दिव्यांगांच्या शिक्षणासाठी सेतू अभ्यासक्रमाचे अनुकूलन | Adaptation of Setu syllabus for cwsn

कोव्हीड 19 च्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी पासून शाळा बंद आहेत, मात्र मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन/ऑफलाईन माध्यमातून Learning From Home , शाळा बंद पण ,शिक्षण आहे. शाळा बंद परंतु, शिक्षण सुरू , SCERT स्वाध्याय, SCERT अभ्यासमाला, DD सह्याद्री वरील टिलिमिली मालिका असेल किंवा सध्या सुरू असलेला ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम , Youtube चॅनेल वर शैक्षणिक ऑनलाईन तासिका आदि विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

SCERT SWADHYAY 2021

शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या सुरुवातीला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे , SCERT Pune आयोजित विद्यार्थ्यांचा मागील शैक्षणिक वर्षातील अध्ययन ऱ्हास (Learning Loss) भरून काढण्यासाठी राज्यस्तरवरून  विकसित करण्यात आलेला सेतू अभ्यासक्रम (Bridge course) सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) सुरू करण्यात आला आहे.

setu abhyaskram

सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची विषयनिहाय सद्यस्थिती तपासण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सर्व घटकातील समग्र विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये दिव्यांग मुलांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सची) घोषणा | Bridge Course announcement

आधुनिक शिक्षण प्रणाली ही सर्वसमावेशक या तत्वावर असून समावेशित शिक्षण या संकल्पनेनुसार वर्गातील सर्व घटकातील सर्व मुलांचा शिक्षण प्रक्रियेत सहभाग असून सर्वाना समवयस्क मुलांसोबत भेदभाव विरहित शिक्षण घेण्याचा हक्क आहे. 

मावेशक शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे असे शिक्षण जेथे सर्व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत समान सहभाग घेतील हा हक्क भारतीय राज्यघटनेने नमूद केला आहे. {alertInfo}

 कोरोनाच्या दरम्यान शाळा बंद आहे. लर्निंग फ्रॉम होम च्या माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरु आहे. प्रत्येक मुल वेगळे आहे. त्यात मुलांच्या गरजा व क्षमता देखील वेगळ्या आहेत. मात्र प्रत्येक मुल निहाय वेगळा विचार करून अध्ययन- अनुभव देणे हे शिक्षण यंत्रणेसमोर आव्हानात्मक आहे. मागील वर्षाचा शैक्षणिक ऱ्हास भरून काढण्यासाठी इयत्ता व विषयनिहाय समग्र असा सेतू अभ्यासक्रम (Bridge course) तयार करण्यात आला असून तो राबविण्यात येत आहे. सेतू अभ्यासक्रम हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यकता व गरजेनुसार अनुकूलन Adaptation स्वरुपात दिव्यांग मुलांना देखील सेतू अभ्यासक्रमाचा सराव करून घेण्यास मदत होऊ शकेल.

{tocify} $title={Table of Contents}

दिव्यांगांच्या शिक्षणासाठी सेतू अभ्यासक्रमाचे अनुकूलन | Adaptation of Setu syllabus for cwsn 

अनुकुलन

विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विषय (घटक) समजण्यासाठी आवश्यकता व  गरजेनुसार केलेला बदल म्हणजे अनुकूलन होय. {alertInfo}

अनुकूलन हे विद्यार्थ्यांच्या शिकण्यास सहाय्य ठरते, अनुकूलन हे विद्यार्थ्यांच्या गरज व क्षमता लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. 

समावेशित शिक्षणामध्ये दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी अनुकूलन

> अभ्यासक्रमाच्या विषयातील घटकांचे अनुकूलन

> अध्ययन अनुभवाचे माध्यम अनुकूलन

> अध्ययन-अध्यापन पद्धती अनुकूलन

> शैक्षणिक साधने अनुकूलन 

> परीक्षा पद्धती , मूल्यमापन  अनुकूलन 

> चित्रांचे अनुकूलन

'समावेशित शिक्षण' मध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गातील सर्व घटकातील मुलांच्या आवश्यकता व  गरजेनुसार आवश्यक तेथे बदल करणे आवश्यक आहे. 

विद्यार्थी कसे शिकतील? यासाठी कोणते माध्यम ? शैक्षणिक साहित्य वापरावे लागेल? यासाठी कोणती तंत्र पद्धती वापरावी लागेल? याचा जेव्हा आपण शिक्षक म्हणून विचार करतो. तेव्हा विद्यार्थी दिव्यांग असेल तर मग हाच अध्ययन अनुभव देण्यासाठी काय बदल करावा लागेल? 

