उपलब्द आहे.

जिओ टीव्ही (Jio TV) 

जिओ टीव्ही या app मध्ये 12 शैक्षणिक channel च्या माध्यमातून इयत्ता 3 री ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमासाठी तज्ञ शिक्षकांच्या तासिकांचे प्रेक्षपण उपलब्ध आहे. जिओ टीव्ही या app मधील category मध्ये जाऊEducation  हा पर्याय निवडल्यानंतर ज्ञानगंगा या नावाने मध्यामनिहाय व इयत्तानिहाय पूर्णवेळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.


SCERT स्वाध्याय 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण  परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य आयोजित  Whats App च्या माध्यमातून इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना SCERT स्वाध्याय उपक्रमाअंतर्गत विषयांच्या प्रश्नांचा सराव करता येतो. 

विशेष म्हणजे लगेचच आपले उत्तर पडताळून पाहता येतात. एखादे प्रश्न चुकले असल्यास त्यासंबंधित संकल्पना संबोध स्पष्टीकरण करण्यास मदत व्हावी यासाठी व्हिडिओ लिंक पाठवली जाते. विद्यार्थी दिक्षा app मधून व्हिडिओ पाहून शिकू शकतात. 



शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचा मागील वर्षाचा अध्ययन ऱ्हास (लर्निंग लॉस) भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) सुरु केला आहे. यापुढील काळात SCERT स्वाध्याय च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सराव करता  येणार आहे.  


महाकरियर पोर्टल 

महा करिअर पोर्टलवरून इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आवश्यक त्या क्षेत्रातील करियर विषयक माहिती उपलब्ध आहे. 

त्यामध्ये आवश्यक पूर्वतयारी , कॉलेज, शिष्यवृत्ती , अभ्यासक्रम , भविष्यातील संधी विशेष म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील कोर्स करण्यास सक्षम आहे किंवा नाही त्यासंबंधीची माहिती देखील करियर पोर्टल वर उपलब्ध आहे. 
महाकरियर पोर्टल वर करियर विषयक माहिती कशी शोधायची याबाबत यापूर्वी च्या लेखामध्ये आपण माहिती पाहिली आहे. आपण अवश्य हा लेख वाचवा. व विद्यार्थ्यांचे योग्य करियर निवडण्यास याची मदत होणार आहे. 


शैक्षणिक संकेतस्थळ / Educational YouTube Channel


२१ व्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक संकेतस्थळाचा देखील ऑनलाईन शिक्षणासाठी फायदा होत आहे. त्यामध्ये विशेषतः शासकीय अधिकृत शैक्षणिक वेबसाईट वर शिक्षणासंबंधी चे अपडेट सर्वच घटकातील मुलांच्या (दिव्यांग) पालक , विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन वेबिनार आयोजन करण्यात येत आहे. याचा अधिकाधिक पालक, विद्यार्थी, शिक्षक यांनी जास्तीत जास्त लाभ घेणे आवश्यक आहे. यामध्ये खालील वेबसाईट / युट्युब channel अवश्य follow करा.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,पुणे महाराष्ट्र (SCERT PUNE)


YouTube Channel - SCERT YouTube Channel


बालभारती Balbharati



Previous Post Next Post