गुगल मीट मोबाईल मध्ये कसे वापरावे? How to use google meet on phone

सध्या ऑनलाईन शिक्षण हा पर्याय म्हणून स्वीकारणे सर्वांना आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण सध्या काहीजणांना पूरक वाटत जरी नसेल मात्र या परिस्थितीत पर्याय म्हणून आज प्रत्येक जण ऑनलाईन शिक्षणाकडे बघत आहे.

कोरोना च्या महामारी कालावधीत वर्षभरापासून लॉक डाऊन असल्यामुळे शाळा, कॉलेज बंद , शासकीय ,खाजगी कार्यालय काही प्रमाणात सुरू आहे. अशा वेळी संपर्काचे माध्यम म्हणून ऑनलाईन मिटिंग , वेबिनार ,कार्यशाळा ,उदघाटन ,उद्बोधन मार्गदर्शन व्याख्याने  घेण्यासाठी वर्षभरात Zoom , Google Meet या video communication , video conferencing द्वारे व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधत आहे.
How to use google meet on phoneमागील ब्लॉग मध्ये आपण How to use zoom for online classes बद्दल माहिती घेतली. आजच्या ब्लॉग मध्ये आपण Googl meet काय आहे? Googl meet चा वापर कसा करावा? How to use Google meet on phone , गुगल मीट वर sign up कसे करायचे? मिटिंग ,ऑनलाईन क्लास शेड्युल कसा करायचा? Google meet चे खास वैशिष्ट्य कोणती आहेत? याबाबत माहिती बघणार आहोत.

{tocify} $title={अनुक्रमणिका}

गुगल मीट काय आहे? What is Google meet ?


Google meet हे Google ने विकसित केलेले Google meet video conferencing सेवा आहे. ज्याद्वारे आपण व्हर्च्युअल पध्दतीने online classes , meetings , group online discussion , webinar इ. कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतो.

गुगल मीट मध्ये रजिस्टर कसे करायचे? How to sign up on Google meet


Google meet Register करण्यासाठी ज्यांच्याकडे Google account आहेत ते सर्व जण गुगल मीट वापरू शकते. जवळपास ज्यांच्याकडे Android किंवा इतर स्मार्टफोन आहेत त्यांच्या सर्वांकडे google account असते. त्यामध्ये आपण youtube , google photos , Gmail वापरत असतो. 

मग Google Meet मोबाईल मध्ये वापरण्यासाठी आपल्याला आपले Google account sign in करावे लागेल. उदा. आपला Gmail id & password टाकून गुगल सोबत sign in करा. यामध्ये आपण Gmail app Or Google meet app च्या  माध्यमातून Google meet वापरू शकता. यासाठी आपण Play store मधून Google Meet app Download करून घ्या. किंवा मोबाईल मध्ये Gmail Default app असते. त्या माध्यमातून sign in करा.

आपण जर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वर sign in करू इच्छित असाल तर कोणताही वेब ब्राउझर उघडा आणि त्यामधून गुगल sign in करा. उदा. chrome browser


गुगल मीटचे खास वैशिष्ट्य ? Feature of Google Meet?


 • Google account असणारे कोणीही google meet मध्ये किमान १०० जण ऑनलाइन मीटिंग मध्ये सहभागी होता येते.

 • व्यवसाय, शाळा आणि इतर संस्था जास्तीत जास्त २५० पर्यंत अंतर्गत किंवा बाह्य सहभागींसोबत ऑनलाइन मीटिंग आपण करू शकतो.

 • प्रति मिटिंग वेळ 60 मिनिटापर्यंत असते.

 • ऑनलाईन व्हिडिओ मिटिंग दरम्यान live caption सुविधा देखील उपलब्ध आहे. Live caption ही सुविधा फक्त इंग्रजी भाषेसाठी उपलब्ध आहे. जेव्हा Google meet मध्ये english language मध्ये संभाषण सुरू असेल तेव्हा स्क्रीन वर live बोलत असताना text स्वरूपात caption दिसेल , हे विशेषतः Hearing impairment दिव्यांग व्यक्ती साठी खूप उपयोगी असते.

