गुड न्यूज ! 'आरटीई' प्रवेशाची पहिली यादी 'आज' होणार जाहीर, मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा पडताळणी..

RTE Maharashtra Lottery Result 2023 link :नामांकित खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे, नुकतेच राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी व नवीन वर्षातील शाळा सुरु करण्याबाबत राज्य शासनाने परिपत्रक काढले आहे, त्यानुसार राज्यातील शाळा 12 जून 2023 पासून सुरु होणार आहे, नवीन वर्षातील RTE अंतर्गत मोफत प्रवेशासाठी आता खाजगी शाळेतील प्रवेशासाठी 30 एप्रिल 2023 ही प्रवेशाची अंतिम मुदत आहे.

'आरटीई' लॉटरी च्या मेसेज (SMS) वर  विसंबून न राहता स्वतः पडताळणी करा

RTE Maharashtra Lottery Result 2023 link

'आरटीई' लॉटरीची सोडत जाहीर झाली असून आता अंतिम निवड यादीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे, दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 4 वाजेपासून पालकांना मोबाईल वर एसएमएस मिळणार असल्याची माहिती RTE च्या अधिकृत पोर्टल वर जाहीर करण्यात आली आहे.

मात्र कधीकधी निवड यादीत नाव असून देखील तांत्रिक अडचणीमुळे पालकांना SMS जर नाही मिळाले तर त्यावर विसंबून न राहता तुम्ही स्वत: आरटीई प्रवेशाची अंतिम (लॉटरी) यादी RTE पोर्टल वर पाहू शकता. त्यासाठी लॉगीन करून पहा अर्जाची स्थिती

'आरटीई' लॉटरी बाबत लॉगीन करून पहा अर्जाची स्थिती

RTE लॉटरी चे मेसेज 12 तारखेला 4 वाजेपासून येण्यास सुरुवात होईल, पण तरीदेखील तुम्ही rte25admission.maharashtra.gov.in या RTE च्या पोर्टल वर जाऊन लॉगीन करा. व तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या. RTE Maharashtra Lottery Result 2023 link लिंक पुढे दिलेली आहे.

RTE साठी फॉर्म भरताना जो रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाकून पोर्टल वर लॉगीन करा आणि Admit Card या Tab मध्ये चेक करा.

लॉटरी मध्ये जर तुमच्या बालकांची निवड झाली असेल तर लॉगीन मध्ये Admit Card या सेक्शन मध्ये तुम्हाला प्रवेशपत्र दिसेल, ते डाउनलोड करून घ्या आणि दिलेल्या वेळेत तालुका / मनपा स्तरावर संबंधित कागदपत्रे घेऊन पडताळणी करा आणि तुमचा प्रवेश निश्चित करून घ्या. 

'आरटीई' लॉटरी निकाल 2023 | RTE Maharashtra Lottery Result 2023 link 

'आरटीई' लॉटरी निकाल 2023 म्हणजेच लॉटरी सोडत काढण्याचा कार्यक्रम नुकताच राज्यस्तरावर संपन्न झाला आहे, आता 12 एप्रिल 2023 रोजी पालकांना SMS मिळणार आहे.

काही तांत्रिक अडचणीमुळे मेसेज SMS आला नाही तर, मेसेज वर अवलंबून न राहता तुम्ही स्वत: RTE च्या पोर्टल वर जाऊन चेक करू शकता त्यासाठी खालील स्टेप FOLLOW करा.

  • सर्वप्रथम RTE पोर्टल https://rte25admission.maharashtra.gov.in/ वर जा 
  • {getButton} $text={Website Link} $icon={link}
  • त्यांनतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तयार केलेला पासवर्ड आणि तुमचा अर्ज क्रमांक टाकून लॉगीन करा त्यासाठी https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या लिंकवर जा
  • {getButton} $text={RTE Login} $icon={link}
  • त्यांनतर Admit Card या पर्यायावर क्लिक करा
  • जर तुमच्या बालकाचा नंबर लॉटरी मध्ये असेल तर तुम्हाला स्क्रीन वर प्रवेशपत्र दिसेल, त्यावर मिळालेली शाळा आणि पुढील कार्यवाहीच्या सूचना असतील. 
  • आता तुम्ही RTE Admit Card Download करू शकता.
त्यानंतर तुम्ही तालुका/मनपा स्तरावर कागदपत्रे पडताळणीसाठी दिलेल्या तारखेला सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित रहा आणि प्रवेश निश्चित करून घ्या. त्यांनतर तुम्हाला मिळालेल्या शाळेत 30 एप्रिल 2023 पर्यंत संबंधित शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे.

'आरटीई' प्रवेशासाठी कागदपत्रे आणि प्रवेश घेण्याचे वेळापत्रक येथे पहा

'आरटीई' 2023 संदर्भातील सर्व प्रक्रिया येथे पहा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              
Previous Post Next Post