म्हणजे दिव्यांग विद्यार्थी पण शिकेल. उदा. अंध मुलांना दिसत नाही तर मग तो ऐकून शिकेल   असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ऑडिओ साधनांचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यासोबत स्पर्श साधने, कर्णबधिर विद्यार्थी असेल तर त्याच्या पाहून शिकण्यावर भर द्यावा लागेल.

बौद्धिक अक्षमता , बहुविकलांग विद्यार्थ्यानसाठी त्यांची गरज व क्षमता लक्षात घेऊन आवश्यक बदल करावा लागेल. म्हणजेच जेव्हा आपण मुलांना शिकण्यासाठीचे माध्यम , पर्याय शोधतो त्यासाठी आवश्यक तेथे बदल करतो. म्हणजेच अनुकूलन करतो. असे म्हणता येईल. 

'जर काही मुले आपण ज्या पद्धतीने शिकवतो, त्यातून शिकत नसतील, तर ती ज्या पद्धतीने शिकू शकतात, तसे आपण त्यांना शिकविले पाहिजे..' - इग्नशिओ एस्ट्राडा {alertSuccess}

दिव्यांगांच्या शिक्षणासाठी सेतू अभ्यासक्रमाला अध्ययन शैलीची जोड

अध्ययन शैली म्हणजे काय तर, विद्यार्थी ज्या माध्यमाद्वारे (दृश्य,श्राव्य,स्पर्श,कृतीतून,बहुअध्ययनशैली) द्वारे ज्ञान ग्रहण करतो. माहिती मिळवतो. म्हणजेच शिकतो. त्या पद्धतीला 'अध्ययन शैली' असे म्हटले जाते.

अवश्य वाचा 

अध्ययन कसे घडते? बालकांची अध्ययन प्रक्रिया learning process

>  अध्ययन शैली म्हणजे काय ? व अध्ययन शैलीचे प्रकार  

अध्ययनार्थी दृष्टीकोन 

प्रत्येक मुल शिकू शकते. ते त्याच्या गतीने शिकते, यासाठी विद्यार्थ्याला सपोर्ट करणे, म्हणजेच गरजेनुसार आवश्यक ते शिकण्याची संधी देऊन योग्य  इनपुट देणे आवश्यक असते. तेव्हा आपणास आऊट पुट आपोआप मिळतात.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी अध्ययनार्थी दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. जसे- श्रवण अध्ययन शैली अध्ययनार्थी , दृष्टी अध्ययन शैली अध्ययनार्थी, स्पर्श अध्ययन शैली अध्ययनार्थी आणि बहु अध्ययन (पंचज्ञानेद्रीये) शैली अध्ययनार्थी दृष्टीकोन.

विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये काही पंचज्ञानेद्रीये अक्षम असतात. अशावेळी उर्वरित ज्ञानेद्रियांमार्फत विद्यार्थी ज्ञान ग्रहण करून शिकत असतात. प्रत्येक मुलांना शिक्षण देणे हे बालकाचा मोफत व सक्तीचे शिक्षण (RTE Act २००९, RPWD Act २०१६)  या कायद्याने प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याचा मुलभूत हक्क मिळाला आहे. 

शालेय शिक्षण संबंधित कोणत्याही उपक्रमामध्ये दिव्यांग मुलांचा समावेश करून त्यांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा शैक्षणिक अध्ययनार्थी दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे.  अनुकूलन करण्यासाठी प्रथमतः अध्ययनार्थी दृष्टीकोन ज्ञात असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक दृष्टीकोन तक्ता

विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग)  विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय दृष्टीकोनाकडुन शैक्षणिक दृष्टीकोन समजून घेण्यासाठी खालील तक्त्याचे अवलोकन करावे.

