प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू होणार - ग्रामविकास मंत्री

Padvidhar Vetan Shreni : राज्यातील प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत विधानपरिषदेचे सदस्य कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर विधानपरिषद प्रश्नोत्तराच्या तासाला ग्रामविकास मंत्री मा. श्री. गिरीष महाजन यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.

प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू होणार - ग्रामविकास मंत्री

Padvidhar Vetan Shreni

राज्यातील प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे  ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यातील प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री श्री. महाजन बोलत होते.

प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करणार - ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन{alertInfo}

शालेय शिक्षण विभागाच्या शाळा नियम 13 ऑक्टोबर 2016 च्या तरतुदीनुसार 5 वी ते 7 वी साठी ज्या शाळेत 4 शिक्षक आवश्यक आहेत, त्यापैकी तिथे एक पदवीधर शिक्षक आहेत. तसेच 6 वी ते 8 वी साठी 3 शिक्षक तिथे 1 पदवीधर शिक्षक आहेत.

राज्यातील प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. 

समान काम, समान वेतन या विषयाबाबतीत मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. तसेच आयुक्त शिक्षण यांच्या स्तरावर समिती देखील नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर आणि मा. उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर शासन याबाबतीत योग्य ती कार्यवाही करेल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याकरिता समिती स्थापन

पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करुन शिफारस करण्याकरिता आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे.

उच्च प्राथमिक स्तरावरील २५ टक्के शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यामागील पार्श्वभूमी, सदर शिक्षकांच्या शैक्षणिक/व्यावसायिक अर्हतेमध्ये कालोघात झालेले बदल, सदर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देण्याची मागणी, त्यामुळे पडणारा आर्थिक भार इ. अनुषंगिक सर्व मुद्यांचा सर्वंकष अभ्यास करुन शासनास शिफारस करण्याकरिता आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. व लवकरच या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्या

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post