BEST Strike News : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत महत्वाची अपडेट! कर्मचाऱ्यांना किमान वेतन, दिवाळी बोनस व इतर सुविधा देण्याबाबत चर्चा

Best Contract Employees Strike News : राज्यातील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक 3 ऑगस्ट 2023 पासून बेमुदत संप (Best Bus Strike) पुकारला आहे

बेस्टच्या कंत्राटी कर्मचारी संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही – मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Best Contract Employees Strike News

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (BEST) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. लोढा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले की, मुंबईत ३०५२ बस नागरिकांच्या सेवेसाठी आहेत. त्यापैकी १,३८१ बस बेस्टच्या असून त्या सुरू आहेत. खासगी कंपन्यांद्वारे उर्वरित १,६७१ बस (वेट लीजवर) कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येतात. जास्तीत जास्त बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेस्टकडून ९०० वाहनचालक दिले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहनने (एमएसआरटीसीने) १८० पेक्षा अधिक बस दिल्या आहेत. तसेच, २०० पेक्षा जास्त खासगी बस सुरू करण्यात आल्या आहेत. अशा एकूण ३०५२ बसपैकी २६५१ बस नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्यक्षात सुरू असून, उर्वरित ४०० बस तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.

हे ही वाचा - वित्त विभागाचा महत्वाचा निर्णय - महागाई भत्ता दर वाढला पहा - रविवार व सुटीच्या दिवशी काम केल्यास ओव्हरटाइम भत्ता

कर्मचाऱ्यांना किमान वेतन, दिवाळी बोनस व इतर सुविधा देण्याबाबत चर्चा

खासगी कंपन्यानी  बस वाहन चालकांच्या किमान वेतनाची शाश्वती द्यावी, त्यांना आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात, दिवाळी बोनस संदर्भातील प्रश्न सोडविण्यासंदर्भात कंपन्यांच्या मालकांसोबत चर्चा करण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले. (काय आहेत मागण्या? पहा)

सरकारी नोकरी- जिल्हा परिषद 34 जिल्ह्यातील जाहिराती एकाच ठिकाणी पहा - IBPS मध्ये 3049 जागांसाठी मोठी भरती

Previous Post Next Post