अ.क्र.
वैद्यकीय दृष्टीकोन
अध्ययनार्थी दृर्ष्टीकोन
अंध
कर्णबधीर
बोधात्मक अक्षम (मतीमंद), बहुविकलांग, स्वमग्न,
बहुअध्ययन शैली क्रमांक १ जसे- श्रवण, दृष्टी, स्पर्श शैली अध्ययनार्थी पंचज्ञानेद्रीयामार्फत ज्ञान ग्रहण करतात. मात्र यांची शिकण्याची गती ही कमी असते. म्हणून इथे यामुलांसाठी  थोडासा वेगळा विचार करणे गरजेचे आहे. 
अंशत: अंध, अध्ययन अक्षम, वाचादोष, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, इतर उर्वरित सर्व
बहुअध्ययन शैली क्रमांक २ जसे- श्रवण, दृष्टी, स्पर्श शैली अध्ययनार्थी थोडक्यात सांगायचे तर असे सर्व अध्ययनार्थी जे पंचज्ञानेद्रीयामार्फत ज्ञान ग्रहण करतात.

शैक्षणिक दृष्टीकोन विश्लेषण 

१) अंध (श्राव्य व स्पर्श अध्ययन शैली)
अंध विद्यार्थ्यांला दिसत नाही , मात्र कान त्याचे डोळे आहे, म्हणजेच कानाने ऐकून ,स्पर्शाने जाणून घेऊन अंध विद्यार्थी शिकू शकतो. मग अशावेळी अंध मुलांना श्राव्य व स्पर्श साधनांद्वारे अध्ययन अनुभव दयावे लागतील. 

अंध विद्यार्थ्यांनाच्या साठी सेतू अभ्यासक्रमा चे अनुकुलन Adaptation

अध्ययन अनुभवाचे माध्यम - श्राव्य व स्पर्श  साधने 
>  Audio - Whatsapp द्वारे Voice Note , On Call समुपदेशन , Audio Recording Clip
> वाचकनीस सहाय्य (पालक , भावंडं, सवंगडी)
 
अंध विद्यार्थ्यांनाच्या साठी सेतू अभ्यासक्रमा चे अध्ययन अनुभवाचे अनुकुलन करताना विद्यार्थ्यांच्या पालक , भावंडं, सवंगडी यांच्या माध्यमातून किंवा Audio Recording Clip, Whatsapp द्वारे Voice Note, प्रत्यक्ष On Call समुपदेशन करून आजचा अभ्यास काय आहे? हे वाचून दाखवावे लागेल आणि तशी कृती करून घेता येईल
उदा. सेतू अभ्यासक्रम , इयत्ता २ री 

दिवस - सातवा 
अध्ययन क्षेत्र - लिपीचीजाण (परिचय)
कौशल्य / क्षमता - श्रवण, भाषण, वाचन, लेखन
संकल्पना/संबोध - उपस्थितीपत्रक

अध्ययन निष्पत्ती- परिचित आणि अपरिचित मजकुरामध्ये (उदा.स्वतःचे, नाव, इयत्ता, पुस्तकांचे नाव, इ.) रस घेतात, गप्पा गोष्टी करतात. {alertInfo}
जाणून घेऊ या..
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांचे नाव विचारावे व त्याने सांगितलेले नाव त्याच्या समोरच कार्डशीटवर लिहावे.
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे नाव क्रमवार पद्धतीने विचारणे. विद्यार्थ्यांचे विचारलेले नाव त्यांच्यासमोरच
लिहिणे. विद्यार्थ्यांची सर्व नावे कार्डशिटवर लिहून झाल्यावर ते भिंतीवर चिटकवणे. व विद्यार्थ्यांनी दररोज
स्वतःच्या नावासमोर खूण किंवा स्वतःची सही करणे.

अनुकूलन- वरील  कृती करून घेण्यासाठी अंध श्राव्य व स्पर्श शैलीने शिकणाऱ्या मुलांसाठी, नावाच्या कार्डशीट वर विशिष्ट स्पर्शाने जाणीव होईल धान्य चिकटवता येईल. उदा. आकाश या नावाच्या कार्डवर १ तांदूळ , ओमकार नावाच्या कार्डवर २ तांदूळ असे वर्गातील सर्व मुलांच्या नावाच्या कार्ड वर तांदूळ किंवा इतर वस्तू घेऊ शकतो, आणि ते चिकटवून त्याच्या स्पर्शाने नाव ओळखण्यास सांगता येईल.{alertInfo}

किंवा 

अनुकूलन- वर्गातील मुलांच्या हजेरी क्रमांक लक्षात ठेवून नावाची ओळख करून घेता येईल. उदा- १ नंबर आकाश, २ नंबर ओमकार या पद्धतीने कृती करून घेता येईल. यासाठी आपली कल्पकता याठिकाणी आपल्याला वापरता येईल.{alertInfo}

सक्षम बनू या..

वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर स्वतःचे नाव शोधून विद्यार्थी स्वतःची उपस्थिती नोंदवतील. विद्यार्थी टिक मार्क किंवा गिरगिट होणे यासारख्या कृती करतील तर ती त्यांना करू देणे. अशा प्रकारच्या कृतीतून लिहिण्यासाठी काही तरी हेतू असतो, हे मुलांना समजेल. उपस्थितीपत्रक ही कृती रोज करायची सवय हळूहळू मुलांना लावणे. स्वतःचे नाव ओळखता येईल. निरीक्षण शक्ती वाढेल. 

अनुकूलन- कार्डशीट वरील स्पर्शाने विद्यार्थी स्वतःचे नाव शोधेल. सवंगडी यांच्या मदतीने स्वतःची उपस्थिती नोंदवेलकृती करण्यास अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणे. {alertInfo}

चला सराव करूया.. 

नियमितपणे मुले वर्गात लावल्या उपस्थिती पत्रकावर दररोज स्वतःचे नाव शोधण्याचा सराव करतील. विद्यार्थी स्वतःची दैनिक उपस्थिती नोंदवतील.

अनुकूलन- कार्डशीट वरील स्पर्शाने विद्यार्थी स्वतःचे नाव शोधेल. सवंगडी यांच्या मदतीने स्वतःची उपस्थिती नोंदवेल.{alertInfo}

कल्पक होऊया (आव्हाने) 

काही मुले वर्गातील उपस्थिती पत्रकावर लिहिलेल्या आपल्या नावातील अक्षरापासून शब्द सांगतील. 

अनुकूलन- वर्गातील उपस्थिती पत्रकावर लिहिलेल्या आपल्या नावातील अक्षरापासून शब्द सांगेल.{alertInfo} 

कर्णबधीर विद्यार्थ्यांनाच्या साठी सेतू अभ्यासक्रमा चे अनुकुलन Adaptation

२) कर्णबधिर (दृश्य अध्ययन शैली)

कर्णबधिर विद्यार्थ्यांना ऐकायला आणि बोलता येत नसल्यामुळे, डोळे हेच त्यांचे कान आहे. तर मग याठिकाणी कर्णबधिर मुलांना डोळ्याद्वारे अध्ययन अनुभव देण्यावर भर देणे आवश्यक आहे. 

अध्ययन शैली - दृश्यअध्ययन शैली
अध्ययन अनुभवाचे माध्यम - दृक साधने (खुणा , चेहऱ्यावरील हावभाव , चित्र , हातवारे ,लेखन ,व्हिडीओ)
> Videos , Diksha App , सेतू अभ्यासक्रम PDF , सेतू अभ्यासक्रम पुस्तिका , चित्र
> संभाषण सहाय्य - पालक ,भावंडं , सवंगडी ( सुविधा उपलब्ध असल्यास Video Call )
> On Call समुपदेशन - पालक , भावंड व सवंगडी 

कर्णबधिर म्हणजेच दृश्य अध्ययन शैलीने शिकणाऱ्या मुलांना सेतू अभ्यासक्रम देतांना इतर सर्वसामान्य मुलांना ज्या माध्यमातून आपण अभ्यास देत आहोत त्याच पद्धतीने देता येईल.
 
इथे मात्र संभाषण साधण्यात आव्हान आहे. म्हणजे अभ्यास नक्की काय आहे? हे कसे समजावून द्यायचे हे आव्हान आहे.

याठिकाणी पालक ,भावंडं , सवंगडी यांची मदत यासाठी घेता येईल , कर्णबधिर मुलांना ऐकायला येत नसेल मात्र प्रथम पालक , कुटुंबातील भावंडं आणि सवंगडी यांच्या सोबत संभाषण साधण्यात अधिक मदत होईल , दैनंदिन स्थलनिहाय ढोबळ खुणा , चेहऱ्यावरील हावभाव ,चित्र , हातवारे ,लेखन ,व्हिडीओ च्या माध्यमातून कर्णबधिर मुलांना समजावून देता येईल.
 
