आधार कार्ड पॅनशी लिंक आहे का? घरी बसून 'असं' चेक करा स्टेट्स - Pan Aadhaar Link Status Check 2023

Pan Aadhaar Link Status Check 2023 : पॅन सोबत आधार कार्ड लिंक करणे सर्वांना बंधनकारक झाले आहे, याबाबतीत वेळोवेळी Aadhaar Card आणि Pan Card एकमेकांना लिंक करण्यासाठी सांगण्यात येत आहे, 31 मार्च 2023 ही Pan Aadhaar Link करण्याची अंतिम मुदत होती, मात्र आता केंद्र सरकारने पॅन सोबत आधार कार्डला लिंक करण्याची अंतिम मुदत आता 30 जून 2023 पर्यंत देण्यात आली आहे. जर आपण 30 जून पूर्वी आधार सोबत पॅन कार्ड जोडले नाही तर आपले पॅन कार्ड अवैद्य ठरणार आहे , त्यामुळे आताच तुमचे Pan आणि Aadhaar Link आहे का? त्याचे Status कसे Check 2023 करायचे? किंवा लिंक कसे करायचे? याबद्दलची सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

आधार कार्ड पॅनशी लिंक आहे का? घरी बसून 'असं' चेक करा स्टेट्स - Pan Aadhaar Link Status Check 2023

Pan Aadhaar Link Status Check
Pan Aadhaar Link Status Check

प्रत्येक व्यक्तीसाठी आणि विशेष संस्थांसाठी पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे, त्याशिवाय मोठे आर्थिक व्यवहार करता येत नाही, त्यामुळे प्रत्येकाला आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करणे आवश्यकच आहे.

पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक न केल्यास काय होईल?

  • 31 मार्च 2023 पूर्वी तुम्ही जर पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड हे अवैध ठरेल म्हणजे तुम्ही पॅन कार्डचा वापर करू शकणार नाही.
  • पॅन कार्ड जर अवैध ठरले तर तुम्हाला सर्वसामान्य घरापेक्षा जास्त टीडीएस (TDS) भरावा लागेल.
  • कोणत्याही प्रकारची वाहन खरेदी करू शकणार नाही त्यासोबतच विमा देखील काढता येणार नाही.
  • क्रेडिट व डेबिट कार्ड आणि डिमॅट अकाउंट साठी अर्ज करण्यास अडचण होईल.
  • बँकेतून एकाच वेळी 50 हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम काढण्यामध्ये मर्यादा येतील.
  • शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आरबीआय बॉण्ड्स इत्यादी मध्ये गुंतवणूक करता येणार नाही.
  • रुपये 10 लाखापेक्षा जास्त किमतीची कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी आणि विक्री व्यवहार करण्यास अडचणी निर्माण होतील.
  • इतर दैनंदिन महत्वाच्या कामासाठी पॅन कार्ड देता येणार नाही.

त्यामुळे आता आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करणे हे गरजेचे झाले आहे, तुमचे आधार पॅन कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही याची स्थिती तपासण्यासाठी पुढील माहिती वाचा.

आधार कार्ड पॅन सोबत लिंक आहे का? असे चेक करा - Pan Aadhaar Link Status Check

  • Pan ला Aadhaar Link आहे का? Status Check करण्यासाठी  Income Tax च्या अधिकृत (Income Tax Official Website) www.incometax.gov.in वेबसाईटवर जा
  • Home  पेजवर Quick Links या Tab वर क्लिक करा 
Pan Aadhaar Link Status Check
  • आता त्यामध्ये Link Aadhaar Status वर लिंक करा
  • तुमच्या समोर Enter the following details मध्ये तुमचा PAN नंबर टाका
  • पुढे तुमचा Aadhaar Number टाका आणि View Link Aadhaar Status वर क्लिक करा
  • आता स्क्रीन वर Your PAN XXXXXXXXXX is already linked to given Aadhaar XXXXXXXXXXXX असा मेसेज येईल किंवा लिंक नसल्या बाबतचा मेसेज दिसेल.
अशा प्रकारे तुम्ही Pan Aadhaar Link Status Check 2023 चेक करू शकता.

आधार कार्ड पॅन सोबत लिंक कसं करायचं? (How to link pan card with aadhar)

  • Pan ला Aadhaar Link करण्यासाठी  Income Tax च्या अधिकृत (Income Tax Official Website) incometaxindiaefiling.gov.in वेबसाईटवर जा
  • Home  पेजवर Quick Links या Tab वर क्लिक करा 
  • आता त्यामध्ये Link Aadhaar वर लिंक करा
  • तुमच्या समोर Link Aadhaar ची स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये तुमचे Aadhaar क्रमांक व  Pan नंबर टाका
  • त्यानंतर Validate वर क्लिक करा
  • आता मोबाईल नंबर टाकून Verification code टाका (मोबाईल नंबर वर येईल)
  • संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा, आणि काही वेळातच तुमचं आधार पॅनकार्ड लिंक होईल.

Previous Post Next Post