Maharashtra Budget 2023 - महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

Maharashtra Budget Highlights 2023 : आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023-24 राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा , अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनामध्ये मांडला, या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजना आणि इतर सरकारी योजनेतील अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पातील महिला तसेच शालेय योजनेतील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे घोषणा करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Budget 2023 - महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प ठळक मुद्दे

maharashtra budget highlights 2023

राज्यातील शालेय विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिष्यवृत्ती रकमेत मोठी वाढ

विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ 

  1. 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये 
  2. 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये

सर्व विद्यार्थ्यांना आता मोफत गणवेश

सर्व विद्यार्थ्यांना गणवेश ही मोफत मिळणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार गणवेश येथे वाचा

शिक्षणावर किती खर्च?

शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, इतर विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्च शिक्षणासाठी १ लाख ८६६ कोटींची गुंतवणूक. शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन या गुंतवणुकीत वाढ करून १ लाख ११ हजार २८५ कोटी इतका खर्च प्रस्तावित केला आहे.

लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींसाठी भरीव मदत जाहीर

मुलगी जन्माला आल्यानंतर 5 हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

लेक लाडकी योजना: पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५ हजार, इयत्ता चौथीत ४ हजार, ६वीत ६ हजार, ११वीत ८ हजार तर १८ वर्षानंतर ७५ हजार रुपये देणार. 

मुलींसाठी अनुदानाची योजना

राष्ट्राची प्रगती महिला सक्षमीकरणातून केली जाते. त्यासाठी चौथे महिला सक्षमीकरण धोरण जाहीर करणार आहोत. लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५ हजार, चौथीत ४ हजार, सहावीत ६ हजार, आठवीत ८ हजार रुपये तर १८ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.

महिलांना बस मध्ये 50 टक्के सवलत मिळणार

महिलांना एसटीच्या तिकीटात ५० टक्के सवलत देण्याची महत्वपूर्ण घोषणा

सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक उभारणार 

भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी 50 कोटी रुपये तरतूद

पीएमश्री योजनेतील शाळांसाठी 1534 कोटी

पीएमश्री अंतर्गत राज्यातील 816 शाळांसाठी 5 वर्षांत 1534 कोटी रुपये खर्च करणार

पीएम श्री शाळा योजना नक्की काय आहे? संपूर्ण माहिती येथे वाचा

प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ

  • उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 9000 वरुन 20,000 रुपये वाढ करण्यात आली आहे.
  • माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 8000 वरुन 18,000 रुपये वाढ
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात  6000 वरुन 16,000 रुपये वाढ

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ 

शिक्षण सेवक मानधन वाढ शासन निर्णय येथे पहा

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागासाठी मोठी तरतूद

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार

ऐतिहासिक निर्णय ! दिव्यांग मंत्रालय स्थापन

दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना

अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ

८१ हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा सेविकांसाठी ३५०० तर गटप्रवर्तकांचे मासिक मानधन ४ हजार रुपये आहे. त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वाढ. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३२५ रुपयांवरून १० हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरून ७२०० रुपये तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४२५ वरून ५५२५ रुपये

सशक्त युवा- खेळांना प्रोत्साहन

  • खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध
  • बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार
  • पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार 
  • हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान 
  • नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये

आणखी सरकारी योजना वाचा

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post