Employee Overtime Allowance News : रविवार व सुटीच्या दिवशी काम केल्यास ओव्हरटाइम भत्ता मिळणार, राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!

Employee Overtime Allowance News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत असताना विविध भत्यांचा लाभ मिळत असतो, त्यामध्ये विशेषतः महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) यामध्ये वेळोवेळी वाढ करण्यात येते, आता यासंदर्भात वित्त विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व विभागातील वाहन चालकांच्या Overtime Allowance भत्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..

राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!

Employee Overtime Allowance

राज्य शासनाच्या विविध विभाग व त्याखालील निरनिराळ्या कार्यालयातील वाहन चालकांना 2 तास 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास त्यांना  रु. 100/- प्रति तास या दराने अतिकालिक भत्त्याच्या (Overtime Allowances) दरामध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा भत्ता कर्मचाऱ्यांना दिनांक 7 ऑगस्ट 2023 पासून लागू असणार आहे.

रविवार व सुटीच्या दिवशी काम केल्यास ओव्हरटाइम भत्ता मिळणार

कामाच्या दिवशी 9 तास 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास भोजन वेळ धरून आणि रविवार व सुटीच्या दिवशी सुद्धा काम केल्यास दर तासाला रु. 100/- मिळणार आहे. एखाद्या वेळेस अर्धा तास किंवा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येणार आहे. तसेच या अतिकालिक (Overtime Allowances) भत्त्याची एकूण रक्कम त्यांना एकूण पगाराच्या (Salary) 30% पेक्षा जास्त मिळणार नाही. वाहन चालकांना सुधारित दराप्रमाणे अतिकालिक भत्ता मंजूर करण्याबाबतचे अधिकार पूर्वीप्रमाणेच वाहन चालक ज्यांचे नियंत्रणाखाली काम करतात, त्या विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना राहतील असल्याचे आदेशात म्हंटले आहे.

वित्त विभागाचा महत्वाचा निर्णय - महागाई भत्ता दर वाढला पहा - जिल्हा परिषद 34 जिल्ह्यातील जाहिराती एकाच ठिकाणी पहा
Previous Post Next Post