RTE Admission 2023 24 : [Waiting List] 'आरटीई' अंतर्गत आता प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी, 30 हजाराहून अधिक जागा रिक्त...

RTE Admission Waiting List Children 2023 24 : 'आरटीई' अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतील लॉटरीमध्ये निवड झालेल्या मुलांना पहिल्या टप्प्यामध्ये प्रवेश निश्चित करण्याची संधी देण्यात आली होती, ती मुदत आता संपली असून, अजूनही राज्यातील 30 हजाराहून अधिक जागा रिक्त आहे, आता प्रतीक्षा यादीतील मुलांना या रिक्त असणाऱ्या जागांवर प्रवेश मिळणार आहे, प्रतीक्षा यादीतील (Waiting List) मुलांचे प्रवेश कधी सुरू होणार ? याबाबत पालकांकडून वारंवार विचारणा होत आहे, या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट बातमी पाहूया..

'आरटीई' 25 टक्के अंतर्गत 64 हजार 252 मुलांचे प्रवेश निश्चित

RTE Admission Waiting List Children 2023 24

शैक्षणिक वर्ष 2023 24 सुरू होण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत, राज्यातील आरटीई 25% योजनेअंतर्गत यंदा प्रवेश प्रक्रिया जानेवारी महिन्यामध्येच सुरू करण्यात आली होती.

त्यानुसार 'आरटीई'च्या लॉटरीमध्ये 94 हजार 700 मुलांची निवड करण्यात आली होती, या मुलांचे कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत 22 मे 2023 रोजी समाप्त झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील 64 हजार 252 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहे. 

'आरटीई'  25 टक्के अंतर्गत 30 हजाराहून अधिक जागा रिक्त

RTE प्रवेश निश्चित करण्यासाठी शासनाने वेळोवेळी तीन वेळा मुदत देऊनही, आरटीई पोर्टलच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 30 हजार 448 जागा अजून रिक्त असल्याचे दिसून येत आहे.

बरेच विद्यार्थी कागदपत्रे पडताळणी मध्ये अपात्र झाले तर काही पालकांना मनासारखी शाळा न मिळाल्याने RTE प्रवेश निश्चित केले नाही. तसेच काही फलकांनी 'आरटीई' योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना चुकीची शाळा निवडल्यामुळे मनस्ताप करावा लागत आहे. 

त्यामुळे 'आरटीई' मध्ये निवड होऊन देखील पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. तर 64 हजार 252 मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.  मात्र अजूनही 30 हजार 448 जागा रिक्त असून आता या रिक्त असणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. [RTE Admission Waiting List 2023 24]

रिक्त जागांवर आता प्रतीक्षा यादीतील मुलांना मिळणार संधी

शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या 12 मे 2023 च्या परिपत्रकानुसार दि 22 मे 2023 नंतर 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील [Waiting List]  मुलांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत RTE Portal वरील आकडेवारीनुसार राज्यातील RTE कोट्यातील 30 हजार 448 जागा रिक्त आहेत. या रिक्त असणाऱ्या जागांवर  लॉटरी मधील प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या  81 हजार 129 मुलांना अनुक्रमे प्रवेश निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.

आता पर्यंतच्या रिक्त राहिलेल्या जागांचा आढावा घेऊन ही संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्याचे काम सुरु असून दिनांक 31 मे च्या आसपास [RTE Admission Waiting List PDF 2023 24] प्रतीक्षा यादीतील मुलांना अनुक्रमे एसएमएस SMS पाठविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याबाबत RTE पोर्टल वर अधिकृत माहिती लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर या रिक्त जागांवर 'आरटीई' 'वेटिंग' लिस्ट मधील मुलांना  प्रवेश मिळणार आहे. सविस्तर येथे वाचा.

'आरटीई' च्या तुमच्या जिल्ह्यातील रिक्त जागा येथे पहा
'आरटीई' दुसरी फेरी येथे पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

                                                             

Previous Post Next Post