इ.१० वी परीक्षा एप्रिल-मे २०२१ परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना SSC Board exam 2021

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) ssc board exam 2021 परीक्षा एप्रिल-मे २०२१ 


ssc exam 2021

बालदिवस सप्ताह निकाल

कोरोना संकट मराठी निबंध


एप्रिल-मे २०२१ मध्ये MAHA board SSC महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नक
विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक
शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत
संकेतस्थळावर दिनांक २६/०२/२०२१ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली होती,
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
लेखी परीक्षेतील पेपरची वेळ या परीक्षेसाठी ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे व
४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने एप्रिल-मे २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेच्या वेळापत्रकात बेळेमध्ये बदल करून सुधारित अंतिम वेळापत्रके
मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक २१/०३/२०२१
पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
उपरोक्त लेखी, प्रात्यक्षिक व तत्सम परीक्षांना प्रविष्ठ होणा-या परीक्षाथ्यांसाठी
कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना मंडळामार्फत निश्चित
करण्यात आलेल्या असून सदर सूचना मंडळाच्या उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
येत आहे. परीक्षायांनी या विशेष मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत आवाहन
करण्यात येत आहे.

परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प, इ:

१. अ) कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १० वीची विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा
मंडळाच्या प्रचलित पध्दतीने घेतली जाणार नाही. त्याऐवजी प्रात्यक्षिकांवर आधारित विशिष्ट
लेखनकार्य (Assignments), प्रकल्प, प्रात्यक्षिक वही व गृहपाठ यांचा समावेश असेल. सदरचे
प्रात्यक्षिकांवर आधारित कार्य लेखी परीक्षेनंतर दिनांक २१/०५/२०२१ ते दिनांक १०/०६/२०२१
या कालावधीत सादर करण्यात यावे.
प्रात्यक्षिक वही जमा करण्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यास कोविड-१९ विषाणूची लागण
झाली असल्यास अथवा त्रास होत असल्यास प्रात्यक्षिक वही जमा करण्यास आणखी १५
दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात येईल.
ब) श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक
शाळांना देण्यात येत आहे.
क) यासाठी अंतर्गत व बहिस्थ परीक्षक संबंधित माध्यमिक शाळांतूनच देण्यात येतील.
२.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण/शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाच्या लेखी व
प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक २१/०५/२०२१ ते दिनांक ०१/०६/२०२१ या कालावधीत आयोजित
करण्यात आलेल्या आहेत. कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा
देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी दिनांक १०/०६/२०२१ पर्यंत वाढविण्यात येईल.
दिव्यांगासाठी प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी प्रात्याक्षिकांवर आधारित विशेष लेखन कार्याद्वारे मूल्यमापन
करण्यात येईल. याबाबत संबंधित शाळेला स्वातंत्र्य देण्यात येत आहे.
३. शाळेत येणाऱ्या सर्व घटकांनी कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या व आरोग्य
विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.
४. उपरोक्त कालावधीत शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली
आहे. तथापि, अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी शाळेत येताना स्वतःची पाण्याची बाटली व
सॅनिटायझर छोटी बाटली सोबत ठेवावी. तसेच स्वतःचा मास्क व लेखन साहित्य (उदा-पेन,
पेन्सिल, कंपास इ.) सुद्धा स्वतःसोबत आणणे व वापर करणे आवश्यक राहील.
५. कोविड -१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण-तणाव कमी करण्याच्या अनुषंगाने
विद्यार्थी/पालक यांना वारंवार येणाऱ्या शंकाची (FAQ) उत्तरे सज्यमंडळाच्या संकेतस्थळावर
प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
६. प्रात्यक्षिक वही शाळेमध्ये जमा करताना विद्यार्थ्यांनी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आरोग्यविषयक सर्व
सूचनांचे पालन करावे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्याचे तापमान घेण्यात येईल तसेच त्यांना
टप्प्याटप्प्याने (बॅचेस पध्दतीने) प्रवेश देण्यात येईल. शाळेमध्ये प्रवेश करताना व शाळेतील संपूर्ण
कालावधीत मास्क वापरणे अनिवार्य राहील.
७. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व
शारिरीक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. प्रात्यक्षिक वही जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी
त्वरित शाळेचे आवार सोडावे.
लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना ssc board exam 2021

१. लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शाळेतच घेण्यात येईल. अपवादात्मक परिस्थितीत एकापेक्षा
अधिक शाळा एकत्र करून परीक्षा घेण्यात येईल. एखादा विद्यार्थी आरोग्यविषयक कारणामुळे
परीक्षेस गैरहजर राहिल्यास गैरहजर विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक, विषय व अन्य माहिती त्याच दिवशी
विभागीय मंडळाकडे नोंदवली जाणार आहे. अशा गैरहजर विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा जून
महिन्यामध्ये (ऑफलाईन) आयोजित करण्यात येईल.
२. एप्रिल-मे २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी)
परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक २९/०४/२०२१ ते दिनांक २०/०५/२०२१ या कालावधीत
प्रचलित पध्द्तीने (ऑफलाईन) आयोजित करण्यात येत आहेत.
३. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या
प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशीराने सुरू झालेल्या आहे. तद्नंतर काही ठिकाणी त्या वेळोवेळी बंद
ठेवाव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव पुरेसा होऊ न शकल्यामूळे लेखी परीक्षेतील
पेपरचा वेळ या परीक्षेला ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे व ४० ते ६० गुणांच्या
पेपरसाठी १५ मिनिटे वाढविण्यात येत असून त्यानुसार सुधारित अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात
आले आहे.
४. विशेष परीक्षा ही मूळ परीक्षेचाच भाग राहील. विशेष परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार
नाही. तसेच सदर परीक्षेचे वेळापत्रक मंडळामार्फत अलहिदा जाहीर करण्यात येईल आणि परीक्षेच्या
वेळापत्रकात दोन विषयांमध्ये सार्वजनिक सुट्टी वगळता खांड ठेवण्यात येणार नाही.
५. या विशेष परीक्षा मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी निश्चित
केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील. सदर परीक्षा केंद्रे ही शहरी भागात ठराविक ठिकाणी व
ग्रामीण भागात प्रामुख्याने तालुक्याच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या
विशेष परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंडळाने निर्धारित केलेल्या या परीक्षा केंद्रावर जाऊनच परीक्षा दयावी
लागेल.
६. अ. लेखी परीक्षेमध्ये प्रथमच प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ टक्के कपात केलेल्या
अभ्यासक्रमानुसार परीक्षा दयावी लागणार आहे. उदा. नियमित (Regular) विद्यार्थी, तुरळक
(Isolated) विषय घेऊन प्रविष्ठ होणारे विद्यार्थी, प्रथमच प्रविष्ठ होणारे खाजगी विद्यार्थी,
आय.टी.आय. चे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे) Transfer of Credit साठी काही विषयांना
प्रविष्ठ होणारे विद्यार्थी.
ब. लेखी परीक्षेस प्रविष्ठ होणारे पुनर्परीक्षार्थी, (Repeater) श्रेणीसुधार (Class Improvement
Scheme) म्हणून प्रविष्ठ होणारे विद्यार्थी यांना १०० टक्के अभ्यासक्रमानुसार परीक्षा दयावी
लागेल.
७. या जादा वेळेव्यतिरिक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जादा वेळेसह इतर सर्व सुविधा व
सवलती कायम राहतील.
(उदा. तीन तासाच्या पेपरसाठी या परीक्षेला ३ तास ३० मिनीटे देण्यात आलेली आहे. या
वेळव्यतिरिक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सदर तीन तासाच्या पेपरसाठी ६० मिनीटे प्रचलित जादा
वेळेची सवलत देय राहील.)
८. परीक्षा संचालनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक (केंद्रसंचालक/ उपकेंद्रसंचालक)
यांची राहील.
९. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या सर्व घटकांनी कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या व
आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.
१०. इ.१०वी परीक्षा सकाळ सत्रात १०.३० वाजता व दुपार सत्रात ३.०० वाजता आयोजित करण्यात
आलेली आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी Thermal Screening साठी परीक्षेच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी
किमान एक ते दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा केंद्राच्या मुख्यप्रवेशद्वारावर
विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्रथम परीक्षार्थ्यांसह सर्व घटकांचे Thermal Screening द्वारे तापमान
मोजण्यात येईल.
११. विद्यार्थ्याचे तापमान तपासल्यानंतर प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी किमान ३० मिनिटे अगोदर आपल्या
निर्धारित परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न होईल असे पहावे. प्रत्यक्ष लेखी
परीक्षा सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येईल.
१२. परीक्षा केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची व सॅनिटायझारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तथापि,
अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात येताना स्वतःची पाण्याची बाटली व
सॅनिटायझर छोटी बाटली सोबत ठेवावी. तसेच स्वतःचा मास्क व लेखन साहित्य (उदा-पेन,
पेन्सिल, कंपास इ.) सुध्दा स्वतःसोबत आणणे आवश्यक राहील. परीक्षार्थी/विद्यार्थ्याने एकमेकांचे
पेन, पेन्सिल वापरु नये.
१३. परीक्षेदरम्यान एखादया परीक्षार्थ्यास कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने त्रास झाल्यास व त्याची
परीक्षा देण्याची इच्छा असल्यास परीक्षार्थ्यांच्या संमतीने त्याची परीक्षा केंद्रात स्वंतत्र कक्षात बैठक
व्यवस्था करण्यात येईल.
१४.कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राजवळील सरकारी
आरोग्य केंद्रामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला विनंती
करण्यात येईल.
१५. परीक्षेदरम्यान दोन विद्यार्थ्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात येईल. शारिरीक अंतर
राखले जाईल याची दक्षता घ्यावी.
१६. कोविड -१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण-तणाव कमी करण्याच्या
अनुषंगाने विद्यार्थी व पालक यांना वारंवार येणाऱ्या शंकाची (FAQ) उत्तरे राज्यमंडळाच्या
संकेतस्थळावर प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
१७. प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षा केंद्र/उपकेंद्रात प्रवेश करतांना व पेपर संपल्यावर बाहेर जातांना
विद्यार्थ्यांनी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आरोग्यविषयक सर्व सूचनांचे पालन करावे.

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी)

Previous Post Next Post