Mahatma Phule Jan Arogya Yojana : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता सर्वांना मिळणार; योजनेचा लाभ कुठे आणि कसा घ्यावा? सविस्तर जाणून घ्या..

Mahatma Phule Jan Arogya Yojana : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, या योजनेत जवळपास 1356 आजारावर उपचार घेता येणार असून, राज्यातील दवाखाण्याची जिल्हानिहाय यादी आणि आजार यादी सविस्तर पाहूया..

$ads={1}

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाखाचे आरोग्य संरक्षण कवच

Mahatma Phule Jan Arogya Yojana
Mahatma Phule Jan Arogya Yojana

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक (All Ration Card Holders), अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच (Health Cover) प्राप्त होणार असून, या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून 5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय दिनांक 28 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार एकत्रित योजना अंमलबजावणीचा शासन निर्णय दिनांक 28 जुलै, 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजने लाभ व वैशिष्ट्ये 

राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त झाले आहे. केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.

आयुष्यमान भारत (Ayushman Bharat) - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रूपये आहे. आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रती कुटूंब प्रती वर्ष 5 लाख रूपये एवढे करण्यात आले आहे.

आयुष्यमान भारत (Ayushman Bharat) – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रूग्णालय (Approved Hospitals) मध्ये उपचार घेता येणार आहे. 

महात्मा फुले जन आरोग्य योजना आजाराची यादी

महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार - महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात आले आहे, तर मागणी असलेले 328 उपचारांचा समावेश नव्याने करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उपचारांची संख्या 147 ने वाढून 1356 एवढी झाली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत पण 1356 एवढे उपचार समाविष्ट करण्यात आले आहे. आजाराची यादी येथे पहा

महात्मा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट

महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या 1000 एवढी आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना ही याआधीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यांत 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रूग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त 200 रूग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1350 होईल. 

यामध्ये सर्व शासकीय रुग्णालय अंगीकृत (Approved Hospitals) करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालये, अशा रुग्णालयांची ईच्छा असल्यास या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील. महात्मा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट पहा

मूत्रपिंड शस्त्रक्रीया - Kidney Surgery

मूत्रपिंड शस्त्रक्रीया (Kidney Surgery) - मूत्रपिंड शस्त्रक्रीयेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रूग्ण 2.5 लाख एवढी मर्यादा आहे. ती आता 4.5 लाख रूपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme - स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या 14 ऑक्टोंबर 2020 च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या 74 वरून 184 अशी वाढविण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेत 30 हजार रूपयांवरून प्रति रूग्ण प्रती अपघात 1 लक्ष रूपये अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रूग्णांचा समावेश करण्यात आला आहे.

MJPJAY योजनेचा लाभ कुठे आणि कसा घ्यावा?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा (MJPJAY) लाभ घेण्यासाठी अंगीकृत (Approved Hospitals) हॉस्पिटल मध्ये घेता येतो. यासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र असतात. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या सर्वच रुग्णालयांत हे उपलब्ध असतात. 

आरोग्यमित्र रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करतात. तसेच रुग्णालयात उपचार घेताना योग्य ती मदतही ते करत असतात. मात्र आता अजून यामध्ये राज्यातील नागरिकांसाठी 'आभा कार्ड' काढून घेण्यास शासनाने आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी येथे नोंदणी करा.

सर्व नागरिकांसाठी 'आभा' हेल्थ कार्ड नोंदणी आवश्यक - येथे करा नोंदणी
अपघात विमा सरकारी योजना पहा
प्रधानमंत्री विमा योजना


शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post