लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन शिक्षण , मिटिंग ,कार्यशाळा ,वेबिनार घेण्यासाठी झुम कसे वापरावे? How to use zoom for online classes

Zoom काय आहे? याबद्दल आपल्याला नक्कीच या वर्षभरात माहिती झाले असेल, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये ज्याप्रमाणे Whats app आहे त्याप्रमाणे Zoom app देखील बहुतांश जणांच्या मोबाईल मध्ये असेलच. याचे कारण असे की, कोरोना च्या महामारी मुळे गेल्या वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत आहे. सरकारच्या कोव्हीड 19 साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. अशातच सर्व शाळा , कॉलजेस बंद आहेत. मात्र शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शासनामार्फत वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षणावर (online education) भर दिला जात आहे. ऑनलाईन शिक्षण हे पूरक जरी नसले तरीदेखील सध्याच्या परिस्थितीत पर्याय म्हणून आज प्रत्येकाने कमी-अधिक प्रमाणात ऑनलाईन शिक्षणाचा स्वीकार केलेलाच आहे.


How to use zoom for online classes

मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी Zoom Meeting च्या माध्यमातून व्हर्च्युअल पध्दतीने अध्ययन-अध्यापन (Online Classes) Zoom video confersing तसेच Google Meet , Whatsapp Video call , Skype , अशा विविध व्हर्च्युअल व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांनसोबत संवाद साधत आहे. आज प्रत्येक कार्यालयात देखील व्हर्च्युअल पद्धतीने मीटिंग घेण्यात येतात. याने खूप सारे फायदे सर्वच घटकांना मिळत असल्याचे आपण बघत आहोत. प्रत्येक जण घरातूनच आपले काम ऑनलाईन व्हर्च्युअल पध्दतीने करत आहे. व्हर्च्युअल व्हिडिओ कॉन्फरन्स चे विविध पर्याय माध्यम आहेत. त्यातल्या त्यात सर्वांधिक लोकप्रिय असलेलं माध्यम म्हणजे Zoom आणि Google Meet यापैकी आज आपण zoom बद्दल माहिती बघूया. Zoom काय आहे? Zoom कोणासाठी उपयोगी आहे? Zoom app चे महत्वाचे फिचर कोणते आहे? Zoom वापरताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? झूम चा वापर ऑनलाईन शिक्षणामध्ये कसा करता येईल ? यासंबंधी सविस्तर माहिती आजच्या ब्लॉग मध्ये घेणार आहोत.

1. Zoom काय आहे ? What is Zoom ?

झूम (zoom)  हे Zoom Video Communications करण्याचे व्हर्च्युअल पद्धतीने संभाषण साधण्याचे माध्यम आहे. झूम हे teleconferencing, telecommuting, distance education, and social relations. च्या वापरासाठी बनवलेले व्हर्च्युअल माध्यम असून , American communications technology आहे. मुख्यालय San Jose, California येथे आहे. कोव्हीड 19 , कोरोना महामारी मध्ये work from home या संकल्पनेत सर्वप्रथम zoom app , zoom could meeting च्या माध्यमातून वेबिनार , मिटिंग द्वारे व्हर्च्युअल पद्धतीने घरी राहून काम सुरू ठेवण्यास मदत झाली. त्यामध्ये मुलांना देखील शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी Zoom app च्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला असून online classes देखील zoom च्या माध्यमातून घेतले गेले. आणि आतासुद्धा सुरू आहे. त्यामध्ये Google meet , jio meet सारखे पर्याय देखील वापरण्यात आले आहे. 

ज्या पद्धतीने पूर्वी face to face meeting कार्यशाळा , workshop व्हायचे , अगदी त्याचप्रमाणे zoom च्या माध्यमातून Video Communications करण्यात येत आहे. याचा आपण नक्कीच एकदा तरी वापर केला असेल ,किंवा भविष्यात वेगवेगळे वेबिनार , मीटिंग ,class जॉईन करण्यासाठी आपल्याला zoom app चा वापर करता येऊ शकेल. या लॉक डाऊनच्या काळात आपण घरीच सुरक्षित राहून कोरोनावर मात करूया, महत्त्वाच्या मिटिंग ,वेबिनार ,class , video conference यासाठी video Communications चा वापर करूया.