उदा. सेतू अभ्यासक्रम , इयत्ता २ री 

दिवस - सातवा 
अध्ययन क्षेत्र - लिपीचीजाण (परिचय)
कौशल्य / क्षमता - श्रवण, भाषण, वाचन, लेखन
संकल्पना/संबोध - उपस्थितीपत्रक

अध्ययन निष्पत्ती- परिचित आणि अपरिचित मजकुरामध्ये (उदा.स्वतःचे, नाव, इयत्ता, पुस्तकांचे नाव, इ.) रस घेतात, गप्पा गोष्टी करतात. {alertInfo}
जाणून घेऊ या..
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांचे नाव विचारावे व त्याने सांगितलेले नाव त्याच्या समोरच कार्डशीटवर लिहावे.
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे नाव क्रमवार पद्धतीने विचारणे. विद्यार्थ्यांचे विचारलेले नाव त्यांच्यासमोरच
लिहिणे. विद्यार्थ्यांची सर्व नावे कार्डशिटवर लिहून झाल्यावर ते भिंतीवर चिटकवणे. व विद्यार्थ्यांनी दररोज
स्वतःच्या नावासमोर खूण किंवा स्वतःची सही करणे.

अनुकूलन- शिक्षकांनी (कर्णबधीर) विद्यार्थ्यांस त्यांचे नाव लिहण्यास सांगावे. लिहीलेले नाव त्याच्या समोरच कार्डशीटवर लिहावे. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे नाव क्रमवार पद्धतीने विचारणे. विद्यार्थ्यांचे विचारलेले नाव त्यांच्यासमोरच लिहिणे. विद्यार्थ्यांची सर्व नावे कार्डशिटवर लिहून झाल्यावर ते भिंतीवर चिटकवणे. व विद्यार्थ्यांनी दररोज स्वतःच्या नावासमोर खूण किंवा स्वतःची सही करणे.{alertInfo}

सक्षम बनू या..

वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर स्वतःचे नाव शोधून विद्यार्थी स्वतःची उपस्थिती नोंदवतील. विद्यार्थी टिक मार्क किंवा गिरगिट होणे यासारख्या कृती करतील तर ती त्यांना करू देणे. अशा प्रकारच्या कृतीतून लिहिण्यासाठी काही तरी हेतू असतो, हे मुलांना समजेल. उपस्थितीपत्रक ही कृती रोज करायची सवय हळूहळू मुलांना लावणे. स्वतःचे नाव ओळखता येईल. निरीक्षण शक्ती वाढेल. 

अनुकूलन- वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर स्वतःचे नाव शोधून विद्यार्थी स्वतःची उपस्थिती नोंदवतील. विद्यार्थी टिक मार्क किंवा गिरगिट होणे यासारख्या कृती करतील तर ती त्यांना करू देणे. (कर्णबधीर विद्यार्थ्यांस कृती काय करायची आहे हे समजावून देणे यासाठी एक डेमो करून दाखवणे.) अशा प्रकारच्या कृतीतून लिहिण्यासाठी काही तरी हेतू असतो, हे मुलांना समजेल. उपस्थितीपत्रक ही कृती रोज करायची सवय हळूहळू मुलांना लावणे. स्वतःचे नाव ओळखता येईल. निरीक्षण शक्ती वाढेल. {alertInfo}

चला सराव करूया.. 

नियमितपणे मुले वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर दररोज स्वतःचे नाव शोधण्याचा सराव करतील. विद्यार्थी स्वतःची दैनिक उपस्थिती नोंदवतील.

अनुकूलन- नियमितपणे मुले वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर दररोज स्वतःचे नाव शोधण्याचा सराव करतील. विद्यार्थी स्वतःची दैनिक उपस्थिती नोंदवतील. (कर्णबधीर विद्यार्थ्यांस कृती काय करायची आहे हे समजावून देणे यासाठी एक डेमो करून दाखवणे.) {alertInfo}

कल्पक होऊया (आव्हाने) 

काही मुले वर्गातील उपस्थिती पत्रकावर लिहिलेल्या आपल्या नावातील अक्षरापासून शब्द सांगतील. 

अनुकूलन-कर्णबधीर विद्यार्थ्यांस वर्गातील उपस्थिती पत्रकावर लिहिलेल्या  नावातील अक्षरापासून शब्द तयार करण्यासाठी नावातील अक्षरापासून तयार होणाऱ्या वस्तू किंवा चित्र दाखवून त्याचे नाव लिहण्यास सांगावे.{alertInfo} 

बोधात्मक अक्षम (मतीमंद), बहुविकलांग व स्वमग्न विद्यार्थ्यांनाच्या साठी सेतू अभ्यासक्रमा चे अनुकुलन Adaptation

३) बोधात्मक अक्षम (मतीमंद), बहुविकलांग व स्वमग्न (बहुअध्ययन शैली क्र -१)

