प्रेरणादायी ! दिव्यांग व्यक्तींच्या यशोगाथा

दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणापासून ते त्यांच्या पुनर्वसन होण्यापर्यंत शासनामार्फत विविध सवलती दिल्या जातात. दिव्यांग व्यक्तींच्या उद्धारासाठी ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या प्रेरणादायी यशोगाथा , व्याख्याने , विविध स्पर्धा घेवून त्यांना प्रेरित केले जाते. त्यामध्ये हेलन केलर , लुईस ब्रेल , स्टीफन हॉकिंग या महान व्यक्तींनी दाखवून दिले आहे की, दिव्यांग असून देखील अपंगत्वावर मात करून यशस्वी होता येते.

प्रेरणादायी ! दिव्यांग व्यक्तींच्या यशोगाथा


प्रेरणादायी ! दिव्यांग व्यक्तींच्या यशोगाथा

लुईस ब्रेल

लुईस ब्रेल यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे ज्यांना दृष्टी गमवावी लागली, अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या सारख्या कित्येक अंध व्यक्तींना ज्ञानाचा प्रकाश खुला करण्यासाठी ब्रेल लिपीचा शोध लुईस ब्रेल यांनी लावला , ब्रेल लिपीमुळे अंधत्व येऊन देखील आज कित्येक अंध व्यक्ती सामान्य जीवन जगू शकत आहे.
ज्यांना मेंदूज्वरामुळे लहानपणीच मुकबधीरत्व आणि अंधात्वाला सामोरो जावे लागले.  अशा परिस्थितीत आपले उच्चाशिक्षण सामान्य शिक्षकेच्या मार्गदर्शनाखाली अडचणींना तोंड देत पूर्ण केले. पुढे अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका , लेखिका आणि समाजसेविका म्हणून विश्वव्याख्यात झाल्यात अशा महान स्री म्हणजे हेलन केलर यांनी बहुअपंगत्व असून देखील यशशिखर गाठले. आज यांच्या प्रेरणेने असंख्य दिव्यांग व्यक्ती तसेच सामान्य व्यक्ती देखील प्रेरित होऊन यशस्वी होत आहे.

स्टीफन हॉकिंग

स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा असा असाध्य आजार झाला की ज्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे जवळजवळ अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळवला.

➡️ स्टीफन हॉकिंग संपूर्ण माहिती 

अरुणीमा सिन्हा

अरुणीमा सिन्हा या महिलेने जगातील सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट सर केले.
आपल्याला माहिती असेल उत्तर प्रदेश (लखनऊ) येथील अरुणीमा सिन्हा यांना रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले होते.  रात्रभर त्या रेल्वे पट्टीवर पडून होत्या. त्यांचे स्वप्न होते एवरेस्ट सर करण्याचे , त्यांनी ते पायाचे बूट कॅलिपर लावून , सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा एव्हरेस्ट शिखर सर करणे अवघड असते या कठीण परिस्थितीत देखील अरुणिमा सिन्हा यांनी एव्हरेस्ट शिखर पार केले.
दिव्यांगत्व आले म्हणजे ती व्यक्ती काही करु शकत नाही, असा समज त्यांनी दूर केला, मिळवलेल्या यशातून त्यांनी जगाला दाखवून दिले.

बी. एस. चंद्रशेखर

बी. एस. चंद्रशेखर भारतीय क्रिकेटला परदेशात विजयाची चटक लावणारी चंद्रशेखर - बेदी - प्रसन्ना - वेंकटराघवन् ही फिरकी गोलंदाजांची चौकड़ी सर्वपरिचित आहेच. यातील चंद्रशेखर हा सर्वांत भेदक लेग स्पिनर होता. चंद्रशेखर यांचा उजवा हात पोलिओग्रस्त होता. आपल्या व्यंगावर मात करून त्याचाच उपयोग त्यांनी फिरकी गोलदांजीसाठी करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले.

मन्सूर अली खान 

मन्सूर अली खान टायगर पतौडी यांनी कार अपघातात आपला व डोळा गमावल्यावरही जिद्दीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. एवढेच नव्हे तर कप्तानपदाची धुराही सांभाळली. केवळ एकाच डोळ्याने दिसत असूनही उत्तम क्षेत्ररक्षक आणि भरवशाचा फलंदाज असा लौकिकही मिळवला.

सुधा चंद्रन

सुधा चंद्रन एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. आणि नुसतीच उभी न राहता तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली.

वॉल्ट डिस्ने, ग्रॅहम बेल, एडिसन, आइनस्टाइन यांचे जीवनकार्य बघता यांना Dyslexia ही व्याधी होती यावर तुमचा विश्वास बसतो का ? पण ध्येय समोर असेल आणि ते साध्य करण्याची जिद्द असेल आणि आपण जे काही करत आहोत त्यावर निष्ठा असेल, तर कुठलेही काम असाध्य नाही.

ऑस्कर पिस्टोरियस पोटयांच्या खाली पाय नसलेला हा दक्षिण अफ्रिकेचा ब्लेड रनर-धावपटू. हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमासहित १००, २०० व ४०० मीटर रिनगमधील सुवर्णपदक विजेता आहेच शिवाय २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पध्रेत ४०० मीटर स्पध्रेसाठी पात्र ठरून आपण सामान्य लोकांपेक्षा कमी नाही, हेही सिद्ध केले.
Previous Post Next Post