2. झूम चे फायदे ? Zoom  Could meeting benefits

तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळे zoom could meeting चा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण घरीच थांबून मिटिंग ,वेबिनार ,कार्यशाळा ,ऑनलाईन टिचिंग करून व्हर्च्युअल पद्धतीने Communication करू शकतो. त्याबरोबर विशेषतः zoom सर्व्हिस चे काही फायदे खालीलप्रमाणे

  • Zoom Cloud Meetings हे web व Android mobile मध्ये आपणास सहजपणे वापरता येते.
  • Zoom app हे वापरण्यास सहज सोपे आहे.
  • Zoom द्वारे व्हर्च्युअल पद्धतीने मिंटींग , वेबिनार ,क्लास मध्ये सहभाग घेता येतो.
  • कोव्हीड 19 च्या काळात कोरोना वर मात करण्यासाठी घरीच राहून आपले काम zoom द्वारे आपण सहज पद्धतीने करू शकतो.
  • Zoom Basic plan मध्ये बहुतेक कामाचे फिचर उपलब्ध आहेत.
  • ऑनलाईन क्लास घेणे , वेबिनार ,कार्यशाळा , मिटींग्स घेण्यासाठी सोपे आणि जॉईन करण्यास देखील सोपे आहे.
  • बेसिक फ्री प्लान मध्ये आपण एका वेळी 100 जणांना जॉईन करता येते.
  • एक सेशन साठी 40 min वेळ मिळतो. जो ऑनलाईन क्लास साठी ठीक आहे.
  • Zoom online classes मध्ये स्क्रीन शेयर करता येते. Ppt सादरीकरण करता येते.
  • व्हाईट बोर्ड चा वापर करता येतो.
  • Gallery view असल्यामुळे क्लास ,मिटिंग मध्ये सर्वांसोबत स्क्रीन वर पाहता येते.
  • Zoom वरील व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची सुविधा मिळते.

3. झूम कसे कार्य करते? How does zoom work

  • झूम zoom हे Web , ios , Android मोबाईल मध्ये zoom could meeting app च्या माध्यमातून एकतर लॅपटॉप ,कॉम्प्युटर किंवा मोबाईल द्वारे मिटिंग ,क्लास सुरू करून जॉईन करता येतो.
  • Zoom मध्ये मिटिंग किंवा ऑनलाईन क्लास सुरू करणारे म्हणजे admin zoom Host कडे संपूर्ण मिटिंग चे कंट्रोल असते. Zoom meeting schedule केल्यानंतर विद्यार्थ्यांना किंवा इतर सदस्यांना zoom meeting id , password लिंक दिली जाते. आणि त्याद्वारे आपल्याला जॉईन होता येते.
  • Online class Or meeting , webinar सुरू झाल्यानंतर आपणाला मोबाईल view मध्ये डाव्या बाजूला mic आणि त्याबाजूला व्हिडीओ चे कंट्रोल असते. आपणाला जेव्हा बोलायचे असेल , प्रतिक्रिया द्यायचे असेल तेव्हा mic mute & unmute करता येते. व्हिडीओ देखील आपण सुरू करू शकतो. Video background , chat ,hand raise , whiteboard यांसारखे फिचर आपल्याला zoom मध्ये बघायला मिळतात. Zoom च्या माध्यमातून virtual communication चालते अशा पद्धतीने zoom चे कार्य चालते.

4. ऑनलाईन क्लास साठी झूम कसे वापरावे ? How to use zoom app for online classes


ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये व्हर्चुअल क्लासरूम हा एक पर्याय आहे. कोरोना महामारी मुळे वर्षभरापासून शाळा ,कॉलेज बंद आहे. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी zoom app चा वापर ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापनासाठी उपयोगी आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती मध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना zoom app च्या माध्यमातून video communication द्वारे टिचिंग करण्यास उपयोगी असा पर्याय आहे. यामध्ये ऑनलाईन तासिका मध्ये विद्यार्थी आपल्या शंकाचे निरासरण करून घेऊ शकतात. एकमेकांचे सादरीकरण ppt ,फोटो सर्वांसोबत शेयर करण्याची सोय झूम app मध्ये आहे. विद्यार्थी online class मध्ये white board वापरून अध्ययन करता येते.
शिक्षक जो घटक शिकवणार आहे त्याची पूर्वतयारी साठी आवश्यक power point presentation , video , audio , images तयार करून ठेवावे लागतात. त्याद्वारे zoom app च्या माध्यमातून व्हर्च्युअल मार्गदर्शन करण्यास मदत होते.
विद्यार्थ्यांना आपला होमवर्क , कृती सादर करण्यासाठी images ,photo , ppt , videos शेयर करू शकतात. प्रत्यक्ष बोलून शंका समाधान करू घेऊ शकतात.

Zoom Online classes 


  • सर्वप्रथम आपले zoom.us या अधिकृत वेबसाईटवर जाऊन zoom सोबत sign up म्हणजेच रजिस्टर करून घ्या. यासाठी आपण Google account किंवा मोबाईल नंबर देऊन देखील रजिस्टर करू शकता. त्यानंतर आपला एक पासवर्ड तयार करा zoom.us  sign up केल्यानंतर zoom sign in म्हणजेच लॉगिन करा. 
  • आता आपण online class घेण्यासाठी तयार आहात. ज्या दिवशी आपण ऑनलाईन स्वरूपात मुलांसोबत संवाद साधणार आहात. त्यासाठी zoom meeting schedule करा. 
  • Zoom app download करण्यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधील play store मध्ये zoom could meeting असे सर्च करून zoom app download करा.
  • How to schedule Zoom meeting?