 • गुगल मीट मिटिंग किंवा क्लास मध्ये जॉईन होण्यापूर्वी आपणास आपला कॅमेरा सेट करता येतो. म्हणजे अगोदरच आपला view background कसा दिसतो हे पाहता येते. Mic चेक करून कंट्रोल करता येते.

 • Android , iPad , iphone मोबाईल तसेच desktop , laptop वर देखील google meet वापरता येते.

 • ज्यांनी मिटिंग host केली म्हणजेच सुरूवात केली त्यांना मीटिंग वर सर्व नियंत्रण ठेवता येते. उदा. Mute ,unmute , remove करणे , share स्क्रिन कंट्रोल करता येते.

 • गुगल मीट वर क्लास किंवा मिटिंग सुरू असताना chat करता येते.

मोबाईल मध्ये गुगल मीट कसे वापरायचे ? How to use Google meet on phone


1.Gmail App  च्या माध्यमातून

 • सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोन मधील Gmail app ओपन करा.

 • ज्या gmail id वरून आपणस गुगल मीट वापरायचे आहे. तो gmail id ची खात्री करा. त्यासाठी gmail app मध्ये वरच्या उजव्या कोपऱ्यात आपला प्रोफाईल दिसेल त्याठिकाणी आपण आपला gmail id तपासून घ्या.

 • त्यांनतर gmail app ओपन केल्यानंतर खालच्या उजव्या बाजूला Meet असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लीक करा. 

 • आता याठिकाणी आपणास New meeting आणि join with a code हे दोन ऑप्शन दिसेल. 

 • आपल्याकडे जर गुगल मीट लिंक किंवा कोड असेल तर आपण join with a code या बटणावर क्लीक करून मिटिंग कोड टाकून जॉईन करा.

 • आपणास मिटिंग किंवा क्लास सुरू करायचा असेल तर new meeting या बटणावर ओके करा. Get a meeting link to share येथून आपल्या मिटिंग ची लिंक इतरांना share करा.

 • Start an instant meeting या ऑप्शन चा वापर करून मिटिंग सुरू करा.

 • Google meet वर आपणास मिटिंग schedule करायची असेल तर schedule in Google calendar या ऑप्शन ला ओके करून मिटिंग शेड्युल करा.

गुगल मीट मिटिंग कशी शेड्युल करावी? How to schedule Google meeting ?


 • सर्वप्रथम Gmail app ओपन करा.

 • त्यांनतर खालच्या उजव्या बाजूस Meet या ऑप्शन ला ओके करा.

 • त्यानंतर new meeting या ऑप्शन ला ओके करा.

 • Schedule in Google calendar या ऑप्शन ला क्लीक करा.

 • आता google calendar ओपन होईल. त्याठिकाणी Add title म्हणजे आपल्या मिटिंग किंवा क्लास चा विषय टाका.

 • त्याखाली दिनांक व वेळ सेट करा.

 • Add description लिहून आवश्यक त्या सेटिंग करा. आणि शेवटी वरच्या उजव्या बाजूस Save करा.

2.Google Meet App 

 • Play store मधून Google Meet app download करा.

 • गुगल मीट अँप ओपन केल्यानंतर आपला Gmail id ने sign in करा.

 • Welcome to meet - continue बटणावर क्लीक करा.

 • स्टोरेज ,रेकॉर्डिंग परमिशन allow करा.

 • Gmail app मधून वर ज्या पद्धतीने सांगितलेल्या स्टेप follow करा. (Gmail app आणि Google meet overview same आहे.)

गुगल मीट मिटिंग मध्ये जॉईन कसे व्हावे? How to join google meet meeting ?


आपल्याला मिळालेल्या गुगल मीट लिंक वर क्लीक करून आपण google meet app मध्ये रिडायरेक्ट होते. तेथून आपण video set करा. Mic -mute ,unmute व्यवस्थित चेक करून join व्हा.

किंवा 

Google meet meeting code घेऊन join with a code या ऑप्शन ला क्लीक करून code टाका आणि जॉईन व्हा.उदा. abc-xyds-bcy अशा पध्दतीने कोड असेल.Previous Post Next Post