Mahajyoti Tablet 2023 : मोफत टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

Mahajoyti Free Tablet Yojana 2023 : महाराष्ट्र राज्यातील नुकत्याच दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत, विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी / जेईई / एनईईटी- 2025  (MHT-CET/JEE/NEET) साठीची तयारी करण्यासाठी सरकार मार्फत मोफत पूर्व प्रशिक्षण व टॅबलेट  देण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. काय आहे? Mahajoyti Free Tablet Yojana याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये घेऊया..

मोफत टॅबलेट योजना 2023 : ऑनलाईन अर्ज

mahajyoti tablet yojana
mahajyoti tablet yojana

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (MAHAJYOTI) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्यामध्ये Mahajyoti Scholarship योजना असेल किंवा MHT-CET/JEE / NEET 2025 ची तयारी करण्यासाठी पूर्व प्रशिक्षण  देण्यासाठी आता विद्यार्थ्यांना Mahajyoti Yojana अंतर्गत मोफत Tablet देण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

MAHAJYOTI मार्फत MHT-CET/JEE / NEET 2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 जीबी / दिवसाला इंटरनेट डाटा पुरवण्यात येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांनी माहिती दिली आहे. 

योजनेच्या लाभासाठी पात्रता

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा 
  • उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
  • जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा देत आहेत, ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना 10 वी चे प्रवेशपत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनांनुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे  

  • इयत्ता 9 वी ची गुणपत्रिका,
  • इयत्ता 10 वी परीक्षेचे ओळखपत्र 
  • आधार कार्ड 
  • रहिवासी दाखला. 
  • जातीचे प्रमाणपत्र  
  • वैध नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र.

अर्ज कसा करावा - How to Apply Mahajyoti Tablet Yojana

  • महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळावर जा 
  • Notice Board Hefter Application for MHT-CET JEE / NEET 2025 Training यावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. 
  • अर्जासोबत वरील कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील, असे स्कॅन करून अपलोड करावेत.

महाज्योती ऑनलाईन अर्ज - अधिकृत वेबसाईट

महत्वाच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post