झूम मिटिंग शेड्युल कशी करावी.? How to schedule zoom meeting on mobile?

  •  सर्वप्रथम zoom app ओपन करा.
  • आता आपल्या समोर join a meeting च्या खाली sign up आणि sign in दिसेल. याठिकाणी आपण जर zoom मध्ये रजिस्टर केले नसेल तर sign up करा. Sign up केले असल्यास sign in करा.
  • Sign in ला ओके केल्यानंतर Email address & password टाकून sign in करा.
  • Zoom Sign in केल्यानंतर मोबाईल view मध्ये वरच्या बाजूला new meeting , join , shedule आणि share screen असे ऑप्शन दिसेल , याठिकाणी आपणास मिटिंग शेड्युल करण्यासाठी schedule या ऑप्शन ला क्लीक करायचे आहे.
  • त्यानंतर आपल्या मिटिंग चा विषय उदा. इयत्ता 5 वी इंग्लिश ऑनलाईन क्लास. दिनांक , वेळ देऊन आवश्यक त्या सेटिंग्ज आपल्याला याठिकाणी करता येईल. शेवटी वरच्या उजव्या बाजूला done या बटनावर क्लीक करा. आता आपली मिटिंग किंवा क्लास शेड्युल झाला आहे.
  • पुन्हा मेन डॅशबोर्ड वर आल्यानंतर खालच्या बाजूला meetings असे ऑप्शन आहे. त्यावर क्लीक करा आपण शेड्युल केलेली मिटिंग आपणास दिसेल. 
  • शेड्युल केलेली मीटिंग इतरांना send invitation पाठवा.
  • आपण दिलेल्या वेळेला मिटिंग , क्लास सुरू करण्यासाठी आपण दिलेल्या वेळेपूर्वी किमान 15 मिनिटे आधी आपण sign in करून मीटिंग स्टार्ट करून ठेवा. 
  • क्लास स्टार्ट केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड मध्ये बदल दिसेल म्हणजे त्यामध्ये डाव्या बाजूला mic mute ,unmute , व्हिडिओ , share screen , participants & more असे ऑप्शन दिसेल याचा आपण क्लास कंट्रोल करण्यासाठी हे ऑप्शन कसे कार्य करते. ते आपणास शिकायला मिळेल. उदा. Participants मध्ये कितीजण जॉईन झालेत याची माहिती मिळेल. Share screen मधून आपण ppt ,video ,फोटो शेयर करू शकाल.

अशा पद्धतीने आपण मुलांना जॉईन झाल्यानंतर सूचना देऊन आपल्या नियोजनाप्रमाणे zoom app for online class घेऊ शकता. आणि या लॉक डाऊन मध्ये मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकेल.

झूम सर्व्हिस फ्री प्लान आणि प्रो प्लान ? zoom plans & pricing 

Zoom Basic Plan 


  • Zoom Basic plan हा पूर्णपणे फ्री आहे. बेसिक फ्री प्लान मध्ये 
  • एका मिटिंग/क्लास साठी 100 participants जॉईन होऊ शकतात. (Host up to 100 participants)
  • ग्रुप मिटिंग / क्लास 40 मिनिटापर्यंत सलग चालेल. (Group meetings for up to 40 minutes) जे की मुलांच्या साठी पुरेसे आहे. म्हणजे स्क्रीन ची वेळ 40 मिनिटे , काही वेळ ब्रेक देऊन किंवा लगेचच पुन्हा मीटिंग आपण स्टार्ट करू शकतो. 40 मिनिटाच्या सेशन नंतर पुन्हा स्टार्ट करावी लागेल.
  • मुलांच्या सोबत आपण zoom च्या बेसिक फ्री प्लान मध्ये ऑनलाईन क्लास घेऊ शकतो. त्यामध्ये वरील सर्व सेवा आपल्याला zoom मोफत देते. यामध्ये online classes व्यतिरिक्त आपण वेबिनार ,कार्यशाळा , मिटिंग देखील घेऊ शकतो.
  • Zoom Pro Plan मध्ये आपणास काही Advance पर्याय उपलब्ध आहे.

Zoom Pro Plan 

  • Zoom Basic Free plan मधील वरील सर्व फिचर प्रो प्लान मध्ये आहेत.
  • 40 मिनिटे ऐवजी आपण 30 तासांपर्यंत मिटिंग सलग घेऊ शकतो. वेळेची कोणतीही मर्यादा नाही.
  • Social Media Streaming करता येते. म्हणजे Facebook , Youtube channel वर आपण एकाचवेळी zoom class किंवा मीटिंग फेसबुक , युट्युब वर देखील live करू शकतो. 
  • 1 GB Cloud Recording करता येते. 
हे वरील advance फिचर Zoom Pro Plan मध्ये मिळतात. याव्यतिरिक्त Zoom चे BUSINESS , ENTERPRISE , Large Meeting साठी चे वेगवेगळे plan आहेत याची माहिती आपण zoom.us या अधिकृत वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता.
Previous Post Next Post