Teachers Recruitment : राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे 'पवित्र' प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू, शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर

Teachers Recruitment Latest News : अखेर राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षक भरती बाबत एक महत्वाची बातमी अशी आहे की, राज्याचे मा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातील विधान परिषदेत दिली. शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सविस्तर पहा..

राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे 'पवित्र' प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Teachers Recruitment Latest News

राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदापैकी 30 हजार पदे 'पवित्र' प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासंदर्भात सदस्य सुधाकर अडबाले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षण अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणीच्या (TAIT) आयोजनाबाबतचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणी 22 फेब्रुवारी, 2023 ते 3 मार्च,2023 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून, परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे 30 हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.

यानुसार जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली व विषयांची माहिती पोर्टलवर भरून पदभरती करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर

  • जाहिरात देण्याचा कालावधी - १५/०८/२०२३ ते ३१/०८/२०२३
  • उमेदवारांना जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांना प्राधान्यक्रम देणे -  ०१/०९/२०२३ ते १५/०९/२०२३
  • मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दि. १०/१०/२०२३
  • मुलाखतीशिवाय पदभरतीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे - दि. ११/१०/२०२३ ते दि. २१/१०/२०२३
  • पदस्थापनेसाठी समुपदेशनाचे आयोजन जिल्हास्तरावर करणे - दि. २१/१०/२०२३ ते २४/१०/२०२३

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; संपाबाबत राज्य शासनाचा निर्णय  -कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 15,144 रुपयांची वाढ

तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पवित्र  प्रणालीमार्फत नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतच्या सूचना देखील आयुक्त (शिक्षण), सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी यांना ७ जुलै २०२३ रोजीच्या शासन पत्रान्वये देण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.

सर्व 34 जिल्हा परिषद जाहिराती एकाच ठिकाणी - जिल्हानिहाय जागा व जाहिराती डाउनलोड डायरेक्ट लिंक..

Previous Post Next Post