महिलांसाठी सुवर्णसंधी ! अंगणवाडी भरतीच्या 241 जागांसाठी भरती सुरु, मुंबई, कोल्हापूर, अमरावती जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या सविस्तर..

Anganwadi Bharti Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी भरती सुरु झाली असून, मुंबई, कोल्हापूर, अमरावती जिल्ह्यात 241 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. तसेच सातारा, लातूर, बुलढाणा, अहमदनगर, वाशीम जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असून भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती मध्ये महिलांसाठी सुवर्णसंधी असून, सविस्तर माहिती पाहूया..

अंगणवाडी भरतीच्या 241 जागांसाठी भरती सुरु

अमरावती जिल्ह्यामध्ये अंगणवाडीच्या 119 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यामध्ये नगरपरिषद अंतर्गत 49 तर ग्रामीण अंगणवाडी क्षेत्रातील 70 जागांसाठी दिनांक 19 जून 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 3 जुलै 2023 पर्यंत आहे.

Anganwadi Bharti Maharashtra

शैक्षणिक पात्रता : मदतनीस या पदासाठी किमान अहर्ता इयत्ता बारावी पास असणे आवश्यक आहे. किंवा राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवारांची वय हे 19 जून 2023 रोजी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असणे आवश्यक आहे. विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षापर्यंतची सूट देण्यात आली आहे.

मदतनीस पदाचे कामाचे स्वरूप : मदतनीस या पदाचे कामाचे स्वरूप हे अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे, तसेच दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे, अंगणवाडी स्वच्छता करणे, पिण्याचे पाणी भरणे, बालकांना अंगणवाडीत बोलावणे, अंगणवाडी सेविकांच्या निर्देशानुसार इतर कामे पार पडणे हे मदतनीस पदाच्या कामाचे स्वरूप असणार आहे.

अंगणवाडी मदतनीस पदाच्या 70 जागांची भरती (अमरावती पश्चिम)

बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती शहर पश्चिम अंतर्गत 70 जागांसाठी मदतनीस भरती रिक्त जागा पुढीलप्रमाणे

anganvadi bharti amaravati

अंगणवाडी मदतनीस पदाच्या 49 जागांची भरती (अमरावती उत्तर)

बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती शहर उत्तर अंतर्गत 49 जागांसाठी मदतनीस भरती रिक्त जागा पुढीलप्रमाणे

anganvadi bharti amaravati

अमरावती अंगणवाडी भरती सुरू, येथे करा अर्ज

दिनांक 19 जून 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, या तारखेच्या कार्यालयीन कामकाजाच्या 10 दिवसापर्यंत म्हणजेच दिनांक 3 जुलै 2023 पर्यंत सदर अर्ज हे बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर (पश्चिम- उत्तर) दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती त्या क्षेत्रातील कार्यालयीन वेळ सकाळी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिलेल्या मुदतीत सादर करावे. 

  • अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 जुलै 2023

नोट- जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. जाहिरात व अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे. [उमेदवारांची निवड अशी होते त्यासाठी येथे पहा]

अंगणवाडी अमरावती 70 जागांसाठी जाहिरात येथे डाउनलोड करा 
अंगणवाडी अमरावती 49 जागांसाठी जाहिरात येथे डाउनलोड करा 

मुंबई अंगणवाडी भरती जाहिरात

बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम, मुंबई या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाच्या 31 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील (आर-मध्य, आर-उत्तर, आर-दक्षिण) बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली (पश्चिम) (प्रकल्प क्षेत्रातील) यांच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवासी महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

  • अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2023

नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

mumbai anganvadi

अर्जाचा नमुना प्रत्यक्ष कार्यालयात कार्यालयीन दिवशी व वेळेत उपलब्ध असणार आहे. अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिध्द केल्यापासून 10 कार्यालयीन दिवस म्हणजे 28 जून 2023 पर्यत सादर करावे.

सातवा वेतन आयोग लेटेस्ट न्यूज पहा
सातारा, लातूर, बुलढाणा, अहमदनगर, वाशीम जिल्ह्याची जाहिरात

कोल्हापूर अंगणवाडी भरती 91 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

अंगणवाडी भरती कोल्हापूर जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकूण 91 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. 

  • अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 जुलै 2023

नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
अधिकृत वेबसाईट - https://kolhapur.gov.in/

कोल्हापूर अंगणवाडी भरती जाहिरात 1
कोल्हापूर अंगणवाडी भरती जाहिरात 2
कोल्हापूर अंगणवाडी भरती जाहिरात 3

अंगणवाडी भरती - दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजीचा शासन निर्णय येथे पहा

Previous Post Next Post