Krushi Sevak News : अखेर! कृषी सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ; राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय!

Krushi Sevak News : महाराष्ट्र राज्यात ग्रामसेवक, शिक्षणसेवक यांच्या मानधनात भरीव वाढ केल्यानंतर आता राज्यातील कृषीसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे, कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याची घोषणा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे.

$ads={1}

अखेर! कृषी सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Krushi Sevak News

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित केला आहे. तसेच दिनांक 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषिसेवक, ग्रामसेवकशिक्षणसेवक अशा तीनही संवर्गाचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव असताना कृषीसेवकांचे मानधन वाढ करण्याचा निर्णय प्रलंबित होता, यासाठी 'ॲग्रोवन' कडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, आणि अखेर कृषो सेवकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली. मानधनवाढीसाठी चाललेल्या या पाच वर्षाच्या लढ्यात 'ॲग्रोवन' चे कृषी सेवक कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहे.

राज्यातील कृषिसेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत नुकतेच राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पडसाद पडले होते. यावर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत सदर प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली होती.

उमेद (MSRLM) अभियानातील कंत्राटी कर्मचार्यांच्या मानधनात 20% टक्के भरीव वाढ (Salary Increase) व कृषी सेवकांच्या मानधनात 10 हजारांची वाढ करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 28 जुलै 2023 रोजी विधानपरिषदेत केली. अधिक सविस्तर वाचा...

कृषीसेवकांना अवघ्या प्रतिमाह 6 रुपये मानधन मिळत होते, त्यात आता 10 हजारांची भरघोस वाढ करण्यात आली असून, 16 हजार रुपये मानधन कृषी सेवकांना मिळणार आहे. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

तारांकित प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्यांना (SSA) शासन सेवेत कायम - कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! - समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी सरकारचा खुलासा

गेल्या काही वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता, राज्याचे नवे मा. कृषिमंत्री मुंडे यांच्या निदर्शनास सदर बाब लक्षात आणून देण्यात आली. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे कॅबिनेटमध्ये मानधन वाढीचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची माहिती महाराष्ट्र कृषिसेवा महासंघाचे कोषाध्यक्ष व पर्यवेक्षक संघटनेचे नेते संदीप केवटे यांनी दिली. 

मानधन वाढ - शासन निर्णय

$ads={2}

Previous Post Next Post