शाळा सिद्धी स्वयंमुल्यमापन २०२२-२३ - Shaala Siddi School Evaluation 2022-23

शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन 2022-23  चे स्वयंमूल्यमापन मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यमापन व प्रमाणिकरण आणि शाळांची गुणवत्ता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.  NIPA, नवी दिल्लीच्या शाळा अचिव्हमेंट वेब पोर्टलवर स्वयं-मूल्यांकन करून,  त्यानुसार राज्यातील 100% शाळांचे दरवर्षी स्व-मूल्यांकन करावयाचे आहे. 2022-23  साठी स्वयं-मूल्यांकन टॅब शाळा सिद्धी कार्यक्रमासाठी NIPA, नवी दिल्लीच्या www.shalasiddhi.niepa.ac.in पोर्टलवर सुरू करण्यात आला आहे. आज आपण शाळा सिद्धी कार्यक्रम काय आहे? शाळा सिद्धी माहिती , शाळा सिद्धी माहिती पुस्तिका , शाळा सिद्धी माहिती कशी भरावी?, शाळा सिद्धी नविन पासवर्ड कसा तयार करायचा? (shaala siddhi login password), शाळा सिद्धी गुणांकन, शाळा सिद्धी (Shaala Siddhi) श्रेणी, Shaala Siddhi GR, शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापन वेबिनार लिंक संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

शाळा सिद्धी स्वयंमुल्यमापन २०२२-२३ Shaala Siddi School Evaluation 2022-23 

'शालेय मूल्यांकन हे माध्यम आणि शालेय सुधारणा हे लक्ष्य' (School Evaluation' as the means and 'School Improvement' as the goal){alertSuccess}
Shaala Siddi School Evaluation

शाळा सिद्धी स्वयंमुल्यमापन - Shaala Siddi School Evaluation 2022-23 

शाळा सिद्धी माहिती

सर्व बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिणामकारक शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरी यांची वाढती गरज लक्षात घेता, शालेय स्तरावरची शिक्षणाची मानके सुधारण्यासाठी शाळा सिद्धी Shaala Siddhi हा राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

शालेय स्तरावर शिक्षणाची मानके सुधारण्याची नितांत आवश्यकता विचारात घेऊन शालेय सुधारणा करण्याबाबतचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम विकसित केला जावा असा उल्लेख शिक्षण आयोग १९६४-१९६६ मधील शिक्षण आयोगाच्या शिफारशींमध्ये करण्यात आला आहे. जेणेकरुन प्रत्येक शाळेस आपल्या क्षमतेने सर्वोत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल असे यामागील उद्देश होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुकतेच जाहीर झाले. त्यामध्ये समावेशनावर भर देण्यात आला आहे. यानुषंगानें समावेशित शिक्षण म्हणजे काय? जाणून घ्या.{alertInfo}

गुजरात सरकारचा “गुणोत्सव”, ओरिसा सरकारचा “समिक्षा", कर्नाटक सरकारने विकसित केलेल्या “शालेय गुणवत्ता व प्रमाणिकरण (KSQAAC)आराखडा”, महाराष्ट्र राज्याचे “माझी समृध्द शाळा, शाळा ग्रेडेशन” इ. सारख्या प्रचलित शाळा मूल्यांकनांच्या बलस्थानांचा अभ्यास करुन शाळासिध्दी” (Shaala Siddhi) हा राष्ट्रीय कार्यक्रम National Programme on School, Standards& Evaluation (NPSSE) केंद्र शासनाने जाहिर केला आहे.  

शाळा सिद्धी माहिती पुस्तिका Shaala Siddhi Pdf In Marathi 

शाळा मूल्यांकना संदर्भातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधनांचा विचार सदर मानके व मूल्यांकन आराखडा बनविताना करण्यात आलेला आहे. शाळा सिध्दी माहिती पुस्तिकेचा (Shaala Siddhi Pdf In Marathiमराठी अनुवाद महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCERT Pune या संस्थेने केलेला आहे. शाळा सिद्धी माहिती पुस्तिका (Shaala Siddhi Pdf In Marathi PDF) लिंक खाली दिलेली आहे.

