अशी मिळणार इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती (पुढील वर्गात प्रवेश) CCE, RTE Act 2009

कोव्हीड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता , चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्याबाबत शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट भयानक रूप धारण करत आहे. सध्या राज्यात लॉक डाऊन सुरु आहे. 
CCE Vargonnti


10 वी 12 वी बोर्ड परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्वांचे आरोग्य उत्तम राखणे हे प्राथमिक गरज लक्षात घेऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी RTE Act 2009 नुसार वर्गोन्नतीCCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन संबंधी राज्यात आकारिक व संकलित मूल्यमापन दरवर्षी करण्यात येते. मात्र चालू वर्षात मध्यंतरी इयत्ता 5 वी व 8 वी चे वर्ग सुरू करण्यात आले होते. इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग पूर्णपणे बंदच आहे. अशा वेळी वर्गोन्नती देताना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याविषयीची माहिती घेऊया.

अशी मिळणार इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती (पुढील वर्गात प्रवेश) CCE, RTE Act 2009


कोविड 19 च्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इ. 1 ली ते 4 थी च्या शाळा सुरुच झाल्या नाहीत. व इयत्ता 5 वी व 8 वीच्या वर्गात 100% वर्गाध्यापन करणे शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासन, शाळा स्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप देखील ते सुरू आहेत.
SCERT Pune राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने दिक्षा ॲप (DIKSHA) आधारित “शाळा बंद..पण शिक्षण आहे
SCERT SWADHYAY , त्याच बरोबर शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचसोबत गली गली सिम सिम, टिलीमिली, ज्ञानगंगा अशा शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण दूरदर्शनच्या डी.डी सह्याद्री मराठी वाहिनीवरून सुरू आहे.

तसेच इयत्ता निहाय SCERT Youtube Channel Jio टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहेच. राज्यातील शिक्षकांनी या परिस्थितीत देखील ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात तसेच वाड्या वस्त्यांवर,
तांड्यांवर प्रत्यक्ष जाऊन विविध उपक्रमांद्वारे शिक्षण सुरू ठेवले आहे. 

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शिक्षकांनी इ.1 ली ते 4 थी च्या वर्गांना प्रत्यक्ष वर्गात  अध्यापन केलेले नसले तरी इतर साधने व तंत्राचा अध्यापनाकरिता निश्चित उपयोग केलेला दिसून येत आहे.  याचसोबत इ.5 वी ते 8 वी च्या शाळा राज्यात सुरु केल्या गेल्या आहेत. बहुतांश शाळांमध्ये इ. 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन केले गेले आहे व काही शाळांमध्ये संकलित मूल्यमापन देखील केले गेले आहे.

उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाच्या 6 एप्रिल 2021 च्या परिपत्रकानुसार शासनाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील इ.1 ली ते
8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ कलम १६ अन्वये वर्गोन्नती देण्यास मान्यता दिली आहे.

इयत्ता 1ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती बाबत मार्गदर्शक सूचना


1. आकारिक , संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत?

शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासन निर्णय 20 ऑगस्ट 2010 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपध्दती (CCE) मध्ये नमूद नियमित कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.

दरवर्षी प्रमाणे आकारिक व संकलित मूल्यमापन प्रक्रिया नुसार पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्यात यावी. शासन निर्णय सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) GR येथून डाउनलोड करा.

2. आकारिक मूल्यमापन पूर्ण केले आहे. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत?

शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये शिक्षकांनी विविध साधन तंत्रांचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार
विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करण्यात यावी.


3. विद्यार्थ्यांचे आकारिक , संकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत ?

शैक्षणिक सत्र २०२० - २०२१ मध्ये कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक, संकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाचे पत्र दिनांक 6 एप्रिल 2021 नुसार शासनाने सूचित
केल्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात यावे. 

अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर “आर.टी.ई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत” असा शेरा नमूद करण्यात यावा. याव्यतिरिक्त इतर कोणताही शेरा नमूद करण्यात येऊ नये.

4. आकारिक व संकलित मूल्यमापन पूर्ण झालेले आहे. आणि काही विद्यार्थ्यांचे फक्त आकारिक मूल्यमापन झाले आहे. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत ?

उपरोक्त मुद्दा १ व २ मधील क-२ पेक्षा कमी श्रेणी मिळालेले विद्यार्थी व मुद्दा ३ मधील सर्व विद्यार्थी तसेच  बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम चार प्रमाणे वयानुरूप दाखल होणारे विद्यार्थी यांच्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. 

यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य (SCERT Pune) मार्फत विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी. तसेच नियमित वर्गाअध्यापनाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात यावी.
यासाठी SCERT Pune यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लीक करा.

इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देताना आवश्यक संदर्भ डाउनलोड करा.


1. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (SCERT Pune) परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
3. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शासन निर्णय (CCE GR) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
4.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.

महत्वाच्या मार्गदर्शक सूचना


1. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करताना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे नव्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे ऑनलाईन/ऑफलाईन प्रकारे मूल्यमापन करण्यात येऊ नये.

2. उपरोक्त सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक, संचयी नोंद पत्रक इ. अभिलेखे नियमित वेळेत पूर्ण करण्यात यावेत. व स्थानिक परिस्थितीनुरूप वितरीत करण्यात यावेत.

3. यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरून मूल्यमापना बाबत इतर कोणत्याही सूचना शाळांना देण्यात येऊ नयेत.

4. सदर सूचना राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहतील.

5. कोविड- १९ च्या संदर्भात स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे.

सारांश
इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देताना शालेय शिक्षण विभाग शासनाचे 6 एप्रिल 2021 चे परिपत्रकानुसार अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये CCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन  शासन निर्णयातील कार्यपद्धती आकारिक व संकलित मूल्यमापन करण्यासंबंधी आपणास विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देताना बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) मधील कलम 16 नुसार 'वर्गोन्नत' असा शेरा नमूद करणे आवश्यक आहे. आणि वयानुरूप दाखल होणारे विद्यार्थी यांच्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीस म्हणजे साधारणपणे जून 2021 मध्ये विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासंबंधी SCERT Pune यांनी विकसित केलेले मित्र पुस्तिकांची मदत यासाठी घेता येईल.

Previous Post Next Post