Disabled Candidates News : राज्यातील दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी महत्वाची बातमी! गट-अ, ब, क व ड संवर्गातील पदाकरिता वित्त विभागाचा महत्वाचा निर्णय..

Disabled Candidates News : महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग  (अपंग) दिनानिमित्त राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. सरकारी नोकरी मध्ये दिव्यांगाना विशेष आरक्षण लागू असते, यासंदर्भात शासनाने दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी शुद्धीपत्रक जारी केले आहे.

$ads={1}

गट-अ, ब, क व ड संवर्गातील पदाकरिता वित्त विभागाचा महत्वाचा निर्णय

Disabled Candidates news

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 (RPWD Act 2016) नुसार दिव्यांगत्वाचे 21 प्रकारामध्ये विभागणी करण्यात आली आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये दिव्यांगासाठी 4% आरक्षण लागू असते. मात्र यामध्ये देखील पदनिहाय विशेष दिव्यांग प्रकारातील उमेदवारांना संधी दिली जाते. 

दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 नुसार आता  संचालनालय, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय या कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयातील गट-अ, ब, क व ड (Group-A, B, C,D) संवर्गातील पदाकरिता दिव्यांगांसाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करणेबाबत वित्त विभागाने दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी शुद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य शासनाचा निर्णय  -कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 15,144 रुपयांची वाढ

$ads={2} 

राज्यातील संचालनालय, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय आणि अधिनस्त कार्यालयातील गट-अ संवर्गातील 'संचालक', 'सहसंचालक', 'उपसंचालक', 'सहायक संचालक', ('Director', 'Joint Director', 'Deputy Director', 'Assistant Director') व गट-ब मधील 'लेखा अधिकारी', 'सहायक लेखा अधिकारी' ('Accounts Officer', 'Assistant Accounts Officer') ही पदे तसेच गट-क मधील 'वरिष्ठ लेखा परीक्षक' ('Senior Auditor') हे पद 'अंध (Blind)/अल्पदृष्टी (Low Vision) या दिव्यांग प्रवर्गा करिता सुनिश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील अंध व अंशतः अंध उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. [शासन निर्णय]

सर्व 34 जिल्हा परिषद जाहिराती एकाच ठिकाणी - जिल्हानिहाय जागा व जाहिराती डाउनलोड डायरेक्ट लिंक..

Previous Post Next Post