PM SHRI Schools Yojana : पीएम श्री योजना आहे तरी काय ? प्रत्येक शाळेला 1 कोटी 88 लाख रुपये मंजूर..

PM SHRI Schools Yojana : पीएम श्री (PM Schools for Rising India) ही केंद्र सरकारची योजना असून, महाराष्ट्र राज्यामध्ये 'पीएम श्री' योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. 'पीएम श्री' (PM Shri School Yojana) अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) मधील सर्व घटकांचा समावेश करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. देशातील सुमारे 14 हजार 500 शाळा उत्कृष्ट भौतिक/ पायाभूत सुविधांसह, योग्य संसाधनासह, आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिक दृष्ट्या अनुकूल, शालेय वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक उत्कृष्ट शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. तर PM Shri School अंतर्गत एका शाळेसाठी 1 कोटी 88 लाख रुपये एवढा खर्च करण्यात येणार आहे.

पीएम श्री योजना आहे तरी काय ? प्रत्येक शाळेला 1 कोटी 88 लाख रुपये मंजूर

Pm shri school yojana

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी 'पीएम श्री' योजनेतील शाळांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या शाळांचे उद्दिष्ट फक्त आकलनात्मक विकास (Cognitive Development) करण्यापुरते मर्यादित नसून, मूलांचा 21 व्या शतकातील प्रमुख कौशल्यांवर आधारीत सर्वांगीण विकास करणे व त्यांना सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व घडवणे हे देखील आहे. प्रत्येक इयत्तेत प्रत्येक मुलाच्या अध्ययन निष्पतीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

पीएम श्री' योजना फुल फॉर्म - PM Shri Full Form

केंद्र शासनाने पीएम श्री शाळा (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची 7 सप्टेंबर 2022 रोजी पार पडलेल्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. PM Shri School योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या योजेतंर्गत प्रति शाळा विकसित करण्यासाठी एका शाळेवर 1 कोटी 88 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनइपी) 2020 चे सर्व घटकांचा समावेश करत देशातील 14 हजार 500 हून अधिक शाळा पीएम श्री शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

हे ही वाचा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज पहाजुनी पेन्शन योजना लेटेस्ट बातमी - कंत्राटी कर्मचाऱ्यांना (SSA) शासन सेवेत कायम - पेन्शन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! - कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ 

पीएम श्री शाळांची योजना 2022-23 ते 2026 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी एकूण 27360 कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चासह राबविण्यात येणार आहे.

'पीएम श्री' ही योजना केंद्र सरकारची असून, शाळेतील भौतिक सुविधा बरोबर विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्वसमावेशक शाळा विकसित करण्यात येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सर्व बाबींचा समावेश PM Shri योजनेतील शाळांवर लक्ष केंद्रित केले आहे. PM Shri Full Form - Pradhan Mantri Schools For Rising India असा आहे. तर याचा मराठीत अर्थ उदयोन्मुख भारतासाठी पंतप्रधान शाळा (प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया) असा होतो.

'पीएम श्री' योजनेतील शाळांचे प्रमुख उद्दिष्टे

  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) सर्वसमावेशक, एक समान आणि समाजाप्रती व समाजोपयोगी योगदान देणारे नागरिक घडविणे. 
  • विद्यार्थी केंद्रित, अनुभवात्मक, खेळाधारित, आनंददायी, चिकित्सक शोध, लवचिक अशा समग्र (सर्वसमावेशक) शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे.
  • प्रत्येक इयत्तेतील मुलांच्या शिकण्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करून, तार्किक कौशल्याचे मूल्यांकन करणे.
  • विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील परिस्थितीमध्ये ज्ञानाच्या वापरावर आणि योग्यतेवर आधारित मूल्यांकन करणे
  • व्यावसायिक शिक्षणासाठी कौशल्य आधारित अभियोग्यता चाचणी घेणे.
  • समाज आणि माजी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून त्यांना करिअर मार्गदर्शन, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आणि शैक्षणिक मदत करणे.
  • सर्व मुलांना शाळेत दाखल करून त्यांची नियमित उपस्थिती टिकवूनन ठेवून त्यांच्या शिकण्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे. 
  • काही कारणास्तव विद्यार्थ्यांची गळती झाली असल्यास त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश देऊन अशा मुलांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करणे.
  • शिक्षणात अग्रेसर म्हणून कामगिरी पार पाडून कालांतराने शेजारच्या शाळांना आपले अनुकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • शाळा औद्योगिक क्रांती 4.0 प्रमाणे, उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या (Emerging Economy) आवश्यकतेनुसार पूरक करणे.

