8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट बातमी! आठवा वेतन आयोग लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत दिली महत्वाची माहिती...

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढ ही साधारणपणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्यात वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते, सद्या सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय म्हणजे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? यासंदर्भात कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकारने राज्यसभेत महत्वाची माहिती दिली, सविस्तर पाहूया..

आठवा वेतन आयोग लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत दिली महत्वाची माहिती

8th Pay Commission

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वाधिक चर्चा सध्या जुनी पेन्शन योजना (OPS), महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि दर दहा वर्षांनी लागू होणारा वेतन आयोग (Pay Commission), जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी देशभरात कर्मचारी सरकारकडे आग्रहाची मागणी धरत आहे. काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, तर महाराष्ट्र राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी त्रीसदस्यीय समिती स्थापन केली आहे. व लवकरच राज्य सरकार यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात मार्च महिन्यात वाढ केल्यानंतर सध्या 42% प्रमाणे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळत आहे. साधारणपणे महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवण्यात येतो जुलै आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली जाते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4% टक्क्याची वाढ मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच दिनांक 30 जून 2023 रोजी राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या महागाई भत्यात 4% वाढ करण्यात आली असून, सध्या 42% प्रमाणे DA मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या इतर भत्यात शासन वेळोवेळी वाढ करण्याचा निर्णय घेत असते, आता सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग वेतनश्रेणी नुसार पगार मिळत आहे. दर दहा वर्षांनी लागू होणारा वेतन आयोग लागू होत असतो, यासंदर्भात कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाची चाहुल लागली आहे. कारण सातवा वेतन आयोग सन 2014 मध्ये स्थापन करण्यात आला होता व तो 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. त्यामुळे 2024 मध्ये जर आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यास साधारण दोन वर्षांनी म्हणजे 2026 मध्ये प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग लागू होईल अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. मात्र आता आठवा वेतन आयोग संदर्भात राज्यसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, यावर राज्य सरकारने महत्वाची माहिती दिली आहे.

तारांकित प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्यांना (SSA) शासन सेवेत कायम - सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे - शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ - कंत्राटी कर्मचारी नवीन धोरण PDF

सरकारने 2016 पासून शेवटच्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या आणि विशेषत: दर 10 वर्षांनी नवीन आयोग स्थापन केला जातो. मा. केंद्रीय अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की, केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सरकारने मंगळवारी संसदेत सांगितले. त्यामुळे आता सध्यातरी चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे

कंत्राटी कर्मचाऱ्यांना (SSA) शासन सेवेत कायम
शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर
NMMS शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज

Previous Post Next Post