दिव्यांग २१ प्रकारातील विचार करता बौद्धिक दृष्ट्या सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत बौद्धिक क्षमता कमी किंवा अधिक (हायपर ऐक्टीव्ह)  असणाऱ्या मध्ये उपरोक्त प्रवर्गाचा समावेश आढळून येतो. मात्र इतर प्रवर्गातील जवळपास सर्व मुलांचा बौद्धिक विकास हा सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने झालेला असतो. अध्ययन अनुभव देण्यासाठी अध्ययन शैली व दृक , श्राव्य , स्पर्श साधनांचा गरजेनुसार साधने उपलब्ध करून द्यावे लागते.

अध्ययन शैली - बहुध्ययन शैली (दृक,श्राव्य,स्पर्श)
अध्ययन अनुभवाचे माध्यम - दृक,श्राव्य साधने 
> Videos , Diksha App , सेतू अभ्यासक्रम PDF , सेतू अभ्यासक्रम पुस्तिका , चित्र , On Call समुपदेशन , Audio Recording Clip
> संभाषण सहाय्य - पालक ,भावंडं , सवंगडी ( सुविधा उपलब्ध असल्यास Video Call )
> On Call समुपदेशन - पालक , भावंड व सवंगडी 

विद्यार्थ्यांच्या गरज व क्षमतेनुसार सेतू अभ्यासक्रम अनुकूलन 

इयत्ता निहाय विचार करता अध्ययनार्थी दृष्टीकोन ठेवून बहुअध्ययन शैलीने शिकणारे (बोधात्मक अक्षम (मतीमंद), बहुविकलांग व स्वमग्न ) या मुलांच्या बाबतीत सर्वप्रथम गरज व क्षमता लक्षात घेऊन उपलब्ध इयत्ता व विषयनिहाय सेतू अभ्यासक्रमामध्ये प्रत्यक्ष अनुकूलन करण्याची इथे आवश्यकता आहे.

सेतू अभ्यासक्रमाचे अनुकूलन करताना विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमाचे स्वरूप तेच ठेऊन विद्यार्थ्याच्या गरजेनुरूप (१६ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसारकाठीण्यपातळी कमी करता येईल.{alertInfo}

 > १६ ऑक्टोबर २०१८ शासन निर्णय

उदा. सेतू अभ्यासक्रम , इयत्ता २ री 

दिवस - सातवा 
अध्ययन क्षेत्र - लिपीचीजाण (परिचय)
कौशल्य / क्षमता - श्रवण, भाषण, वाचन, लेखन
संकल्पना/संबोध - उपस्थितीपत्रक

अध्ययन निष्पत्ती- परिचित आणि अपरिचित मजकुरामध्ये (उदा.स्वतःचे, नाव, इयत्ता, पुस्तकांचे नाव, इ.) रस घेतात, गप्पा गोष्टी करतात. {alertInfo}
जाणून घेऊ या..
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांचे नाव विचारावे व त्याने सांगितलेले नाव त्याच्या समोरच कार्डशीटवर लिहावे.
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे नाव क्रमवार पद्धतीने विचारणे. विद्यार्थ्यांचे विचारलेले नाव त्यांच्यासमोरच
लिहिणे. विद्यार्थ्यांची सर्व नावे कार्डशिटवर लिहून झाल्यावर ते भिंतीवर चिटकवणे. व विद्यार्थ्यांनी दररोज
स्वतःच्या नावासमोर खूण किंवा स्वतःची सही करणे.

अनुकूलन- विद्यार्थ्यांच्या गरजेनुरूप अध्ययन स्तरनिहाय दिलेल्या काठीण्य पातळीमध्ये (१६ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार) बदल करता येईल. विद्यार्थ्यांची सर्व नावे कार्डशिटवर लिहून झाल्यावर ते भिंतीवर चिटकवणे. व विद्यार्थ्यांनी दररोज  स्वतःच्या नावासमोर खूण किंवा स्वतःची सही करणे.  {alertInfo}

सक्षम बनू या..

वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर स्वतःचे नाव शोधून विद्यार्थी स्वतःची उपस्थिती नोंदवतील. विद्यार्थी टिक मार्क किंवा गिरगिट होणे यासारख्या कृती करतील तर ती त्यांना करू देणे. अशा प्रकारच्या कृतीतून लिहिण्यासाठी काही तरी हेतू असतो, हे मुलांना समजेल. उपस्थितीपत्रक ही कृती रोज करायची सवय हळूहळू मुलांना लावणे. स्वतःचे नाव ओळखता येईल. निरीक्षण शक्ती वाढेल. 

