Disability Welfare Department : खुशखबर! दिव्यांग कल्याण विभागातील 1912 पदे भरण्यास मान्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Disability Welfare Department : दिव्यांग कल्याण  विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण 932 अनुदानित दिव्यांग शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील 1912 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

$ads={1}

दिव्यांग कल्याण विभागातील 1912 पदे भरण्यास मान्यता

Disability Welfare Department

मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. राज्य मानवी हक्क आयोगाकडील सुमोटो याचिकेवरील सुनावणीच्या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगांच्या अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा, संलग्न वसतिगृहे व प्रशिक्षण केंद्र (कार्यशाळा), अनाथ मतिमंदांकरीताची बालगृहे संलग्न विशेष शाळा व संलग्न कार्यशाळांमधील रिक्त असलेली शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील पदे, वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 4 मे 2020 मधून निर्बंध मुक्त करून तातडीने सरळसेवेने भरण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

हे ही वाचा - जुलै च्या पगारात महागाई भत्ता रोखीने मिळणार - महाराष्ट्र - जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज पहा - या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू

शिक्षकीय 1167 तसेच शिक्षकेतर 508  ही पदे नियमित स्वरुपात आणि 237 पदांना बाह्यस्त्रोताद्वारे अशा एकूण 1912 पदांना भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. 

या मान्यतेच्या अनुषंगाने या उपक्रमांतील पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देऊन या पदभरतीची कार्यवाही विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विभागाचा शासन निर्णय दि.26 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील 42 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम होणार?
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ
कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज पहा

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post