शाळा सिद्धी माहिती पुस्तिका (Shaala Siddhi Pdf In Marathi PDF ) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.

शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापन वेबिनार लिंक

राज्यातील सर्व शाळांनी आपले शाळा सिद्धी अंतर्गत शाळांचे 'स्वयंमुल्यांकन व प्रमाणीकरण' करणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे. यासाठी दरवर्षी शाळांचे Shala Siddhi स्वयंमुल्यांकन करणे आवश्यक आहे. 

शैक्षणिक भौतिक व संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने शाळा सिद्धी हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम राज्य शासनाने 'समृद्ध शाळा' या नावाने सुरू केलेला आहे. सन-2020-21 मध्ये नुकताच SCERT Pune आयोजित शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापन वेबिनार घेण्यात आला. त्यामध्ये शाळांनी स्वयं मूल्यमापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे.

shaalasiddhi.niepa.ac. in या शाळा सिद्धी वेब पोर्टल वर स्वयं मूल्यमापन ऑनलाईन करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. 25 मार्च 2019 रोजी शाळा अचिव्हमेंट स्व-मूल्यांकन वेबिनार आयोजित केलेला असून शाळा  शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापन वेबिनार पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

मार्गदर्शक सूचना

 • या वेबिनारमध्ये NIPA, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्व शाळांनी 2021-22 या वर्षासाठी स्वयं-मूल्यांकन पूर्ण करावे.
 • स्वयं-मूल्यांकन करताना, मुख्याध्यापकांनी शाळेतील कामगिरीची स्वतंत्र फाईल ठेवली पाहिजे आणि वापरकर्तानाव आणि पासवर्ड जपून ठेवावा. 
 • मुख्याध्यापकाची बदली झाल्यास, प्रभार हस्तांतरित करताना फाइल पुढील मुख्याध्यापकांकडे हस्तांतरित करावी.
 • ज्या शाळांनी 2021-22 या वर्षासाठी स्वयं-मूल्यांकन पूर्ण केले आहे त्यांनी दरवर्षी या फाईलमध्ये या फाईलची हार्ड कॉपी तयार करावी.

शाळा सिद्धी माहिती कशी भरावी?

शाळा सिध्दी 2021-22 स्वयंमूल्यमापन  करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या बाबी 

माहिती भरण्याची मुख्य चार टप्पे

1. शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती
2. शिक्षकांची माहिती
3. प्रमुख 7 क्षेत्र म्हणजे 46 मानके
4. प्रत्येक गाभा माकांनुसार त्या त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन        
 • शाळा सिध्दी स्वयंमूल्यमापन करतांना अगोदर कच्ची माहिती भरून घ्यावी व नंतर ऑनलाईन करावी,एकदा माहिती ऑनलाईन भरून झाली की त्यात कोणताही बदल पुन्हा करता येत नाही.
 • विद्यार्थी माहिती ही चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 ची लिहावी.
 • वर्गनिहाय वार्षिक उपस्थिती ही 2020-21 ची येईल, मात्र त्याची सूत्रानुसार टक्केवारी काढून भरावी.
 • वर्गनिहाय वार्षिक निकाल हा 2020-21 चा घ्यावा व दिलेल्या श्रेणीनुसार त्या त्या वर्गाची विद्यार्थी संख्या विभागून ती टक्केवारी भरावी.
 •  शिक्षक माहिती ही 2021-22 ची भरावी व शिक्षक उपस्थिती (रजा)ही 2020-21 ची माहिती भरावी.
 • 7 क्षेत्रांची माहिती ही 2021-22 ची भरावी
 •  स्तर 1 साठी priority ही High असेल, स्तर 2 साठी Medium तर स्तर 3 साठी Low येईल
 • स्तर 1 साठी 1 गूण, स्तर 2 साठी 2 गूण व स्तर 3 साठी 3 गूण आहेत. तुमच्या शाळेत असणाऱ्या विविध सुविधा आणी शाळेतील विविध घटक यातील फरक जाणून वरील योग्य त्या स्तरानुसार गूण द्यावे. यासाठी शाळा सिध्दी ची मराठी तील पुस्तिकेचे वाचन करावे.
 • मिशन स्टेटमेंट हे तुम्ही आगामी शैक्षणिक वर्षात कोणत्या गोष्टीवर प्राधान्याने काम करणार आहात त्यावर आधारित असेल त्यानुसार शक्यतो ठरवलेले घोषवाक्य पुन्हा पुन्हा त्यात बदल करू नये.
 • School Improvement Plan (शाळा सुधारणेचे नियोजन) भरताना शाळा सुधारण्यासाठी आणखी कोणते प्रयत्न केले पाहिजे तसेच स्तर वाढविण्याच्या बाबी,प्रस्तावित कार्यवाही/नियोजन कृती,आवश्यक मदत/घटक आणी पुढील कृती या बाबी तुम्ही त्या त्या क्षेत्रात लिहायच्या आहेत.