अनुकूलन- वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर स्वतःचे नाव शोधण्यास सहाय्य करणे. विद्यार्थी सवंगडी व शिक्षकांच्या मदतीने स्वतःची उपस्थिती नोंदवतील कृती करण्यास अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणे. {alertInfo}

चला सराव करूया.. 

नियमितपणे मुले वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर दररोज स्वतःचे नाव शोधण्याचा सराव करतील. विद्यार्थी स्वतःची दैनिक उपस्थिती नोंदवतील.

अनुकूलन- विद्यार्थ्यांना अधिक सराव करून घेण्यासाठी सवंगडी व शिक्षकांच्या मदतीने सराव करतील , कृती करण्यास अधिकचा वेळ राखून ठेवावा. {alertInfo}

कल्पक होऊया (आव्हाने) 

काही मुले वर्गातील उपस्थिती पत्रकावर लिहिलेल्या आपल्या नावातील अक्षरापासून शब्द सांगतील. 

अनुकूलन-  नावातील अक्षरापासून शब्द तयार करण्यासाठी नावातील अक्षरापासून तयार होणाऱ्या वस्तू किंवा चित्र दाखवून नावातील अक्षरापासून शब्द तयार करण्यासाठी नावातील अक्षरापासून तयार होणाऱ्या वस्तू किंवा चित्र दाखवून नावातील अक्षरातील शब्द लेखन व वाचन करून घेता येईल.{alertInfo} 

अंशत: अंध, अध्ययन अक्षम, वाचादोष, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, दिव्यांग २१ प्रकारातील उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाच्या साठी सेतू अभ्यासक्रमा चे अनुकुलन Adaptation

४) अंशत: अंध, अध्ययन अक्षम, वाचादोष, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, दिव्यांग २१ प्रकारातील उर्वरित सर्व

उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे दिव्यांग २१ प्रकारातील विचार करता बौद्धिक दृष्ट्या सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत बौद्धिक क्षमता कमी किंवा अधिक (हायपर ऐक्टीव्ह)  असणाऱ्या मध्ये बोधात्मक अक्षम (मतीमंद), बहुविकलांग व स्वमग्न  वगळता उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास हा सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने झालेला असतो.
 
अध्ययन शैली - बहुध्ययन शैली (दृक,श्राव्य,स्पर्श)
अध्ययन अनुभवाचे माध्यम - दृक,श्राव्य साधने 
> Videos , Diksha App , सेतू अभ्यासक्रम PDF , सेतू अभ्यासक्रम पुस्तिका , चित्र , On Call समुपदेशन , Audio Recording Clip
> संभाषण सहाय्य - पालक ,भावंडं , सवंगडी ( सुविधा उपलब्ध असल्यास Video Call )
> On Call समुपदेशन - पालक , भावंड व सवंगडी
> सर्वसामान्य मुलांच्या प्रमाणे ऑनलाईन/ऑफलाईन 

या विद्यार्थ्यांसाठी जास्त बदल (अनुकूलन) करण्याची आवश्यकता नाही, मात्र आवश्यकता असेल तर गरजेनुसार अनुकूलन करता येईल , याबाबत पालक,भावंड व सवंगडी यांना समुपदेशन करता येईल.
उदा. लेखन करण्यासंदर्भात सेरेब्रल पाल्सी किंवा आवश्यकता असेल तर अस्थिव्यंग , अध्ययन अक्षम मुलांना लेखन करून घेण्यासाठी  लेखनिक म्हणून भावंडांची मदत घेता येऊ शकेल. त्यासोबतच एखादी कृती करून घेण्यासाठी किंवा दिक्षा app वरील कंटेंट पाहण्यसाठी पालकांची मदत घेता येईल. 

