RTE Admission : 'आरटीई' प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी सुरु, 'या' तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन..

RTE Admission Document Verification 2023 : राज्यातील 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 'आता' शेवटच्या टप्प्यात आली असून, RTE 25 टक्के मोफत प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी सुरु झालेली आहे, नुकताच 'आरटीई' लॉटरी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यानंतर पालकांना एसएमएस (SMS) पाठवण्यात आले आहेत, त्यानुसार आता पालकांना 8 मे 2023 पर्यंत RTE Admission Document Verification (कागदपत्रे पडताळणी) करून बालकाचा प्रवेश निश्चित करावा लागणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहूया..

राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी 94 हजार 700 बालकांची निवड

RTE Admission 2023

शिक्षण हक्क कायदा 2009 अन्वये RTE Admission करिता, महाराष्ट्र राज्यात आर्थिक व वंचित घटकातील बालकांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो, RTE योजनेअंतर्गत निवड झालेल्या बालकांना ज्युनियर केजी पासून ते इयत्ता आठवी पर्यंत मोफत शिक्षण मिळते.

शैक्षणिक वर्ष 2023 24 च्या प्रवेशासाठी यंदा शासनाने 'आरटीई' ची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु करण्यात आली होती, त्यामध्ये पहिल्या टप्प्यात शाळांना नोंदणी करण्यासाठी वेळ देण्यात आला होता, त्यानंतर पालकांना मुलांच्या प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन भरण्यास आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार RTE प्रवेशाची ऑनलाईन सोडत कार्यक्रम 5 एप्रिल 2023 रोजी राज्यस्तरावर संपन्न झाला असून 'आरटीई' ची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी RTE Portal वर दिनांक 12 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली व निवड झालेल्या पालकांना मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी 94 हजार 700 बालकांची निवड करण्यात आली असून, 81 हजार 129 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत.

आता पालकांना 8 मे 2023 पर्यंत RTE Admission ऑनलाईन फॉर्म भरताना सादर केलेले कागदपत्रे तालुका/मनपा क्षेत्रातील शिक्षण समिती कडून पडताळणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. 14 एप्रिल ते 16 एप्रिल सलग तीन दिवस शासकीय सुट्टी आल्यामुळे आता सोमवार पासून कागदपत्रांची पडताळणी प्रत्यक्षात सुरु होणार असून, पालकांनी वेळेत आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घेण्यास आवाहन करण्यात आले आहे.

'आरटीई' प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणीसाठी 8 मे पर्यंत मुदत

आरटीईची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी आता पालकांना लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्रांची 13 एप्रिल 2023 ते 8 मे 2023 पर्यंत संबधित तालुका व मनपा क्षेत्रातील शिक्षण समितीकडून कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून घ्यावयाची आहे. त्यासाठी महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे

महत्वाचे - ज्या पालकांना एसएमएस (SMS) आले नाहीत त्यांनी आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी. अर्जाचे स्टेटस येथे चेक करा

  • सर्वप्रथम ज्या पालकांना एसएमएस मिळाला आहे, किंवा निवड यादीत नाव आहे अशा सर्व पालकांनी RTE पोर्टल ला लॉगीन करून Admit Card (अलॉटमेंट लेटरची प्रिंट) डाउनलोड करून घ्यावे.
  • आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
  • निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी RTE अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात.
  • प्रवेशपत्रात नमूद संबधित तालुका/मनपा पडताळणी समितीकडे जाऊन दिलेल्या मुदतीत मुलाचा प्रवेश ऑनलाईन निश्चित करून घ्यावा.
  • प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे, याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

प्रतीक्षा यादीतील पालकांना 'या' दिवशी मिळणार एसएमएस

RTE च्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत ही 30 एप्रिल 2023 आहे, त्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जाणार आहेत.

'आरटीई' लॉटरी प्रतीक्षा (Waiting List) येथे पहा

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

'आरटीई' प्रवेशासाठी नवीन वेळापत्रक येथे पहा

नवनविन अपडेट साठी  Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post