शाळा सिद्धी गुणांकन, शाळा सिद्धी (Shaala Siddhi) श्रेणी 

अ- 112 ते 138 गुण
ब - 69 ते 111 गुण
क- 68 किंवा पेक्षा कमी गुण

'शाळा सिद्धी' शासन निर्णय GR Download करा. (Shaala Siddhi GR) 

शाळा सिद्धी नविन पासवर्ड कसा तयार करायचा? shaala siddhi login password

शाळा सिद्धी नविन लॉगीन पासवर्ड  shaala siddhi login password 201-22 तयार करण्यासाठी खालील स्टेप Follow करा.
 • सर्वप्रथम Chrome Browser ओपन करा.
 • Shaala Siddhi School Login 2021-22 शाळा सिद्धी या अधिकृत वेबसाईटवर जा
 •  http://shaalasiddhi.niepa.ac.in/shaalasiddhi/Account/ShaalaSiddhiLogin
 • त्यानंतर Log In वरती क्लीक करा.
 • आपल्याला नविन पासवर्ड तयार करण्यासाठी  Submit बटनाच्या खाली forget password समोर click here आहे त्यावर क्लीक करा.
 • आता येथे आपल्या शाळेचा School UDISE Code टाका. आणि आपल्याकडे अगोदरचा otp असेल तर तो टाका आणि submit करा.
 • वरच्या बाजूला तीन ऑप्शन आहे. त्यातला Get pin OTP यावर क्लीक करा.
 • शाळेचा school udise code टाका. आणि मोबाईल नंबर किंवा Email ID टाकून Get Pin OTP ला ओके करा.
 • तुम्ही जर मोबाईल नंबर दिला असेल तर त्यावर OTP आला असेल तो टाका. Email दिला असेल तर मेल इनबॉक्स  मध्ये जाऊन OTP मेल चेक करा आणि येथे OTP टाकून सबमिट करा.
 • आता या ठिकाणी आपण आपला नविन पासवर्ड तयार करा. 

अशा प्रकारे आपण विसरलेला shaala siddhi login password  पुन्हा नविन login password  तयार करून घ्यावा.

सारांश

शाळा सिद्धी कार्यक्रम काय आहे.? Shaala Siddhi कार्यक्रमाचा उद्देश ? शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन 2021-22 चे स्वयंमूल्यमापन मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. यासंबंधी 'शाळा सिद्धी' स्वयं मूल्यमापन करताना कोणत्या माहितीचा संदर्भ घ्यावा ? विसरलेला पासवर्ड कसा मिळवायचा? शाळा सिद्धी माहिती पुस्तिका pdf , महत्वाचे शाळा सिद्धी शासन निर्णय  या माहितीचा उपयोग आपणास शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यास मदत होईल.
धन्यवाद!
टिप- शाळा सिद्धी संदर्भात वेळोवेळी महत्वाच्या अपडेट साठी शाळा सिद्धी 

School Related Post

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp लोगो का क्लिक करा.


Previous Post Next Post