पी.व्ही.सी.आधार कार्ड काय आहे? असं मिळवा PVC Aadhar Card

पी.व्ही.सी. आधार कार्ड काय आहे? PVC Aadhar Card

Pvc aadhar card


प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवणारे कार्ड म्हणजे आधार कार्ड (Aadhar Card) हे एक महत्वाचे कार्ड आहे. आपल्याला कोणत्याही कामासाठी लागणारे कागदपत्र म्हणजे आधार-सामान्य माणसाचा अधिकार असणारे माझे आधार , माझी ओळख पटवणारे आधार कार्ड सर्वांकडे आहे. 

बँकेत खाते उघडण्यासाठी , डायव्हिंग लायसन्स ,पॅन कार्ड काढण्यासाठी त्यासोबत इतर कोणतेही महत्वाचे काम करण्यासाठी लागणारे आधार कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. 

UIDAI द्वारा PVC Card देऊ केले आहे.PVC चा फुल फॉर्म poly Vinyl Chloride असा आहे. चांगल्या प्रतिचे टिकाऊ कार्ड आहे. ज्या व्यक्तीकडे आधारकार्ड नंबर किंवा नव्यानेच काढलेले Virtual ID , Enrolment ID ज्यांच्याकडे आहे. ती व्यक्ती PVC Aadhar Card मागवू शकते. 

PVC Aadhar Card चे वैशिष्ट्य


PVC Aadhar Card हे एक प्रकारचे टिकाऊ , ATM , PAN कार्ड सारखे मजबूत , टिकाऊ आहे. जे आपणास कोठेही सहज  पॉकेट मध्ये घेऊन जाता येऊ शकेल. 
PVC Card हे जुण्या आधार कार्ड प्रिंट पेक्षा अधिक चांगल्या प्रतीचे आहे. वर्षातील सर्व मोसम मध्ये सरंक्षित असणारे PVC कार्ड आहे. PVC aadhar card मध्ये वेगवेगळ्या प्रकारची सिक्युरिटी दिली आहे.
Pvc card हे चांगल्या प्रति मध्ये प्रिंटेड लॅमनेशियन मध्ये आहे.

डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड , फोटो  सहित सर्व माहिती अपडेट सह Pvc card मिळते. आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्टसारखे सिक्यूरिटी फिचर्स देखील असतात.  PVC Aadhar कार्डद्वारे  क्यूआर कोडच्या माध्यमातून तातडीने ऑफलाइन व्हेरिफिकेशन करता येतं. 

आपण प्रत्येकाने pvc card काढून घेतल्यास सर्व फायदे आपल्याला मिळतील. यासाठी आपण अगदी घरबसल्या आपल्या सहित कुटुंबातील सर्वांचे pvc aadhar card काढू शकता. ज्यांचे मोबाईल नंबर आधार ला रजिस्टर नसेल त्यांचे देखील आपण एकाच मोबाईल नंबर वरून सर्वांचे order aadhar pvc card मागवू शकतो. यासाठी आपल्याला एका pvc card साठी फक्त ₹50 खर्च येणार आहे. आणि ते ऑनलाईन पध्दतीने पेड करायचे आहे.  यासाठी क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड , Net बँकिंग, UPI (phone pay , BHIM App Google pay ) द्वारे ऑनलाईन पेड करू शकता. चला तर मग आता आपण PVC Aadhar Card Order कसे करायचे? ते पाहूया.

Pvc aadhar card order केल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये आपल्या आधार कार्ड वरील पत्यावर आपले pvc card पोस्टाने आपणास मिळेल. यासाठी आपण वेळोवेळी pvc aadhar card status चेक करू शकता.

असं मिळवा PVC Aadhar Card 


  • सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोम ब्राउझर मध्ये UIDAI असे सर्च करून uidai या अधिकृत वेबसाईटवर जा. https://uidai.gov.in/hi/
  • त्यानंतर डाव्या बाजूला तीन रेषा वर क्लीक करून My Aadhar या सेक्शन मधील Get Aadhar हा टॅब ओपन करा.
  • त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर Order Aadhaar PVC Card असे सेक्शन दिसेल त्यावर क्लीक करा.
Order pvc aadhar card


  • आता या ठिकाणी आपला 12 अंकी आधार नंबर (12 Digit UID) प्रविष्ट करा. 
  • त्याखाली Enter Security Code टाका.
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर send otp या ऑप्शन ला ओके करा.
  • आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर My Mobile number is not registered या चेक बॉक्स ला ओके करून आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
  • त्यांनतर send otp या ऑप्शन ला ओके करा
  • आता आपण दिलेल्या किंवा अगोदरच रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो Enter OTP या ऑप्शन ला सिलेक्ट करून याठिकाणी प्रविष्ट करा.
  • त्यांनतर Terms and Conditions या चेक बॉक्स ला सिलेक्ट करून Submit करा.
  • Make payment या ऑप्शन ला सिलेक्ट करून आपण ₹50 रक्कम ऑनलाईन स्वरूपात पेड करा. याठिकाणी आपणास नेट बँकिंग , डेबिट क्रेडिट कार्ड तसेच UPI द्वारे payment करा.

₹50 चे Payment सक्सेस झाल्यानंतर एक मेसेज येईल, आणि आता तुमचे आधार पीव्हीसी कार्ड देखील ऑर्डर केले जाईल. यासाठी स्क्रीन वरील रिसिप्ट डाउनलोड करा. आणि 2 दिवसानंतर आपण check aadhar pvc card status चेक करा.

PVC Aadhar Card Status कसे चेक करायचे? 


UIDAI या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर गेट आधार या सेक्शन मधील order pvc aadhar card या ऑप्शन च्या खाली check aadhar pvc card status या ऑप्शन ला ओपन करा. 
Check pvc aadhar card status


इथे आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा. 
त्यानंतर Enter Security Code टाकून जो आपण pvc आधार कार्ड साठी मोबाईल नंबर वेरीफाय केला तो इथे टाका त्यानंतर opt टाका आपले स्टेटस दिसेल.


सारांश
UIDAI आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र असून प्रत्येक कांसाठी आधार गरजेचे आहे. हेच आधार कार्ड PVC Aadhar Card प्रिंट स्वरूपात मागवले तर जुण्या आधार प्रिंट पेक्षा अधिक पटीने मजबूत व दीर्घकाळ टिकणारे , सहजपणे पॉकेट मध्ये मावणारे , संपूर्ण सुरक्षित असे हे pvc card बनवून घेतल्यास अधिक चांगले आहे. यासाठी आपण घरबसल्या सर्वांनी नक्कीच PVC Aadhar Card Order करा. 15 ते 20 दिवसांमध्ये आपल्या आधार कार्ड वरील पत्यावर pvc card आपणास मिळेल.

Previous Post Next Post