विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री, असा करा ऑनलाईन अर्ज - Mahajoyti Free Tablet Yojana

Mahajoyti Free Tablet Yojana : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT-CET/JEE / NEET 2025 परीक्षेच्या MHT-CET / JEE / NEET 2025 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योती मोफत टॅब योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (Application for MHT-CET/JEE/NEET - 2025 Training) महाज्योती मोफत टॅब योजनेची आवश्यक पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री, असा करा ऑनलाईन अर्ज  - Mahajoyti Free Tablet Yojana

Mahajoyti Free Tablet Yojana
Mahajoyti Free Tablet Yojana

महाज्योती योजना काय आहे?

Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI) महात्मा ज्योतीबा फुले यांचे आधुनिक समाजाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेषक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता “महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” म्हणजेच महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली. या संस्थे मार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

महाज्योती मोफत टॅब योजना काय आहे?

महाज्योती मोफत टॅब योजना ही महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पूर्व प्रशिक्षण करिता आहे. महाज्योती योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे.

महाज्योती मोफत टॅब योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता

 • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 • उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
 • उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा 
 • जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
 • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • 9 वी ची गुणपत्रिका
 • 10 वी परिक्षेचे ओळखपत्र 
 • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
 • रहिवासी दाखला 
 • जातीचे प्रमाणपत्र
 • वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

ऑनलाईन अर्ज कसा करावा? | MHT-CET/JEE/NEET 2025 पुर्व प्रशिक्षणाकरीता नोंदणी अर्ज

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT-CET/JEE / NEET 2025 परीक्षेच्या MHT-CET / JEE / NEET 2025 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी OBC / VJNT / SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

 • सर्वप्रथम  महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील " Application for MHT- CET / JEE / NEET 2025 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 
 • अर्जासोबत वर नमूद केलेले कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्वाचे

 1. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 5 जुलै 2023 आहे.
 2. पोस्टाने किवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
 3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
 4. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre संर्पक करावा संर्पक क्र 0712-2870120/21  (E-mail Id : mahajyotijeeneet24@gmail.com)
 5. 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्याकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE/NEET या परिक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.
महाज्योती ऑनलाईन अर्ज - अधिकृत वेबसाईट


महत्वाच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post