RTE Admission Second Round Date : आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे, शासनाने आता प्रतीक्षा यादीतील पहिल्या टप्प्यातील मुलांसाठी रिमेनिंग झिरो करण्याबाबत संबंधित विभागांना कळविले आहे. प्रतीक्षा यादीतील टप्पा १ मधील मुलांच्या प्रवेशासाठी आणखी तीन दिवस वाढवून देण्यात आलेले आहेत, त्यानंतर रिक्त जागेनुसार प्रतीक्षा यादीतील उर्वरित मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. सविस्तर पाहूया..
प्रतिक्षा यादीतील टप्पा एक मधील प्रवेश रिमेनिंग झिरो होणार
सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र.1 मधील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन रिमेनिंग झिरो करणेबाबत कळविण्यात आले आहे.
रिमेनिंग झिरो याचा अर्थ असा आहे की, प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील प्रवेश पात्र बालकांशी संपर्क साधूनही प्रवेशासाठी आलेले नाहीत. अशा बालकांना दिनांक २२ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत Not Approch करुन रिमेनिंग झिरो करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर मग रिक्त असलेल्या जागांसाठी इतर मुलांना संधी दिली जाणार आहे.
प्रतीक्षा यादीतील दुसरी फेरी या तारखेपासून सुरु होणार
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी काढण्यात आली असून, प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश निश्चित करण्याकरिता दिनांक ३० मे ते १९ जून २०२३ या कालावधी पर्यंत देण्यात आलेला होता.
आता प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश Verify आणि Admit करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. तसेच दिनांक २२ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत Not Approch करुन रिमेनिंग झिरो करण्याबाबत सांगण्यात आले आहेत.
म्हणजेच प्रतीक्षा यादीतील टप्पा २ (दुसरी फेरी) दिनांक २२ जून २०२३ नंतर सुरु होणार आहे. RTE च्या रिक्त असणाऱ्या जागानिहाय प्रतीक्षा यादीतील मुलांना अनुक्रमे प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.
'आरटीईच्या' 13 हजाराहून अधिक जागा रिक्त येथे पहा