उदा. सेतू अभ्यासक्रम , इयत्ता २ री 

दिवस - सातवा 
अध्ययन क्षेत्र - लिपीचीजाण (परिचय)
कौशल्य / क्षमता - श्रवण, भाषण, वाचन, लेखन
संकल्पना/संबोध - उपस्थितीपत्रक

अध्ययन निष्पत्ती- परिचित आणि अपरिचित मजकुरामध्ये (उदा.स्वतःचे, नाव, इयत्ता, पुस्तकांचे नाव, इ.) रस घेतात, गप्पा गोष्टी करतात. {alertInfo}
जाणून घेऊ या..
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांचे नाव विचारावे व त्याने सांगितलेले नाव त्याच्या समोरच कार्डशीटवर लिहावे.
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे नाव क्रमवार पद्धतीने विचारणे. विद्यार्थ्यांचे विचारलेले नाव त्यांच्यासमोरच
लिहिणे. विद्यार्थ्यांची सर्व नावे कार्डशिटवर लिहून झाल्यावर ते भिंतीवर चिटकवणे. व विद्यार्थ्यांनी दररोज
स्वतःच्या नावासमोर खूण किंवा स्वतःची सही करणे.

अनुकूलन- अंशतः अंध विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी कार्डशीट चिटकवणे , अस्थिव्यंग , सेरेब्रल पाल्सी विद्यार्थ्यांना गरजेनुसार लेखन साहित्य तसेच कृती करण्यास अधिकचा वेळ  उपलब्द करून द्यावा.. {alertInfo}

सक्षम बनू या..

वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर स्वतःचे नाव शोधून विद्यार्थी स्वतःची उपस्थिती नोंदवतील. विद्यार्थी टिक मार्क किंवा गिरगिट होणे यासारख्या कृती करतील तर ती त्यांना करू देणे. अशा प्रकारच्या कृतीतून लिहिण्यासाठी काही तरी हेतू असतो, हे मुलांना समजेल. उपस्थितीपत्रक ही कृती रोज करायची सवय हळूहळू मुलांना लावणे. स्वतःचे नाव ओळखता येईल. निरीक्षण शक्ती वाढेल. 

अनुकूलन- कृती करण्यास अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणे. {alertInfo}

चला सराव करूया.. 

नियमितपणे मुले वर्गात लावलेल्या उपस्थिती पत्रकावर दररोज स्वतःचे नाव शोधण्याचा सराव करतील. विद्यार्थी स्वतःची दैनिक उपस्थिती नोंदवतील.

अनुकूलन- अध्ययन अक्षम व सेरेब्रल पाल्सी मुलांचा अधिक सराव करून , कृती करण्यास अधिकचा वेळ राखून ठेवावा. {alertInfo}

कल्पक होऊया (आव्हाने) 

काही मुले वर्गातील उपस्थिती पत्रकावर लिहिलेल्या आपल्या नावातील अक्षरापासून शब्द सांगतील. 

अनुकूलन- अध्ययन अक्षम मुलांना अक्षर भेद समजावून देण्यासाठी नावातील अक्षरातील शब्द लेखन व वाचन करून घ्यावे.{alertInfo} 

सदरच्या घटक निहाय अध्ययन निष्पत्ती सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने आवश्यक त्या थोड्याफार प्रमाणात अनुकूलन करून विद्यार्थ्यांकडून कृती करून घेता येईल. 

सारांश 

विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी सेतू अभ्यासक्रम किंवा इतर अध्ययन स्तर निहाय शैक्षणिक कौशल्य विकसित करण्यासाठी दिव्यांग प्रकारातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैली निहाय समावेशित शिक्षण पद्धती मधील अनुकूलन कसे करता येऊ शकेल, यासाठी शासनाचे १६ ऑक्टोबर २०१८ चा शासन निर्णय चा संदर्भ घेऊन मुलांच्या शिकण्यासाठी आवश्यक तेथे गरजेनुरूप बदल करून अनुकूलन करता येऊ शकेल. यासाठी सध्या सुरु असलेला सेतू अभ्यासक्रमाचे अनुकूलन कसे करता येईल याविषयीची माहिती सदरच्या लेखामध्ये दिली आहे. 'समावेशित शिक्षण' पद्धती मध्ये दिव्यांग मुलांना शिकण्यासाठी आवश्यक तेथे अनुकूलन करणे आवश्यक आहे. प्रत्येक मुल वेगळे आहे. दिव्यांग मुलांच्याच बाबतीत नव्हे तर वर्गातील प्रत्येक मुलांचा विचार करून अध्ययन निष्पती साध्य करण्यासाठी आवश्यक तेथे अनुकूलन करणे आवश्यक आहे.

१६ ऑक्टोबर २०१८ शासन निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांचे कोरोना कालावधीतील शिक्षण | education of divyang students in Corona period

>  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय | Online Education for Divyang students

Previous Post Next Post