7th Pay Commission DA hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' दिवशी पगारात होणार भरघोस वाढ

7th Pay Commission DA hike : सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, नुकताच केंद्र सरकारने DA महागाई भत्ता हा 38 टक्क्यावरून 42 टक्के केला आहे. या महत्वपूर्ण निर्णायामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे. आता यापुढील महागाई भत्ता DA Increase वाढ ही जुलै 2023 पासून जाहीर होणार असून ही वाढ देखील 4 टक्के होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ

7th Pay Commission DA hike

सरकार कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाचे निर्णय घेत असते, जुनी पेन्शन योजना हा मुद्दा ताजा असून त्यावर देखील लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, त्यासाठी समिती स्थापन करून कार्यवाही सुरु झालेली आहे.

सातव्या वेतन आयोग 7th Pay Commission 2016 मध्ये लागू करण्यात आला तेव्हा महागाई भत्ता हा शून्य करण्यात आला होता, त्यांनतर त्यात वाढ करत आता केंद्र सरकारी कर्मचारयाना 42 टक्के तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 38 टक्के इतके महागाई भत्ता देण्यात येतो.

आता जुलै महिन्यात पुन्हा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात वाढ होणार असून तो 4 टक्याने वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे, याप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी यांच्या महागाई भत्ता हा 50 टक्के पर्यंत वाढ झाल्यानंतर तो पुन्हा शून्य होणार आहे. मात्र हा भत्ता लाभ त्यांच्या मूळ वेतनात समाविष्ट करण्यात येईल तेव्हा त्यामध्ये भरघोस वाढ होईल.

महागाई भत्ता शून्य होणार !

महागाई भत्ता वाढ ही  50 टक्क्यांपर्यंत पोहचल्यानंतर 50 % महागाई भत्ता वाढीनुसार कर्मचाऱ्यांना हा भत्ता त्यांच्या मूळ वेतनात जोडला जाईल आणि तो शून्य केला जाईल. हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया..

समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन जर, 24000 रुपये इतके असेल तर त्यांना मिळणाऱ्या 50% महागाई भत्त्यानुसार चोवीस हजारावर, 12000 रुपये मिळेल मात्र  हा भत्ता तो मूळ पगारात जोडला जाईल, म्हणजे त्यांचा मूळ पगार आणि 50 टक्के महागाई भत्ता ही सर्व रक्कम मूळ वेतनात समाविष्ट करण्यात येईल आणि पुन्हा महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल. 

किती वाढणार पगार 42 टक्के DA नुसार ?

{getButton} $text={येथे पहा} $icon={link}

आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू

महत्वपूर्ण बातम्या

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post