'पीएम श्री' शाळा विकसित करण्याचे प्रमुख सहा आधार स्तंभ

'पीएम श्री' शाळा प्रमुख सहा आधार स्तंभाच्या आधारे विकसित करण्यात येणार आहे. सहा आधारस्तंभ पुढील प्रमाणे 
  1. अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन
  2. प्रवेश आणि पायाभूत सुविधा
  3. मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व
  4. समावेशक पद्धती आणि लिंग समानता
  5. व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन
  6. लाभार्थी समाधान

अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन

'पीएम श्री' शाळांमधील अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापनांचा उद्देश विद्यार्थ्यांना संस्था आणि उद्देशाची भावना यासह स्मरणशक्तीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःचे जीवन घडविण्यासह इतरांच्या जीवनात योगदान देण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांनी सुसज्ज करणे हा आहे. सदर शाळांमध्ये शिकवणे आणि शिकणे अधिक परस्परसंवादीपणे होईल आणि वर्गातील सत्रे अधिक मनोरंजक, सर्जनशील, सहयोगी आणि अन्वेषणात्मक असतील याची खात्री करण्यात येईल.

प्रवेश आणि पायाभूत सुविधा

पीएम श्री शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला एक जबाबदार व्यक्ती म्हणून विकसित होण्यासाठी जास्तीत जास्त ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आवश्यक शिकण्याचे वातावरण प्रदान करतील. सर्व लिंगांच्या तसेच दिव्यांग मुलांसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित, सर्वसमावेशक आणि परिणामकारक शैक्षणिक वातावरण प्रदान होईल व ते शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी आरामदायक आणि प्रेरित असल्याची खात्री करतील.

याअंतर्गत अस्तित्वात असलेल्या शाळांचा विस्तार करण्यात येईल तर अशा शाळा अस्तित्वात नसलेल्या भागात अतिरिक्त दर्जेदार शाळा बांधून विशेषतः मुलींसाठी सुरक्षित आणि व्यावहारिक वाहतूक व्यवस्थेसह, वसतिगृह जेणेकरुन सर्व मुलांना अशा योग्य स्तराच्या दर्जेदार शाळांमध्ये जाण्याची संधी मिळेल.

मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व

शिक्षणातील झपाट्याने होत असलेली प्रगती पाहता, अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र तसेच मुल्यमापन इत्यादींच्या नवीनतम पद्धतीनुसार शिक्षकांना प्रशिक्षित करणे महत्त्वाचे आहे. शिक्षक हे शैक्षणिक परिसंस्थेतील महत्त्वाचे सहाय्यक देखील आहेत. शिक्षण व्यवस्थेतील गतिमानतेसाठी शिक्षकांनी आजीवन शिकत राहून प्रशिक्षण आणि उच्च कौशल्याच्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. शालेय नेतृत्व विकास हा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.

'पीएम श्री' शाळा शिक्षकांना त्यांच्या कार्यकाळात प्रत्यक्षरीत्या तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या बाबतीत आवश्यक समर्थन प्रदान करण्यासाठी सक्षम करतील.

