Cashless Mediclaim: गुड न्यूज ! सरकारी कर्मचाऱ्यांना आता वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

Cashless Mediclaim : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आता वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस (Cashless) सुविधा मिळणार आहे, Cashless Mediclaim सुविधेअंतर्गत रुपये 5 लाखापर्यंत लाभ घेता येणार आहे. सविस्तर वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांना आता वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस (Cashless) सुविधा मिळणार

Cashless Mediclaim

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयकांची उपचारानंतर प्रतिपूर्ती करण्यात येते. प्रतिपूर्ती करण्यास बराच कालावधी लागत असल्याने महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेप्रमाणे वैद्यकीय भरपाई विमा योजना पध्दतीने (Cashless Mediclaim) सुविधा पुरविण्याचे मागणी वेगवेगळ्या शासकीय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कृतिशिल निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेने मागणी केलेली आहे. तसेच मा. लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे वेळोवेळी केलेली आहे.

राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आणि केंद्राची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana) यांचे एकत्रिकरण करून राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण 5 लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. [डिजीटल हेल्थ कार्ड येथे काढा]

यामध्ये प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपये मर्यादितपर्यंत मोफत (Cashless Mediclaim) वैद्यकीय उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यामध्ये शासकीय: कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी विधानपरिषदेत दिली. त्यामुळे आता Cashless सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये 5 लाखापर्यंत सुविधा घेता येणार आहे. [महात्मा फुले जन आरोग्य योजना 996 आजारांची यादी येथे पहा]

8 वा वेतन आयोग लेटेस्ट न्यूज
सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे
1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post