शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ 1 जानेवारीपासून - सुधारित मानधन शासन निर्णय

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याचाही निर्णय यादरम्यान घेण्यात आला.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मानधन वाढ

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ 1  जानेवारीपासून

मात्र शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणूक यांच्या आचारसंहितेमुळे त्याचा शासन निर्णय काढणे प्रलंबित होता. तो शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला. शिक्षकांच्या या विलंबामुळे महिनाभराचे नुकसान होऊ नये म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2023 पासून करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी दिली.

शिक्षकांचे सुधारित मानधन खालील प्रमाणे

  • प्राथमिक, उच्च प्राथमिक - 16000 रुपये
  • माध्यमिक - 18000 रुपये
  • उच्च माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालय - 20000 रुपये
  • शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ मानधन - 14000 रुपये
  • प्रयोगशाळा सहायक कनिष्ठ लिपिक - 12000 रुपये
  • चतुर्थ श्रेणी कर्मचारी - 8000 रुपये

सुधारित मानधन शासन निर्णय


आणखी वाचा

नवनविन अपडेट साठी  जॉईन करा.

                                                          

Previous Post Next Post