RTE Admission Waiting List Status : 'आरटीई' प्रतीक्षा यादीतील अर्जाची स्थिती अशी तपासा, तिसरी फेरी सुरु...

RTE Admission Waiting List Status : 'आरटीई' 25 टक्के प्रवेश संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट, राज्यातील RTE 25% Addmission अंतर्गत लॉटरी मध्ये निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशासाठी 30 मे 2023 पासून सुरुवात झाली असून प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 19 जून 2023 पर्यंत देण्यात आली होती. आता पुढील प्रतीक्षा यादीतील मुलांना अनुक्रमे मुलांना मॅसेज (SMS) पाठवण्यात आले आहेत. तुमच्या मुलाला प्रवेशाची संधी मिळाली हे तुम्ही चेक करू शकता याविषयीची सविस्तर माहिती पाहूया..

'आरटीई'  प्रवेशाची तिसरी फेरी सुरु

RTE Admission Waiting List Status

'आरटीई' २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२३ २४ अंतर्गत राज्यातील निवड यादीतील ६४ हजार २५६ मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. निवड यादीतील मुलांना प्रवेश घेण्याची अंतिम मुदत २२ मे पर्यंत देण्यात आली होती. आता प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश ३० मे पासून सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील २५ हजार ८९० मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.

'आरटीई' लॉटरी प्रतीक्षा यादीतील ८१ हजार १२९ मुलांपैकी अनुक्रमे २५ हजार ८९० मुलांना एसएमएस पाठविण्यात आले असून, ३० मे २०२३ पासून प्रवेश घेण्यास सुरुवात असून, प्रवेशाची अंतिम तारीख 19 जून 2023 पर्यंत होती. आता पुढील प्रतीक्षा यादीतील मुलांना अनुक्रमे मुलांना मॅसेज (SMS) पाठवण्यात आले आहेत.

RTE Admission Waiting List Status : 'आरटीई'  प्रतीक्षा यादीतील अर्जाची स्थिती अशी तपासा

RTE 25 टक्के योजनेंतर्गत तुमच्या मुलाचा जर लॉटरी मध्ये प्रतीक्षा यादीत नंबर असेल तर तुम्ही यादीतील अनुक्रमांक किती पर्यंत च्या मुलांची निवड करण्यात आली हे पाहू शकणार आहात, त्यासाठी पुढील स्टेप Follow करा.

Application Wise Details - अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा (लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)

RTE WEBSITE


तिथे HOME पेजवर - Application Wise Details - अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा

RTE Application Wise Details

आता Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती चेक करा.

RTE Application Wise Details

तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीचे स्टेट्स दिसेल, प्रतीक्षा यादीतील किती अनुक्रमांकाच्या मुलांना संधी देण्यात आली आहे, ते दिसेल.

उदा. प्रतीक्षा यादीतील अनु. क्रमांक : 7 पर्यंतच्या अर्जाची निवड झाली आहे.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या अर्जाची स्थिती पाहू शकता.


'आरटीई' प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेशपत्र उपलब्ध येथे डाउनलोड करा

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.


Previous Post Next Post