समावेशक पद्धती आणि लिंग समानता

शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या सुरक्षित वातावरणाचा विद्यार्थ्याच्या भावनिक कार्यक्षेत्रावर प्रभाव टाकणा-या प्रेरणा. दृष्टीकोन आणि धारणा इ. मूल्यावर परिणाम होत असल्याने, असे वातावरण असलेल्या "पीएम श्री शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्याना प्रवेश मिळणे आवश्यक आहे. त्यानूसार "पीएम श्री" शाळा सर्वसमावेशक पद्धती आणि लिंग समानतेमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्याचे सुनिश्चित करतील.

व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन

"पीएम श्री" शाळांनी शालेय परिवर्तनाचा परिणाम तपासण्यासाठी एक मजबूत व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन प्रणाली सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यामध्ये "पीएम श्री " शाळांमध्ये विद्यमान योजना, नियोजन यंत्रणा, संसाधन व्यवस्थापन आणि इतर व्यवस्थापकीय पैलूंसह निरीक्षण आणि मूल्यमापन यंत्रणा यांचा समावेश आहे. त्यानूसार "पीएम श्री शाळा पुरेशी व संबंधित व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करतील. 

लाभार्थी समाधान

शिक्षण प्रणालीमध्ये असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समुदाय इ. विविध भागधारकांच्या भूमिका आणि परिणामकारकता विचारात घेऊन पीएम श्री शाळांमधील गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येईल. वरील नमूद भागधारकांनी हाती घेतलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे एकत्रीकरण शाळेच्या परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावेल.

पीएम श्री शाळा योजना ठळक मुद्दे

"पीएम श्री" या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्याने केंद्र शासनासोबत सामंजस्य करार केला असून, त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० राज्यात संपूर्णपणे लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • राज्यात "पीएम श्री " ही केंद्र पुरस्कृत योजना केंद्र राज्य निधी हिस्सा अनुक्रमे ६०:४० प्रमाणे खर्च करण्यात येणार आहे.
  • पहिल्या टप्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यातून २ शाळा याप्रमाणे ८४६ शाळा विकसित करण्यात येणार आहे. 
  • पहिल्या टप्यासाठी प्रती शाळा रु. १.८८ कोटी तरतूद विचारात घेता, केंद्र हिस्सा ६० टक्के प्रमाणे रु.१.१३ कोटी नूसार ८४६ शाळांसाठी ५ वर्षाकरीता केंद्र हिस्सा रु. ९५५.९८ कोटी राहणार आहे. तर राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रमाणे रु. ७५ लाख प्रती शाळा नूसार ५ वर्षाकरीता अंदाजे रु. ६३४.५० कोटी खर्च अपेक्षित आहे. यास्तव सदर योजनेसाठी प्रतिवर्षी केंद्र हिस्सा अंदाजे रु. १९१.२० कोटी व राज्य हिस्सा अंदाजे रु. १२६.९ कोटी तरतूद ५ वर्षाकरिता अर्थसंकल्पीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • योजनेचे लेखाशीर्ष मंजूर होऊन निधी अर्थसंकल्पीत होण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सन २०२२ - २०२३ या वर्षातील "पीएम श्री योजनेचा खर्च समग्र शिक्षा योजनेच्या अर्थसंकल्पीत तरतूदीतून करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

"पीएम श्री" या योजने अंतर्गत दुसऱ्या टप्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका व ३८३ नगरपालिका / नगरपरिषद यामधून "पीएम श्री" शाळांची निवड केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्यानंतर करण्यात येईल. सदर शाळांसाठी पुढील कार्यवाही शालेय शिक्षण विभाग स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

पीएम श्री योजनेची अंमलबजावणी

"पीएम श्री" या योजनेची अंमलबजावणी समग्र शिक्षा यंत्रणेमार्फत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

"पीएम श्री" या योजनेची अंमलबजावणी राज्य स्तरावर समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राज्य अंमलबजावणी संस्थेमार्फत (State Implementation (Society) अर्थात विभागाद्वारे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्तरावर संबंधित आयुक्त महानगरपालिका यांची राहणार आहे.

Previous Post Next Post